Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    sulochana chavan

    Sulochana Chavan : हिंदी चित्रपटातील लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचा स्वर!

    Dosti

    Dosti : मैत्रीच्या नात्याची भावस्पर्शी संगीतमय कहाणी!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

April May 99 Marathi Movie: आशुतोष गोवारीकर झळकणार ‘एप्रिल मे

Gadi No.1760 Movie Poster: पैशांनी भरलेली बॅग…एक गाडी…आणि अनेक रहस्ये;  ४

Cannes Film Festival मध्ये झळकला राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक राज मोरे

Cup Bashi Marathi Movie: ‘कप बशी’ या आगामी चित्रपटात दिसणार

Actress Girija Prabhu ने स्वीकारलं नवं आव्हान;’कोण होतीस तू, काय झालीस

Bollywood : बॉलीवूडमधील पहिली सुपरहिट मेडली कशी बनली?

Suneil Shetty :  सुनील शेट्टीने ‘बॉर्डर’ चित्रपट नाकारला होता पण….

Thug Life : कमल हासन सोबत झळकणार महेश मांजरेकर!

Paresh Rawal : ‘हेरा फेरी ३’ चित्रपट का सोडला? बाबू

Special Ops 2 : हिम्मत सिंग ‘स्पेशल ऑप्स सीझन २’मध्ये

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

‘अतुल’नीय

 ‘अतुल’नीय
नाट्यकला मिक्स मसाला

‘अतुल’नीय

by रश्मी वारंग 10/07/2020

काही कलाकार हवेहवेसे असतात. त्यांना पाहताच एक आपलेपणाची भावना निर्माण होते. मराठी नाट्यसृष्टीतील असं नाव म्हणजे अतुल परचुरे.

वासूची सासू, नातीगोती,टिळक आगरकर, अफलातून, बे दुणे पाच, तरुण तुर्क म्हातारे  अर्क, व्यक्ती आणि वल्ली, वाह गुरु, ए भाऊ डोकं नको खाऊ, कापूसकोंड्याची गोष्ट यासारख्या नाटकांतून आपलं निखळ मनोरंजन करत आलेल्या अतुल परचुरे यांचा आज वाढदिवस.

मुंबईचं सांस्कृतिक माहेरघर असणा-या दादरसारख्या परिसरात अतुल यांची जडणघडण झाली. सुप्रसिद्ध बालमोहन शाळेतूनच अतुल यांच्यातील अभिनेत्याला वाव मिळाला.

आपल्या अभिनयाचा ठसा उमटवण्यास उत्सुक अतुलना त्यांच्या कमी उंचीमुळे, शरीराच्या ठेवणीमुळे सुरुवातीला अनेकांकडून कुत्सित शेरे ऐकावे लागले. मात्र टिळक आगरकर नाटकातील कामाच्या संपन्न अनुभवाने आपली आवड अभिनयातच आहे. याची अतुल यांना प्रकर्षाने जाणीव झाली आणि त्यांनी सगळ्या टीकाकारांकडे दुर्लक्ष करत याच क्षेत्रात काम करण्याचा निश्चय केला.

‘नातीगोती’ नाटकाने अतुल यांच्या कारकिर्दीला ख-या अर्थाने वळण दिले. जयवंत दळवी लिखित या नाटकात अतुल यांनी मतिमंद मुलाची भूमिका साकारली होती. त्यांना नाटकात एकही संवाद नव्हता पण  मतिमंद मुलाचा अभिनय ते इतक्या प्रभावीपणे रंगमंचावर सादर करत की नाटक संपल्यावर अनेक प्रेक्षक जड पाणावलेल्या डोळ्यांनी बॅकस्टेजला अतुल यांना काळजीने पहायला येत. प्रत्यक्ष पुलं देशपांडे नातीगोती पाहून झाल्यावर बॅकस्टेजला अतुल यांना भेटायला आले आणि म्हणाले,” तुला हातीपायी धड पाहिलं. आता मला बरं वाटतंय”. इतकी ती भूमिका उत्तम वाटायची.

नातीगोती सारख्या गंभीर नाटकाला प्रेक्षकांनी जसा भरभरून प्रतिसाद दिला तसाच प्रतिसाद अतुल यांच्या ‘तरूण तुर्क म्हातारे अर्क मधल्या” मुकुंद  या पात्राला मिळाला. या नाटकात थोड्याशा बायकी तरुणाची अतुल यांची भूमिका प्रेक्षकांना शब्दश: खूर्चीवरुन पडण्याइतपत गडाबडा लोळायला हसायला लावायची. वास्तविक मधुकर तोरडमल यांना या भूमिकेसाठी सडसडीत नाजूक गोरापान तरुण अपेक्षित होता. अतुल यांनी तोरडमल यांना सांगितलं की, आठ दिवस तालमी करून मी पहातो. तुमच्या मनासारखं काम झालं नाही तर मी नाटक सोडेन. पण अतुल यांनी इतक्या बहारीनं काम वठवलं की या नाटकाचे अनेक प्रयोग त्यांच्या नावावर जमा झाले.

नाटका इतकंच मराठी हिंदी सिनेमा, मालिका यातही अतुल यांचा सहज वावर राहिलेला दिसतो. जागो मोहन प्यारे सारख्या मालिकेतील नायक आताच्या काळात इतका साधा भोळा कसा असू शकतो? असा खोचक प्रश्न प्रेक्षकांना पडत नाही नाही कारण अतुल यांचा अभिनय आणि अंगभूत हवेहवेसे पण तो साधेभोळेपणा कनव्हिन्सिंग वाटायला लावतो‌. ऑल द बेस्ट सारख्या चित्रपटात स्टार कलाकारांच्या मांदियाळीतही अतुल यांचा पांडू आपल्या ठसठशीत लक्षात रहातो. 

इतक्या छान भूमिका साकारूनही चर्चा, गॉसिपिंग आणि गटबाजी यापासून चार हात लांब असलेल्या या गुणी अभिनेत्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor Celebrity Celebrity Birthday Celebrity News Celebrity Talks Drama Entertainment Featured Indian Cinema Marathi Movie Marathi Natak marathi Show movies Television
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.