Ranveer Singh : आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ चित्रपटाचा टीझर ‘या’

Halad Rusali Kunku Hasal Serial: ‘हळद रुसली कुंकू हसलं’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; कलाकारांची ‘ही’ प्रसिद्ध जोडी दिसणार!
Star Pravah वाहिनी नेहमीच आपल्या दर्जेदार आणि नव्या प्रयोगशील मालिकांमुळे चर्चेत असते. याच मालिकांच्या मालिकेत आणखी एक आकर्षक मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे ‘हळद रुसली कुंकू हसलं’. एका पूर्णपणे वेगळ्या पार्श्वभूमीतील दोन व्यक्तींमध्ये तयार होणारे नाते आणि त्याचा प्रवास, ही या मालिकेची मध्यवर्ती कल्पना आहे. कृष्णा, एक कष्टाळू, स्वाभिमानी शेतकरी मुलगी, जिला आपल्या गावाशी, शेतीशी आणि संस्कृतीशी घट्ट नातं आहे. आणि दुष्यंत गावाचा तिटकारा असणारा श्रीमंत, आधुनिक विचारसरणीचा तरुण. या दोघांची गाठ एका अपघातात पडते. परंतु हा अपघात त्यांच्या आयुष्यात प्रेमाचं बीज रोवतो की संघर्षाची नांदी ठरतो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.(Halad Rusali Kunku Hasal)

‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेतील कीर्तीची भूमिका गाजवणारी समृद्धी केळकर या मालिकेत कृष्णाची भूमिका साकारत आहे. तिला मिळालेलं प्रेक्षकांचं प्रेम लक्षात घेता, तिच्या या नव्या भूमिकेची उत्सुकता दाटून आली आहे. कृष्णा ही भूमिका तिच्यासाठी खास आहे कारण यात तिला कोल्हापुरी बोलीपासून ते शेतीच्या कामांपर्यंत अनेक नव्या गोष्टी शिकायला मिळत आहेत. समृद्धी सांगते की, “हा रोल माझ्यासाठी खूप वेगळा आहे. यामध्ये मी एक शेतकरी साकारतेय. त्यामुळे लूक अगदी नैसर्गिक ठेवला आहे, जणू काही ती खरी कोल्हापुरी शेतकरी मुलगीच आहे.” तसेच ‘मन धागा धागा जोडते नव्या’ मालिकेनंतर अभिनेता अभिषेक रहाळकर प्रेक्षकांच्या भेटीला एका हटके भूमिकेत येतो आहे. त्याचं पात्र दुष्यंत हे असेल. घरची संपत्ती, प्रतिष्ठा असूनही गावाकडे पाठ फिरवलेला तरुण. अभिषेक यासाठी दोन महिने विशेष तयारी करत होता. या भूमिकेबद्दल सांगताना तो म्हणतो की. “हे पात्र माझ्यासाठी नवीन आहे. मी खूप नशिबवान आहे की इतक्या वेगवेगळ्या भूमिकांमध्ये काम करण्याची संधी मिळते आहे,”

हळद रुसली कुंकू हसलं ही मालिका केवळ एका लग्नाची किंवा प्रेमकथेची गोष्ट नाही, तर ही आहे दोन विचारधारांमधील संघर्षाची आणि नात्यांच्या जडणघडणीची कहाणी. एकीकडे शेतीचा अनुभव असलेली, पण शिक्षणापासून वंचित राहिलेली मुलगी आणि दुसरीकडे शहरात वाढलेला, पण गावाकडे पाठ फिरवणारा तरुण – या दोन टोकांच्या धृवांना एकत्र आणणारी ही कथा नक्कीच प्रेक्षकांना भावणार आहे.(Halad Rusali Kunku Hasal)
====================================
=====================================
या मालिकेची कथा कोल्हापूरच्या पार्श्वभूमीवर आधारित असून त्यात त्या भागाची बोली, जीवनशैली आणि शेती संस्कृतीचं प्रामाणिक दर्शन घडतं. त्यामुळे ही मालिका ग्रामीण भागातील प्रेक्षकांसाठी तर जवळची वाटेलच, पण शहरातील प्रेक्षकांनाही एक वेगळा अनुभव देईल. जर तुम्हाला कृष्णा आणि दुष्यंतच्या आयुष्याचा प्रवास, त्यांचं नातं, त्यांच्यातील संघर्ष आणि प्रेमाची नवी सुरुवात पाहायची असेल, तर हळद रुसली कुंकू हसलं ही मालिका तुम्हाला नक्की आवडेल.