Ashok Saraf : ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीने अशोक सराफ यांच्याशी अनेक

Hemant Dhome: तू Superstar आहेस आणि कायम राहणार! हेमंत ढोमेने केले ‘या’ अभिनेत्याचे भरभरून कौतुक
आपण असे अनेकदा ऐकले आहे की, मनोरंजनविश्वात कोणतीच नाती ही कायमस्वरूपीची नसतात. इथे फक्त कामपुरतीच नाती जोडली जातात असे देखील म्हटले जाते. याला नक्कीच अनेक कलाकार आणि त्याची नाती अपवाद आहेत. मनोरंजनविश्वातील सर्वाधिक चर्चेत येणारे आणि गाजणारे नाते म्हणजे मैत्रीचे. कलाकार अनेक दिवस, महिने सोबत राहून काम करतात. त्यामुळे त्यांच्यात मैत्रीचे नाते तयार होते. काही कलाकारांची मैत्री कायम टिकते तर काहींची काळानुसार संपुष्टात येते. (Hemant Dhome)
मात्र इंडस्ट्रीमध्ये असे देखील अनेक कलाकार आहेत ज्यांची मैत्री वर्षानुवर्षे कायम आहे. अगदी संघर्षाच्या काळापासून ते आज यश मिळवल्यानंतरही. असेच दोन मित्र असलेले प्रसिद्ध कलाकार म्हणजे हेमंत ढोमे आणि अमेय वाघ (Hemant Dhome and Amey Wagh). हेमंत आज मराठी मनोरंजनविश्वातील अतिशय प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता आहे. तर अमेय देखील एक उत्तम अभिनेता असून तो मराठीसोबतच हिंदीमध्ये देखील काम करता दिसतो. सध्या हेमंत आणि अमेय खूपच चर्चेत आले आहे. याचे कारण म्हणजे हेमंतने अमेयला केलेली खास पोस्ट. हेमंतने नुकतीच अमेयला एक स्पेशल पोस्ट शेअर केली. यासोबत त्याने त्यांचे काही फोटो देखील शेअर केले आहेत.(Entertainment Masala)
हेमंतने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले, “कंट्रोल नसणारे… ते कंट्रोल असणारे दोघे! २००६ साली म्हणजे बरोबर १८ वर्षांपूर्वी आपण दोघांनी एकत्र काम केलं होतं लूज कंट्रोल या आपल्या नाटकात आणि त्यानंतर आज फसक्लास दाभाडे ला आपण पुन्हा एकत्र आलो चित्रपटात! मधल्या काळात काय काय घडून गेलं… तुझा प्रचंड inspire करणारा प्रवास मी प्रेमाने आणि अभिमानाने बघत होतो…आपण जेव्हा जेव्हा एकत्र आलो तेव्हा वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न केला… लोकांना आनंद देण्याचा प्रयत्न केला! आपण कंट्रोल लूज करून जे काही केलं ते फसक्लासंच केलं आणि लोकांना लक्षात राहिल असंच काम केलं! (Hemant Dhome)
A post shared by Hemant Dhome | फसक्लास ढोमे (@hemantdhome21)
अमुडी आता मधला १८ वर्षांचा काळ भरून काढायचांय, खूप काम करायचंय! तुझ्या कामातला अफाट प्रामाणिक पणा आणि माझी जिद्द या जोरावर आपण काहीतरी constructive घडवू एवढं नक्की! माझ्या प्रेमळ, येड्या आणि तितक्याच innocent सोनू ला तू पडद्यावर साकारलंस आणि नुसतं साकारलं नाहीस तर ‘तोडलंस’ त्या बद्दल तुला घट्ट मिठी आणि खूप प्रेम! बाकी आता एकत्र रहायचं, मग सग्गळं होतंय आपोआप! तू Superstar आहेस आणि कायम राहणार! LOVE YOU!”
दरम्यान हेमंत आणि अमेय यांची खूपच जुनी ओळख आहे. त्याने पोस्ट केलेला त्यांचा जुना फोटो हा १८ वर्ष जुना आहे. मात्र मधल्या काही काळात त्यांच्यात काही वाद झाले आणि खटके उडले यामुळे त्यांच्या अनेक वर्ष अबोला होता. पण पुढे काळानुसार त्यांच्यातला वाद शमला आणि ते पुन्हा बोलायला लागले. हेमंत आणि अमेय यांनी ‘फसक्लास दाभाडे’ चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र काम केले आहे.
==============
हे देखील वाचा: घरोघरी मातीच्या चुली मालिकेत दिसणार सुप्रसिद्ध बॉलीवुड अभिनेता Vicky kaushal!
Gurucharan Singh कर्जात बुडालेल्या ‘तारक मेहता’ फेम गुरुचरण सिंगला कामाची गरज
==============
हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘फसक्लास दाभाडे’ (fussclass dabhade) हा सिनेमा सध्या कमालीचा गाजत आहे. २४ जानेवारी २०२५ ला रिलीज झालेलय या सिनेमाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. भावाबहिणीच्या नात्यावर भाष्य करणाऱ्या या चित्रपटात अभिनेता सिद्धार्थ चांदेकर, अमेय वाघ, क्षिती जोग, निवेदिता सराफ, राजसी भावे, मिताली मयेकर, हरीश दुधाडे आदी अनेक कलाकार महत्वाच्या भूमिकेत दिसत आहे. (Latest Marathi Movies)