
Ramayana : टीव्हीच्या राम-सीताची प्रतिक्रिया, म्हणाले- “चित्रपटाकडून एवढीच अपेक्षा आहे की…”
भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील जवळपास ४००० कोटींचा पहिला बिग बजेट चित्रपट ‘रामायण’ (Ramayana) प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय ठरला आहे… नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ चित्रपटात रणबीर कपूर प्रभू श्रीराम यांची आणि साई पल्लवी सीता मातेची भूमिका साकारणार आहे… काही दिवसांपूर्वीच चित्रपटाची पहिली झलक प्रदर्शित करण्यात आली होती… त्यावर प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद देत चित्रपट सुपरहिट होणार अशी भाकितं मांडली… आता टी.व्ही वरील रामायण मालिकेत सीता मातेची भूमिका साकारणारी अभिनेत्री देबिना हिने रणबीर कपूरच्या रामायण चित्रपटावर आपली प्रतिक्रिया दिली आहे… नेमकं ती काय म्हणाली जाणून घेऊयात… (Entertainment News)

टी.व्हीवरील आनंद सागर यांच्या ‘रामायण’ (२००८) मालिकेत प्रभू श्रीराम आणि सीता मातेची भूमिका रिअल लाईफमध्ये पती पत्नी असणाऱ्या गुरमीत चौधरी आणि अभिनेत्री देबिना यांनी साकारली होती… राम-सीताची ही जोडी प्रेक्षकांना आवडली होती… आता चित्रपटाबद्दल गुरमीत देबिना या दोघांनीही आपली मंत मांडली आहेत… गुरमीत म्हणाला की, “मला या गोष्टीचा आनंद आहे की रणबीर प्रभू श्री राम यांची भूमिका साकारत आहे. तो एक चांगला अभिनेता आहे. नितेश तिवारी हा चित्रपट दिग्दर्शित करत आहेत. ते खूप सेन्सिबल व्यक्ती आहेत. ज्याप्रकारे हा चित्रपट बनवला जात आहे. माझी हीच अपेक्षा आहे जास्तीत जास्त लोकांना आपल्या संस्कृतीबद्दल माहिती मिळू दे. आणि रामायणची कथा केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगात बघितली गेली पाहिजे. त्यामुळे मला वाटतं ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट असली पाहिजे”.

तर, अभिनेत्री देबिना म्हणाली की, “साई पल्लवी ही एक हुशार अभिनेत्री आहे. आम्ही नुकतेच तिचे काही चित्रपट पाहिले. तिचं कास्टिंग योग्य आहे. तिच्याकडे तो निरागस आणि तेज असणारा चेहरा आहे. रामायण बनत राहिलं पाहिजे. लोकं नात्यांची किंमत विसरत चालले आहेत. आता ते पुस्तकं वाचत नाहीत. त्यामुळे लोक जे मीडियम फॉलो करतात. त्याच मीडियममधून त्यांना रामायणाबाबत शिकवण दिली गेली पाहिजे”.
================================
हे देखील वाचा: Sunny Deol : दिग्दर्शक नितेश तिवारी रामायण महाकाव्याला न्याय नक्कीच देतील!
=================================
दरम्यान, नितेश तिवारी यांचा रामायण हा पौराणिक चित्रपट दोन भागांमध्ये रिलीज होणार असून दोन्ही भागांचं बजेट जवळपास ४००० कोटींचं असेल असं निर्मात्यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं… रामायण चित्रपटाचे दोन भाग २०२६ आणि २०२७ च्या दिवाळीत रिलीज होणार आहेत… या चित्रपटात रणबीर कपूर, साई पल्लवी, लारा दत्ता, रवी दुबे, यश, आदिनाथ कोठारे, सनी देओल, रकुलप्रीत सिंग, काजल अग्रवाल अशा बऱ्याच कलाकारांच्या महत्वपूर्ण भूमिका असणार आहेत…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi