Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    Madhuri Dixit

    Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?

    Rajesh Khanna

    Rajesh Khanna : राजेश खन्नाचे तीन सुपर हिट सिनेमे

    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Kajol हिने ‘३ इडियट्स’ का नाकारला होता? १६ वर्षांनी केला

Karishma Kapoor ने अभिषेक बच्चनसोबत ब्रेकअप केल्यानंतर काही महिन्यांनीच….

Dilip Kumar यांनी ‘लॉरेन्स ऑफ अरेबिया’ हॉलिवूड चित्रपट नाकारलेला!

एकेकाळी ऑस्करमध्ये… आता बॉलीवूडमधून गायब ! कुठे आहेत Ashutosh Gowarikar

Airplane Crash : नाशिक-मुंबई प्लॅन क्रॅश; अभिनेत्याचा हात तुटला पण

Sushant Singh Rajput : अंतराळवीर होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या ताऱ्याची कथा!

Aamir Khan ३० वर्षांनंतर रजनीकांत यांच्या ‘या’ आगामी चित्रपटात दिसणार

Deepika Padukone : संदीप वांगा याच्या ‘स्पिरिट’मधून आता ‘या’ सुपरस्टारचा

Karishma Kapoor : बॉलिवूडमधला महागडा घटस्फोट ते अभिनेत्रीचा सौदा; मॅरेज

Ahemdabad Airplane Crash :विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू,

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

जया भादुरी ची ’गुड्डी’ डिम्पल साकारणार होती?

 जया भादुरी ची ’गुड्डी’ डिम्पल साकारणार होती?
कलाकृती तडका बात पुरानी बडी सुहानी मनोरंजन ए ख़ास मिक्स मसाला

जया भादुरी ची ’गुड्डी’ डिम्पल साकारणार होती?

by धनंजय कुलकर्णी 09/04/2020

अभिनेत्री जया भादुरी आणि डिंपल कपाडीया या दोघी पडद्यावर एकत्र कधीच आल्या नाहीत पण सत्तरच्या दशकातील सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि राजेश खन्नाच्या त्या अर्धांगिनी बनल्या. या दोघी एकत्र सिनेमात जरी कधी आल्या नसल्या तरी एकाच सिनेमाकरीता दोघींचा विचार झाला होता!. तो किस्सा खूप मजेदार आहे. गुलजार यांच्या डोक्यात एक विषय होता ’गुड्डी’ या सिनेमाचा.शाळकरी मुलींना सिनेमाच्या असलेल्या ग्लॅमरचा,आकर्षणाचा. ऋषिकेश मुखर्जी या सिनेमाचे दिग्दर्शन करणार होते. या साठी त्यांना नवा फ़्रेश चेहरा हवा होता. एकदा गुलजार एच एस रवैल यांच्या घरी गेले असताना त्यांची भेट चुन्नीलाल कापडीया या रवैलच्या मित्राची झाली. कापडीयांच्या सोबत त्या वेळी त्यांची मुलगी डिंपल देखील होती.तेंव्हा ती १३ वर्षाची शाळकरी मुलगी होती. तिला सिनेमाचे भन्नाट आकर्षण होते.गुलजार साहेबांना ’गुड्डी’करीता अशीच मुलगी हवी होती.मनोमन त्यांनी डिम्पलला कास्ट करून टाकले आता फक्त ऋषिदांना दाखवून त्यांची मान्यता घ्यायची औपचारीकता बाकी होती.

त्याच काळात ऋषिदा पुण्यात एफ टी आय ला एका महोत्सवाचे ज्युरी म्हणून येणार होते. या वेळी त्यांनी एक शॉर्ट फिल्म बघितली व त्यात काम करणारी मुलगी ऋषिदांना ’गुड्डी’ च्या भूमिकेकरीता आवडली.त्यांनी प्राचार्यांकडे त्या मुलीची चौकशी केली.तेंव्हा त्यांना कळाले हि मुलगी म्हणजे जया भादुरी! तिने या पूर्वी सत्यजित रे यांच्या महानगर मध्ये काम केले होते.मग काय गुलजार यांनी चॉईस केलेल्या डिंपलच्या जागी जया आली! १५ ऑगस्ट १९७१ या दिवशी प्रदर्शित झालेल्या ’गुड्डी’ने अफाट यश मिळविले. काय गंमत असते पहा.ऋषिदा जर पुण्यात गेलेच नसते आणि ’गुड्डी’ ची भूमिका जर डिंपलनेच केली तर ’बॉबी’चे काय झाले असते? आणि जयाला जर ’गुड्डी’ मिळाला नसता तर ती बंगाली सिनेमात परत गेली असती कां? आणि आणि सगळ्यात महत्वाचं सत्तरच्या दशकातील दोन सुपरस्टारची लग्ने कुणाशी झाली असती? या जर तर चीच मोठी गंमत असते.

आज ९ एप्रिल, अभिनेत्री जया भादुरी यांचा वाढदिवस. तिचं अभिष्टचिंतन करताना तिच्या पहिल्या सिनेमाची ही इनसाईड स्टोरी तुम्हाला कशी वाटली?   

धनंजय कुलकर्णी 

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Birthday Celebrations Bollywood Chitchat Bollywood Topics Celebrity Birthday Celebrity Talks Guddi
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.