जेव्हा Nagraj Manjule यांचा राष्ट्रीय पुरस्कार चोरीला गेला होता…

Gulkand : ‘संगीत मानापमान’ ते ‘गुलकंद’; जाणून घ्या बॉक्स ऑफिस कलेक्शन
गेल्या काही महिन्यांमध्ये विविध विषयांवर आधारित मराठी चित्रपट प्रेक्षकांचं विशेष मनोरंजन करत आहेत. मधल्या काळत मराठी चित्रपटांकडे प्रेक्षकांची जरा पाठ फिरली होती खरी पण आता पुन्हा एकदा प्रेक्षक मराठी चित्रपटांना गर्दी करु लागले आहेत. काही दिवसांपूर्वीच सई ताम्हणकर (Sai Tamhankar) आणि प्रसाद ओक (Prasad Oak) यांची प्रमुख भूमिका असणारा ‘गुलकंद’ (Gulkand) चित्रपट प्रदर्शित झाला होता. प्रेक्षकांची वाहवा मिळवणाऱ्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे. १ मे २०२५ रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट अजूनही थिएटर गाजवत असून नेमकी चित्रपटाने किती कमाई केली आहे जाणून घ्या…(Marathi movies 2025)

सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार ‘गुलकंद’ चित्रपटाने दिवशी पहिल्या दिवशी ५५ लाख, दुसऱ्या दिवशी २५ लाख, तिसऱ्या दिवशी ४२ लाख, चौथ्या दिवशी ५७ लाख, पाचव्या २३ लाख, सहाव्या दिवशी २२ लाख, सातव्या दिवशी १४ लाख, आठव्या दिवशी १८ लाख, नवव्या दिवशी १८ लाख, दहाव्या ३७ लाख, अकराव्या ३८ लाख, बाराव्या दिवशी २६ लाख, तेराव्या दिवशी १९ लाख, चौदाव्या दिवशी १९ लाख, पंधराव्या दिवशी १८ लाख, सोळाव्या दिवशी १६ लाख, सतराव्या दिवशी १८ लाख, अठराव्या २५ लाख, एकोणिसाव्या दिवशी १५ लाख कमवत आत्तापर्यंत चित्रपटाने ५.०७ कोटींचा गल्ला जमवला आहे. (Gulkand movie box office collection)
================================
हे देखील वाचा: War 2 : दमदार अॅक्शन आणि कसदार अभिनय; ह्रतिक-Jr NTRच्या चित्रपटाचा टीझर रिलीज
=================================
सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, जानेवारी २०२५ ते मे २०२५ पर्यंत प्रदर्शित झालेल्या काही मराठी चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली आहे जाणून घेऊयात. ‘संगीत मानापमान’ चित्रपटाने २.२६ कोटी,’फसक्लास दाभाडे’ चित्रपटाने ३.६४ कोटी, ‘आता थांबायचं नाय’ चित्रपटाने ४.७८ कोटी कमावले आहेत. दाक्षिणात्य आणि हिंदी चित्रपटांच्या गर्दीत मराठी चित्रपट आपलं स्वत:चं स्थान निर्माण करत आहेत ही खरंच अभिमानाची बाब आहे. इतकंच नव्हे तर ‘कान्स चित्रपट महोत्सवात’ (Cannes Film Festival 2025) ४ मराठी चित्रपटांचं स्क्रिनिंग करण्यात आलं होतं. त्यामुळे पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर मराठी चित्रपटांचा यशस्वी झेंडा फडकवला गेला आहे.