Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Krantijyoti Vidyalaya Marathi Madhyam ने दिलं मराठी शाळांच्या शिक्षक-विद्यार्थ्यांना नवं

Ranapati Shivray Swari Agra Trailer: छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा सांगणाऱ्या

Bigg Boss Marathi 6: ‘तो माझा हात कधीच सोडत नाही…’ राधा

Bigg Boss Marathi 6: सागरच्या सल्ल्यामुळे घरात मतभेदांचा भडका; सदस्यांमध्ये वैचारिक संघर्ष!

Sanam Teri Kasam सिनेमातील एका गाण्याच्या मेकिंगचा भन्नाट किस्सा!

डायलॉगशिवाय गांधी विचार मांडणारा Gandhi Talks; सिद्धार्थ जाधव झळकणार विजय

एक स्त्री म्हणून माफी…”, राकेश बापट प्रकरणावर Neha Shitole हिची

हमाली करणाऱ्या Roshan Bhajankarने कष्टाचे दिवस काढले; नशीबाने थेट उघडलं

“शिवरायांवर जर का आम्ही चित्रपट करत असू तर…”; Digpal Lanjekar

Rubaab Marathi Movie Trailer: प्रेम, संघर्ष आणि स्वाभिमान असलेल्या डॅशिंग

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

HARDIK SHUBHECHCHAA Marathi Movie: प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणाऱ्या ‘हार्दिक शुभेच्छा … पण त्याचं काय?’  चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित

 HARDIK SHUBHECHCHAA Marathi Movie: प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणाऱ्या ‘हार्दिक शुभेच्छा … पण त्याचं काय?’  चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित
HARDIK SHUBHECHCHAA Marathi Movie
मिक्स मसाला

HARDIK SHUBHECHCHAA Marathi Movie: प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणाऱ्या ‘हार्दिक शुभेच्छा … पण त्याचं काय?’  चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित

by Team KalakrutiMedia 06/02/2025

HARDIK SHUBHECHCHAA Marathi Movie: मराठी चित्रपटसृष्टीतील एक अनोखा आणि वेगळा विचार घेऊन प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवणारा अभिनेता, दिग्दर्शक पुष्कर जोग पुन्हा एकदा एका अनोख्या विषयावर भाष्य करणारा चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. त्याच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘हार्दिक शुभेच्छा … पण त्याचं काय?’ असून लैंगिक सुसंगतता या विषयावर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. या चित्रपटाचे मोशन पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले असून यात एका नवविवाहित दाम्पत्य पाहायला मिळत आहे. ही कथा प्रेक्षकांना नातेसंबंधातील एका महत्वाच्या पैलूशी जोडून ठेवेल. “हार्दिक शुभेच्छा … पण त्याचं काय?” या चित्रपटात वैवाहिक जीवनातील लैंगिक सुसंगतीचे महत्त्व अधोरेखीत करण्यात आले आहे.(HARDIK SHUBHECHCHAA Marathi Movie)

HARDIK SHUBHECHCHAA Marathi Movie
HARDIK SHUBHECHCHAA Marathi Movie

हा चित्रपट २१ मार्च २०२५ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून यात पुष्कर जोग, हेमल इंगळे, पूर्वी मुंदडा, विशाखा सुभेदार, अभिजीत चव्हाण, अनुष्का सरकटे, पृथ्विक प्रताप, विजय पाटकर, भरत सावळे आणि किशोरी अंबिये यांच्या  प्रमुख भूमिका आहेत. पुष्कर जोग यांच्या आधीच्या चित्रपटांप्रमाणेच, या चित्रपटातही नात्यातील गुंतागुंत, भावनिक संघर्ष, आणि जीवनातील काही कंगोरे मांडण्यात आले आहेत. पुष्कर जोगचे चित्रपट प्रेक्षकांना  नेहमीच विचार करायला भाग पाडणारे असतात आणि हा चित्रपटही त्या परंपरेतून तयार झाला आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण दुबईसह ॲमस्टरडॅम आणि पॅरिसमध्ये झाले असून खासियत म्हणजे ॲमस्टरडॅम आणि पॅरिस मध्ये चित्रित होणारा हा पहिला मराठी चित्रपट आहे.(HARDIK SHUBHECHCHAA Marathi Movie)

==================================

हे देखील वाचा: पुन्हा होणार कॉमेडीचा धमाका; Ankush Chaudhari घेऊन येत आहे ‘नो एंट्री पुढे धोका आहे – कॉमेडी ॲाफ टेरर्स’ !

==================================

दिग्दर्शक पुष्कर जोग म्हणतात, “आजच्या आधुनिक काळातही लैंगिक सुसंगतता हा विषय अनेकदा दुर्लक्षित केला जातो. नातेसंबंधांना फक्त भावनिक किंवा मानसिक बळ पुरेसं नसतं, तर शारीरिक सुसंगतता देखील तेवढीच महत्त्वाची आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून आम्ही हा विषय एका सहज पद्धतीने प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे.”

====================================

हे देखील वाचा: Chiki Chiki BooBoom Boom Movie Teaser: ‘चिकी चिकी बुबूम बुम’ चित्रपटाचा धमाल टिझर भेटीला

====================================

आनंद पंडित मोशन पिक्चर्स प्रस्तुत, गुझबम्प्स एंटरटेनमेंट यांच्या सहयोगाने ‘हार्दिक शुभेच्छा … पण त्याचं काय?’ हा चित्रपट येत्या २१ मार्च २०२५ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन व लेखन पुष्कर जोग यांनी केले असून आनंद पंडित, रुपा पंडित आणि पुष्कर जोग निर्माते आहेत. तर या चित्रपटाचे सहलेखन नमिष चापेकर यांनी केले आहे. पॅनोरमा स्टुडिओजने या चित्रपटाच्या वितरणाची धुरा सांभाळली आहे.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Entertainment HARDIK SHUBHECHCHAA Marathi Movie HARDIK SHUBHECHCHAA Marathi Movie Poster Marathi Movie pushkar jog
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.