ऑल्फ्रेड हिचकॉकच्या सिनेमाचा हिंदी रिमेक!
सस्पेन्स सिनेमाचा (Cinema) बाप म्हणून जगभरातील प्रेक्षक ज्याला ओळखतो हॉलीवुड चा द ग्रेट डायरेक्टर ऑल्फ्रेड हिचकॉक यांच्या सिनेमांनी (Cinema) जागतिक सिनेमावर फार मोठा ठसा उमटवला आहे. १९५२ साली त्यांचा एक चित्रपट आला होता. ‘डायल एम फॉर मर्डर’. याच सिनेमाची (Cinema) थीम घेऊन भारतात १९८५ साली ‘ऐतबार’ नावाचा चित्रपट आला होता. या भारतीय सिनेमा (Cinema) थोडेफार बदल नक्कीच केले होते; पण मूळ ढाचा हा ‘डायल एम फॉर मर्डर’ चाच होता. चित्रपटाचे कथानक जबरदस्त होते.उत्कंठा वर्धक होते.
एक पोलिसी चातुर्यकथा होती. जयदीप (राज बब्बर) आणि नेहा (डिंपल कपाडिया) ही लग्न झालेली जोडी असते. दोघांमध्ये फारसा सुसंवाद नसतो. सागर (सुरेश ओबेरॉय) एक गझल गायक असतो. डिंपल ला संगीताची आवड असल्याने साहजिकच ती सुरेश ओबेराय यांच्या गजलांची चाहती असते. त्या दोघांची होणारी जवळीक राजबब्बर ला आवडत नसते. त्यामुळे तिचा काटा काढायचे तो ठरवतो. त्यासाठी तो विकी (शरत सक्सेना) या गुंडाला ला सुपारी येतो. प्लॅननुसार राजबब्बर एका पार्टीत सुरेश ओबेरॉय ला भेटणार असतो. इकडे डिंपल कपाडिया घरी एकटीच असणार असते. राज बब्बर त्या पार्टीतून तिला घरी फोन करणार असतो. शरत सक्सेना कडे फ्लॅटची एक चावी ऑलरेडी दिलेली असणार असते. या वेळी तिच्या घरात शरत सक्सेना येणार असतो. डिम्पल फोनवरती बोलत असताना पाठीमागून जावून शरत सक्सेनाने तिला गळा आवळून मारून टाकायचे असते. सर्व प्लॅनिंग परफेक्ट झालेली असते. फ्लॅटची एक चावी शरद सक्सेनाकडे दिलेली असते.
ठरलेल्या प्लॅन नुसार सर्व काही घडत असते. राज बब्बर पार्टीतून ठराविक वेळेला बरोब्बर डिंपल ला फोन करतो. त्या पावसाळी रात्री डिंपल फोन उचलते. पलीकडून कोणीच बोलत नाही. ती हॅलो हॅलो करत राहते. त्याचवेळी घरात दबा धरून बसलेला शरत सक्सेना पाठीमागून जावून वायर ने तिचा गळा आवळतो. पण स्वसंरक्षणार्थ डिंपल मुकाबला करते. आणि शरत सक्सेना लाच मारून टाकते!! आता प्लॅन चौपट झालेला असतो. राजबब्बर वाट पाहत असतो शरत सक्सेना च्या फोनची. पण आता फोन आलेला असतो डिंपलचा आणि ती सांगते ,”माझ्या हातून एक खून झाला आहे.” अशा बदललेल्या परिस्थितीचा गैर फायदा घ्यायचा तो प्रयत्न करतो पोलिसांना पाचारण करून डिंपल ला पोलिसांच्या हवाली करून टाकतो. वर वर तिला मी तुला सोडवतो असे नाटक करतो.
पोलीस तपास करणारा अधिकारी बारुआ (डॅनी) याला सुरुवातीपासूनच थोडी शंका येत असते. तो राजबब्बर ची सर्व कुंडली , त्याचे कॅरेक्टर शोधून काढतात. पैशाकडे पाहून त्याने तिच्याशी लग्न केलेले असते. त्याचा बाहेरख्याली पणा आणि व्यसने चालू असतात. तिच्या गडगंज पैशावर त्याचा डोळा असतो. आणि त्या साठीच तिचा काटा काढण्याचा त्याचा प्लान असतो. पुढे कोर्टात केस उभी राहते आणि डिंपल ला खुनी समजून कोर्ट तिला शिक्षा देते. कोर्टाचे काम जरी संपले असले तरी पोलीस अधिकारी स्वतःचे इन्वेस्टीगेशन चालूच ठेवतो. आणि त्यातून त्याला राज बब्बर खरे रूप लक्षात येते. त्याचे पितळ उघडे पडते! सिनेमाचे भारतीय रूपांतर करताना दिग्दर्शकाने यात काही बदल यात केले होते आणि ते नक्कीच चांगले होते.
हे देखील वाचा : ‘या’ कारणामुळे काजोलने नाकारला चक्क मणीरत्नमचा चित्रपट!
चित्रपटाचे दिग्दर्शक मुकुल आनंद यांनी केले होते. मुकुंद आनंद यांचा हा दुसरा चित्रपट. यांचा पहिला चित्रपट ‘कानून क्या करेगा’ १९८३ साली आला होता. या चित्रपटात डॅनी डेंजप्पा ने साकारलेला पोलीस अधिकारी जबरदस्त होता. खरंतर डॅनी सारख्या उत्तम कलाकाराला चांगल्या भूमिका खूप अभावानेच मिळाल्या. त्यातली ही एक भूमिका होती. या पूर्वी त्याने बी आर चोपडाच्या ‘धुंद’ (१९७४) मध्ये अशीच जबरदस्त भूमिका केली होती. ‘ऐतबार’ हा चित्रपट बप्पी लहरी यांच्या संगीतासाठी देखील आठवला जातो.
भूपिंदर सिंग आणि आशा भोसले यांनी गायलेली गाणी जबरदस्त होती. हसन कमाल आणि फारुख कैसर यांनी लिहिली होती. ‘किसी नजर को तेरा इंतजार आज भी है’ , ‘आवाज दि है आज इक नजर ने’ त्या काळात खूप गाजली होती. राज बब्बर आणि डिंपल यांचा अभिनय जबरदस्त होता. डिस्ट्रीब्युटर्स मात्र हा चित्रपट उचलायला तयार नव्हते. म्हणून मुकुल आनंद यांनी लीना दास याचा एक हॉट कॅब्रे या सिनेमात (Cinema) टाकला होता. खरंतर सिनेमा (Cinema) पाहिल्यावर त्याची काय आवश्यकता वाटत नाही. डिस्ट्रीब्यूटर साठी टाकला गेला. चित्रपटाला चांगले यश मिळाले. हॉलीवुड चे अनेक चित्रपट भारतामध्ये रीमेक होत असतात. सगळेच व्यवस्थित होतात अशातला भाग नाही पण ‘ऐतबार’ हा बऱ्यापैकी मूळ कलाकृतीचे प्रामाणिक राहिला असे म्हणता येईल.