राणी मुखर्जी आणि Shah Rukh Khan पुन्हा एकत्र दिसणार?; ;त्या;

Isha Deol : अभिषेक बच्चन जावई व्हावा अशी होती हेमा मालिनींची इच्छा!
बॉलिवूडमध्ये कपल्सचं ब्रेकअप होणं किंवा १०-१२ वर्ष झालेली लग्न मोडणं ही प्रकरण फारच समोर येत आहेत… अशातच गेल्या काही काळापासून ईशा देओल हिचं वैयक्तिक जीवन तिच्या घटस्फोटामुळे चांगलंच चर्चेत आहेत… १२ वर्षांच्या सुखी संसारानंतर हेमा मालिनी (Hema Malini) यांची लेक ईशा देओल हिने पती भरत तख्तानीसोबत घटस्फोट घेतला… परंतु, तुम्हाला माहित आहे का? हेमा मालिनी यांना ईशा देओल हिने बच्चन कुटुंबाची सून व्हावी अशी इच्छा होती… चला तर जाणून घेऊयात हा किस्सा… (Bollywood couple gossips)

अभिनेत्री हेमा मालिनी यांनी बऱ्याच वर्षांपूर्वी करण जोहच्या ‘कॉफी विथ करण’मध्ये (Coffee With Karan) अभिषेक बच्चन माझा जावई व्हावा अशी माझी इच्छा आहे असं म्हटलं होतं… कारण, हेमा मालिनी, धर्मंद्र, जया आणि अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचे घरगुती संबंध असल्यामुळे अभिषेकला लहानाचं मोठं झालेलं हेमा यांनी पाहिलं होतं… त्यामुळे आपल्या लेकीसाठी अभिषेक परफेक्ट पार्टनर असेल असं त्यांना कायम वाटायचं…(Isha Deol Divorce)

हेमा मालिनी यांच्या या इच्छेबद्दल ईशा देओलला एका मुलाखतीत विचारण्यात आलं असता ती म्हणाली होती की, “माझी आई माझ्यावर खूप प्रेम करते. तिने अभिषेकच नाव घेतलं कारण तो त्यावेळी मोस्ट बॅचलर होता. तिला मी एका चांगल्या व्यक्तीसोबत लग्न करावं असं वाटत होतं आणि तिच्या मते, अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) हा माझ्यासाठी योग्य मुलगा होता. पण, मी त्याच्याकडे भावाच्या नात्यानेच पाहिलं असल्यामुळे आमचं लग्न होऊ शकत नाही, असं तिने स्पष्टपणे सांगितलं होतं…
============================
हे देखील वाचा : Karishma Kapoor ने अभिषेक बच्चनसोबत ब्रेकअप केल्यानंतर काही महिन्यांनीच….
============================
दरम्यान, अभिषेक बच्चननंतर विवेक ऑबरॉय (Vivek Oberoi) सोबत ईशाचं लग्न व्हावं अशी देखील हेमा मालिनींची इच्छा होती… मात्र, तो माझ्या Type चा नाही आहे असं ईशा स्पष्टपणे म्हणाली होती… ईशाने कुठल्याच सेलिब्रिटीसोबत लग्नबंधनात न अडकता तिच्या बालपणीच्या मित्रासोबत लग्न केलं होतं… एकीकडे वैयक्तिक जीवन चर्चेत असताना ईशा देओल पुन्हा एकदा चित्रपटात यावी अशी तिच्या चाहत्यांची इच्छा आहे…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi