Prajakta Mali मुंबई सोडून चालली? अभिनेत्रीच्या पोस्टने चाहत्यांना बसला धक्का !

“प्रत्येक चित्रपटाच्या पहिल्या शॉट आधी तुमच्या पाया पडायचो पण आता….”; मेकअप आर्टिस्टच्या निधनामुळे Abhishek Bachchan झाला भावूक
सर्वसाधारणपणे असं म्हटलं जातं की नातेवाईकांपेक्षा शेजारी चांगले असावेत, कारण अडीअडचणीला तेच धावून य़ेतात… अगदी तसंच; इंडस्ट्रीत कुणावर विश्वास ठेवणं फार कठिण असतं… आणि त्यामुळेच बऱ्याचदा बॉलिवूडचे सेलिब्रिटी त्यांचे पर्सनल मेकअप आर्टिस्ट किंवा पीए कायम सोबत ठेवतात… इंस्ट्रीतल्या एका अभिनेत्याच्या एका अशाच जवळच्या व्यक्तीचं निधन झालं आहे… अभिषेक बच्चनच्या मराठमोळ्या मेकअप आर्टिस्टचं निधन झालं असून तब्बल २७ वर्षांची त्यांची साथ अखेर सुटली आहे.. (Abhishek Bachchan Makeup Artist News)
अभिषेक बच्चन याचे मेकअप आर्टिस्ट अशोक सावंत (Ashok Sawant) यांच निधन झालं असून अभिषेकने भावूक होत सोशल मिडियावर एक पोस्ट करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे… अभिषेकने पोस्ट करत लिहिलं आहे की,अ”शोक दादा आणि मी 27 वर्षांपेक्षा जास्त काळ एकत्र काम करत होतो. माझ्या पहिल्या चित्रपटापासून ते माझा मेकअप करत होते. ते केवळ माझ्या टीमचाच भाग नव्हेत तर कुटुंबाचा सुद्धा भाग होते. त्यांचा मोठा भाऊ दीपक जवळजवळ 50 वर्षांपासून माझ्या वडिलांचा मेकअप मॅन आहे”.

पुढे त्याने लिहिलं आहे की, “गेल्या काही वर्षांपासून ते आजारी होते त्यामुळे त्यांना नेहमी माझ्यासोबत सेटवर यायला जमायचं नाही. पण जेव्हा जेव्हा मी शूट करायचो तेव्हा असा एकही दिवस नव्हता जेव्हा ते माझी चौकशी करत नसत. त्यांनी पाठवलेला त्यांचा सहाय्यक माझा मेकअप नीट करतोय की नाही याची काळजी घेत असत. ते खूप प्रेमळ, सौम्य आणि मनमिळाऊ व्यक्ती होते. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीच हसू असायचे, त्यांची उबदार मिठी अजूनही आठवते आणि चटपटीत चिवडा किंवा भाकर वाडी ही त्यांच्या बॅगेत असायचीच. मी नव्या चित्रपटाचा पहिला शॉट द्यायचो तेव्हा मी त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घ्यायचो. आता या पुढे मला स्वर्गाकडे पहावे लागेल आणि तुम्ही खाली पाहून मला आशीर्वाद द्याल अशी आशा आहे”.
“धन्यवाद दादा, तुमच्या प्रेमाबद्दल, तुमच्या काळजीबद्दल, तुमच्या सन्मानाबद्दल, तुमच्या प्रतिभेबद्दल आणि तुमच्या हास्याबद्दल. कामावर जाताना यापुढे तुम्ही माझ्यासोबत नसाल ही गोष्ट आतापासूनच माझ्या हृदयला पिळवटून टाकत आहे. मी प्रार्थना करतो की तुम्ही शांततेत असाल आणि जेव्हा आपण पुन्हा भेटू तेव्हा तुमच्या अस्वलाच्या मिठीची मी आतुरतेने वाट पाहत आहे. शांती आणि आनंदात राहा अशोक सावंत”…. (Bollywood News)
================================
हे देखील वाचा : Karishma Kapoor ने अभिषेक बच्चनसोबत ब्रेकअप केल्यानंतर काही महिन्यांनीच….
================================
अभिषेक बच्चनच्या या भावूक पोस्टवर रणवीर सिंह, वरुण धवन, रेमो डिसूझा, करण जोहर, नव्या नंदा. राहुल देव, बोमन इराणी, चित्रांगदा सिंह, रवीना टंडन, रितेश देशमुख यांसारख्या कलाकारांनी त्यांच्या आठवणींना उजाळा भावपूर्ण आदरांजली वाहिली आहे…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi