‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
गुलजार यांचा अप्रतिम पण अनलकी चित्रपट : अचानक
सत्तरच्या दशकात गुलजार यांनी ‘अचानक’ नावाचा एक चित्रपट दिग्दर्शित केला होता. खरंतर हा एक क्लासिक चित्रपट होता पण दुर्दैवाने त्याची दखल घेतली गेली नाही. १९५९ सालच्या नानावटी खून खटला’ या विषयाची प्रेरणा घेऊन या चित्रपटाचे कथानक बेतले होते. अर्थात हे फक्त इन्स्पिरेशन होते. कारण कथानकातील पुढील सर्व टप्पे आणि घडामोडी ह्या वेगळ्या होत्या. गुलजार यांनी त्यांच्या आवडत्या फ्लॅशबॅक तंत्राने हा चित्रपट एका उंचीवर नेऊन ठेवला होता. पण कळत नाही त्या काळी प्रेक्षकांना तो का आवडला नाही? आज पन्नास वर्षानंतर आपण जेव्हा हा चित्रपट पाहतो तेव्हा अचंबित होतो. त्या काळाच्या प्रेक्षकांना चित्रपटातील प्लॉट आवडला नाही की काय असे वाटते.पण तसे म्हणावे तर याच कथानकावर ये रास्ते है प्यार के हा सिनेमा येवून गेला होता. (Gulzar Movie)
(अलीकडे अक्षय कुमारचा रुस्तम हा चित्रपट याच कथानकावर बेतला होता) चित्रपटाचा नायक मेजर रणजीत खन्ना (विनोद खन्ना) हा भारतीय लष्कराच्या नौदलातील एक प्रचंड हुशार, पराक्रमी अधिकारी असतो. त्याच्या कार्य कर्तृत्वाकरीता त्याला भारत सरकारचे मेडल मिळालेले असते. त्याची पत्नी पुष्पा (लिली चक्रवर्ती) असते. दोघांचे एकमेकावर प्रेम असते. पण एकदा ड्युटी वरून परत आल्यानंतर त्याला आपली पत्नी आणि त्याचा जिवलग मित्र (रविराज) नको त्या अवस्थेत सापडतात. मेजर रणजीत ला हा फार मोठा धक्का असतो. आपल्या पतीने आणि प्रिया मित्राने आपल्याशी मोठी प्रतारणा केली ही वेदनाच फार भयंकर असते. या रागात तो आपल्या मित्राची हत्या करून टाकतो आणि पत्नीला देखील यम सदनाला मी पाठवून देतो. (इथे मूळ नानावटी केस मधील कथानकात बदल आहे) दोन्ही खून केल्यानंतर तो पोलिसांना स्वत: हून बोलवतो आणि त्यांच्या स्वाधीन होतो. रागाच्या भरात त्याच्या हातून हे कृत्य घडते पण नंतर पोलीस कोठडीतून पसार होतो आणि आपल्या पत्नीचे मंगळसूत्र गंगा नदीमध्ये अर्पण करण्यासाठी पळून जातो. पोलीस त्याचा पाठलाग करतात. त्याच्यावर गोळीबार करतात. त्यात तो जबरदस्त जखमी होतो. त्याची तब्येत सिरीयस असते. गोळ्या आरपार गेलेल्या असतात. डॉक्टर ओम शिवपुरी त्याचे प्राण वाचवतात. (Gulzar Movie)
खरं तर तो काही तासात मरेल असे त्यांना वाटत होते. पण मेडिकल मिरॅकल घडते आणि त्याचे प्राण वाचतात. आता डॉक्टर एक बेसिक प्रश्न विचारतात. याचे प्राण कशाला वाचवायचे? त्याला फाशीवर देण्यासाठी? इथे न्याय, कर्तव्य आणि मृत्यू यांची खूप चांगली सांगड घातली आहे. डॉक्टर मोठ्या शर्थीने त्याचे प्राण वाचवतात. खटला उभा राहतो. दोन खून केल्याने कोर्ट त्याला फाशीची शिक्षा सुनावते. खरंतर हा नेव्ही ऑफिसर गोल्ड मेडलिस्ट असतात. शत्रूला ठार मारल्याबद्दल त्याला मेडल मिळालेले असते. पण इथे आपल्या बायको आणि मित्राला मारल्याबद्दल त्यांना फाशी मिळालेली आहे!!! चित्रपट अनेक प्रश्न निर्माण करतो. देशावर आक्रमण करणाऱ्या शत्रूला जर मारले तर सरकार मेडल देते आणि घरातील पत्नी जर व्यभिचार करत असेल तर तिला आणि मित्राला जर मारले तर फाशीची शिक्षा होते.(Gulzar Movie)
गुलजार (Gulzar Movie) यांनी हा चित्रपट जबरदस्त पद्धतीने घेतला होता. चित्रपटाचे कथानकच इतके भारी असल्यामुळे त्यात गाण्याची आवश्यकता नव्हते. चित्रपटात फक्त एस डी बर्मन यांचे जुने ‘सून मेरे बंधू रे…’ हे गाणे पार्श्वभागावर दाखवले आहे. या चित्रपटाची कथा खाजा अहमद अब्बास यांनी लिहिली होती. त्यावेळी ते ब्लिटस या साप्ताहिकात त्यांचा फेमस कॉलम लिहीत असे त्याच वेळी ते ‘शमा’ नावाच्या एका चित्रपट विषय नियतकालिकात लिखाण करत असे. तिथे त्यांनी या चित्रपटाची कथा लिहिली होती. गुलजार यांच्या ती कथा वाचण्यात आली. त्यांना ती एवढी आवडली की त्यांनी ती एन सी सिप्पी यांना दाखवली. सिप्पी म्हणाले याच्यावर स्क्रीन प्ले लिहा आणि आपण यावर चित्रपट बनववू. त्यावर गुलजार म्हणाले ही कथा माझी नाही ही कथा खाजा अहमद अब्बास यांची आहे.
============
हे देखील वाचा : इतर चित्रपटांपेक्षा वेगळा आहे दिग्पालचा ‘शिवरायांचा छावा’ !
============
सिप्पी म्हणाले,लगेच चला. आपण त्यांच्याकडे जाऊन ही कथा विकत घेऊ.” अब्बास यांच्या घरी गेल्यानंतर त्यांना असे कळाले की ते आता एअरपोर्टवर गेले आहेत. हे दोघे ताबडतोब एअरपोर्टवर गेले आणि के ए अब्बास त्यांना भेटले. तिथेच त्यांनी त्यांना पाच हजार रुपये देऊन हे कथा विकत घेतली! अशा पद्धतीने या चित्रपटाची कथा त्यांच्या हातात आली आणि अवघ्या महिना भरात शूट करून हा सिनेमा ५ ऑक्टोबर १९७३ या दिवशी प्रदर्शित झाला ! अचानक हा चित्रपट युट्युब वर नि:शुल्क उपलब्ध आहे!