एका राजकुमाराची लव्हस्टोरी…..
हॅरी…. ब्रिटनच्या राजघराण्याचा माजी राजकुमार… (कारण हॅरी आणि त्याची पत्नी मेगन यांनी राजघराण्यापासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे.) चार्लस आणि डायना यांचा दुसरा मुलगा… आधीच ब्रिटनचं राजघराणं प्रसिद्धीच्या कायम झोतात असतं. त्यात राजकुमारी डायनाच्या अपघाती मृत्यूनंतर विल्यम आणि हॅरी या तिच्या दोन मुलांकडे बघण्याचा दृष्टीकोण बदलला… आईच्या अकाली मृत्यूचा आघात झेलणारे राजकुमार… अशी सहानुभूती त्यांना मिळाली… त्यातही लहान असलेला हॅरी अधिक लोकप्रिय झाला. त्याची प्रत्येक कृती लोकांना भावत होती. मोठ्या भावाच्या मागे रहाणारा हा लाजरा बुजरा राजकुमार थेट लेडी डायनाची आठवण तिच्या चाहत्यांना करुन द्यायचा… तसाच चेहरा… त्यामुळेही त्याची लोकप्रियता वाढत होती. थोडासा खटयाळ.. खोडकर हॅरी मोठ्या भावाच्या लग्नात त्याला चिडवतांना दिसला, त्याचीही मोठी बातमी झाली. या हॅरीनं आपलीही जीवनसाथी निवडली… पण परंपरा प्रिय असलेल्या ब्रिटनच्या राजघराण्याला हा थोडासा धक्का होता… कारण हॅरीची निवड ही अमेरिकन होती… मेगन मार्कल… अमेरिकन अभिनेत्री… त्यातून घटस्फोटीता… राजघराण्याच्या एकूणच नियमा विरोधात हे सर्व होतं… पण हॅरी ठाम होता… अखरे या राजकुमाराचं लग्न झालं… या मेगन आणि हॅरीच्या प्रवासात असे धक्केच खूप होते आणि अजूनही आहेत… या लाडक्या राजकुमाराचा हा सगळा प्रेमाचा आणि राजघराण्याच्या परंपरांचा प्रवास पहायचा असेल तर fyi tv18 या चॅनेलवर येणारी ‘Harry and Meghan a Royal Romance’ ही स्टोरी नक्की बघा…. 19 मे रोजी या इंग्लडच्या राजघराण्यातील राजकुमाराची प्रेमकथा सादर होणार आहे..
ब्रिटनचा राजकुमार हॅरी आणि अमेरिकन अभिनेत्री मेगन मार्कल यांचा शाही विवाहसोहळा 19 मे 2018 रोजी झाला. विंडसर कॅसलमधील सेंट जॉर्ज चॅपलमध्ये 600 पाहुण्यांच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा झाला. 36 वर्षाच्या मेगनचे हे दुसरे लग्न.. 2011 मध्ये तिने अमेरिकन निर्माता ट्रेवर एंजलसन सोबत लग्न केले होते. हॅरी आणि मेगनची ही स्वप्नवत लव्हस्टोरी खूप दिवस अनेक न्यूज चॅनेलवर चालली. पेपरमध्ये कॉलम आले… अनेक लेख लिहिले गेले. पण या प्रेमीयुगुलाची मानसिकता लग्नच्या आधी नेमकी कशी होती, हे कधी उलगडले नाही. हॅरी हा कोणी साधासुधा मुलगा नाही… तो ब्रिटनच्या राजघराण्याचा राजकुमार… राजगादीच्या वारसांची जी लांबलचक यादी आहे, त्या यादीत पाचव्या नंबरवर हा हॅरी आहे, अर्थात आता हॅरी होता असे म्हणावे लागेल. कारण या राजकुमाराने आपले सर्व हक्क सोडून दिले आहेत. एका राजकुमाराच्या आयुष्यात हा बदल खूप मोठा असतो. हॅरी सध्या आपली पत्नी मेगन आणि एक वर्षाचा मुलगा आर्ची यांच्यासह अमेरिकेच्या लॉस एंन्जलीस येथे स्थाईक झाला आहे. इंग्लडला या राजकुमाराचे स्वतःचे असे मोठे महल आहेत. हे सर्व सोडून त्याला साधारण माणसासारखं आयुष्य जगायचं होतं म्हणे… त्यामुळे राजघराण्याच्या परंपरांची चौकट मोडून तो वेगळा झाला. आपल्या पत्नीला आणि मुलाला घेऊन तो बाहेर पडला…. आता नुकताच त्याचा आणि मेगनचा तोंडाला माक्स लावून फिरतांनाचा फोटो व्हायरल झाला. तर त्यांचा मुलगा आर्ची याच्या एक वर्षाच्या वाढदिवसाचा व्हिडोओही सध्या चर्चेत आहे. एकूण हे जोडपे राजघराण्याची चौकट तोडून खूष दिसत आहे. पण या दोघांनी या आपल्या स्वातंत्र्यासाठी नेमकी काय किंमत मोजली याची कल्पनाही करु शकत नाही. असो….. मुळात हॅरी आणि मेगनचे लग्न होणे ही सुद्धा मोठी गोष्ट होती. कारण मेगन ही अमेरिकन… त्यात अभिनेत्री… आणि भरीस भर म्हणजे घटस्फोटीत… हॅरीपेक्षा वयानं थोडी मोठी… एकूण हॅ्रीचं हे प्रेमप्रकरण बाहेर आलं तेव्हा राजघराण्यासाठी आणि राजघराण्यावर निष्ठा ठेवणा-यांसाठीही हा मोठा धक्का होता.
यावर खूप मोठा गजहब झाला. मोठा विरोध.. पण हॅरी ठाम राहीला… मेगन ही हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री… हॅरीबरोबर तिची ओळख होण्यापूर्वी तिचं लग्न झालं होतं… आणि घटस्फोटही… तिचं सगळं शिक्षण अमेरिकत झालं. तिथेच तिने पहिल्यांदा रंगभूमी मग टिव्ही आणि चित्रपटात अभिनेत्री म्हणून काम केलं. 2011 मध्ये तिचं लग्न झालं… पण नंतर घटस्फोटही झाला. हॅरी आणि तिचं प्रेमप्रकरण सुरु झाल्यावर तिनं 2017 मध्ये हॉलीवूडचा निरोप घेतला. कारण हॅरी हा राजकुमार…. त्याच्या पत्नीनं असं चित्रपटात काम करणं मान्य होणार नाही, हे या जोडप्याला माहित होतं. हॅरीनं मेगन आणि त्याच्या या प्रेमाची आणि लग्नाच्या निर्णयाची पहिली माहिती त्याच्या मोठ्या भावाला, विल्यमला दिल्याचे बोलले जाते. त्याच्या मध्यस्थीने हे प्रकरण राणीपर्यंत पोहचवण्यात आले. कारण या विवाहाला राणीची अर्थात हॅरीच्या आजीची परवानगी गरजेची होती. प्रथम या सगळ्याला विरोध होणे स्वाभाविक होते. कारण मेगनचा स्वभावही मोकळा असल्याने ती राजघराण्याच्या परंपरा मानणार नाही, अशी शंका घेण्यात येत होती. पण हॅरीला परवानगी मिळाली…. एवढंच नाही तर मोठ्या विल्यमच्या लग्नात जेवढा खर्च झाला नाही त्याच्यापेक्षा दुप्पट खर्च राजघराण्यानं या लग्नावर केला. मेगनला विरोध करणा-या राणीनं तिला सहज स्विकारंही. अगदी तिच्यासाठी काही परंपराही मोडण्यात आल्या. लग्नानंतर मेगनलाही राजकुमारीचा दर्जा मिळाला… चार्लस सारखी लोकप्रियताही मिळाली… या दोघांना आर्ची नावाचा छोटा राजकुमार झाला… आता हे जोडपं पुन्हा राजघराण्याला धक्का देऊन वेगळं रहात आहे… एकूण काय या राजकुमाराचा सर्व प्रवास पहाण्यासारखा आहे.
त्यामुळे 19 मे रोजी FYI TV18 ला नक्की भेट द्या…
सई बने