‘आई तुळजाभवानी’च्या पौराणिक गाथेत उलगडणार एक नवा अध्याय; चिंतामणी पाषाणाचा
गुरुदत्तने स्क्रॅप केलेल्या सिनेमातून हा सुपर हिट सिनेमा बनला !
‘प्यासा’ या चित्रपटाच्या सोबतच गुरुदत्त आणखी एका सिनेमावर काम करत होते, हा चित्रपट त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा होता कारण एकोणिसाव्या शतकातील इंग्रजीतील ख्यातनाम लेखक विल्की कॉलिंन्स यांच्या ‘द वूमन इन व्हाईट’ कादंबरीवर या चित्रपटाचे कथाकथन होते. १८५९ साली ही कादंबरी प्रकाशित झाली होती. मागच्या दीड शतकात या अभिजात कलाकृतीवर अनेक देशांमध्ये अनेक माध्यमातून यावर चित्रपट, नाटक, टीव्ही सिरीयल बनले आहेत. ( Super Hit )
आता येवूत आपल्या मूळ विषयाकडे. तर गुरुदत्त यांच्या या चित्रपटांमध्ये अभिनेत्री वहिदा रहमान दुहेरी भूमिकेत होत्या. या सिनेमाच्या आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या चित्रपटाला संगीत आरडी बर्मन देणार होते. हा त्यांचा पहिलाच चित्रपट असणार होता. चित्रपटाचा नायक आधी सुनील दत्त होता.पण नंतर त्याच्या जागी स्वतः गुरुदत्त यांनी नायकाची भूमिका करायचे ठरवले. यात गुरुदत्त यांनी आर्मी डॉक्टरची भूमिका केली होती. चित्रपट सस्पेन्स कॅटेगिरीतील होता. त्याला थोडा भुताटकीचा अँगल देखील होता. गुरुदत्त पहिल्यांदाच अशा प्रकारची चित्र निर्मिती करत होता. या सिनेमाचे जवळपास ५० % चित्रीकरण पूर्ण झाले होते. हिमाचल प्रदेशातील सिमला येथे या सिनेमाची चित्रीकरण होत होते. या सिनेमाचे दिग्दर्शन गुरुदत्त करत नव्हते तर त्यांचा असिस्टंट निरंजन करत होते. ( Super Hit )
वहिदा रहमान देखील आपल्या पहिल्याच डबल रोल मधील भूमिकेसाठी खूप उत्सुक होती. सर्व काही व्यवस्थित चालू होते. राहुल देव बर्मन यांनी या तीन गाणे रेकॉर्डदेखील केली होती. परंतु गुरुदत्त यांचा लहरी स्वभाव इथे देखील दिसून आला. त्याने या चित्रपटाचे चित्रीकरण बघितले आणि हा चित्रपटच स्क्रॅप करून टाकला. गुरुदत्तची ही एक सवय होती. त्याला एखादी गोष्ट कधी आवडेल आणि कधी नाही याचा काही नेम नसायचा. त्यामुळे त्याचे अनेक चित्रपट हे अर्धवटच राहिले. या सिनेमावर खरंतर त्याने खूप खर्च देखील केला होता. परंतु त्याच्या मनात काय आले माहिती नाही ? त्याला हा चित्रपट बंद करून टाकला! वहिदा रहमानला खूप वाईट वाटले कारण तिचा हा पहिलाच डबल रोल असणार होता. या सिनेमाचे संगीतकार राहुल देव बर्मन यांना तर ‘प्रथम ग्रासे मक्षिकापात’ असे वाटले. पण निर्मात्याचा निर्णय असल्यामुळे काहीच करता आले नाही. हा चित्रपट बंद पडला या चित्रपटाचे नाव होते ‘राज’. त्याकाळच्या स्क्रीन या मासिकात याची जाहिरात देखील आली होती आणि त्यात असे नमूद केले होते की, लवकरच हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे ! याचाच अर्थ या चित्रपटाचे बरेचसे चित्रीकरण झाले होते. परंतु गुरुदत्त यांच्या लहरी स्वभावामुळे हा चित्रपट डब्यात गेला. नंतर गुरुदत्त यांनी त्यांच्या ‘कागज के फूल’ या चित्रपटावर काम करायला सुरुवात केली. ( Super Hit )
पण या डब्यात गेलेल्या चित्रपटाचे कथानक जबरदस्त होते. जेव्हा हा चित्रपट गुरुदत्त यांनी बंद केला असे लक्षात आले त्यावेळेला त्यांचे जुने सहाय्यक राज खोसला यांना गुरुदत्त यांना भेटून या चित्रपटाचे राईट्स स्वतःकडे घेतले आणि त्यावर रि वर्क करून आपल्या नव्या चित्रपटाची सुरुवात केली. आता या चित्रपटात त्यांनी साधना या अभिनेत्रीला दुहेरी भूमिका दिली. चित्रपटाची गाणी राजा मेहेंदी अली खान यांनी लिहिली तर संगीत मदन मोहन यांनी दिले. चित्रपटाचा नायक म्हणून त्यांनी मनोज कुमारला संधी दिली आणि चित्रपट तयार झाला. ( Super Hit )
=========
हे देखील वाचा : ‘के’ पासून का असतात राकेश रोशन यांच्या सिनेमांची नाव
=========
चित्रपट होता ‘वह कौन थी?’ चित्रपट सुपर हिट ठरला. यातील गाणी तर आज देखील रसिकांच्या मनात ताजी आहेत. नयना बरसे रिमझिम रिमझिम, लग जा गले के फिर ये हंसी रात हो न हो’ छोडकर तेरे प्यार का दामन… या चित्रपटाला जेव्हा पन्नास वर्षे झाली तेव्हा २०१४ साली लता मंगेशकर यांनी ट्विट करून सांगितलं होतं की, “लग जा गले हे गाणे मी कालच रेकॉर्ड केले आहे असे वाटते!” गुरुदत्त यांच्या अर्धवट चित्रपटाला राज खोसला यांनी आपल्या स्टाईलने पूर्ण केले. पुढे राज खोसला यांनी ‘मेरा साया’, ‘अनिता’ हे दोन याच शैलीचे चित्रपट निर्माण केले. त्यांच्या या चित्रपटामुळे रसिक त्यांना भारताचे ऑलफ्रेड हीचकॉक म्हणतात ते उगाच नाही! पण वहिदा रहमान मात्र खूप नाराज झाली कारण पुढे आयुष्यात त्यांना एकदाही डबल रोल करता आला नाही! रेडीओवरील एका मुलाखतीत त्यांनी ही खंत बोलून दाखवली.