Ranveer Singh : आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ चित्रपटाचा टीझर ‘या’

Cannes2025: टॉम क्रुझच्या चित्रपटालाही भारतीय चित्रपटाने टाकलं मागे!
७८व्या कान्स फिल्म फेस्टिवलला (78th cannes film festival) जगभरातील कलाकारांनी हजेरी लावली आहे. यात भारतीय कलाकारांनी आपली संस्कृती जपत रेड कार्पेटवर एन्ट्री घेतली होती. हिंदीसह मराठीतील दोन अभिनेत्रींनी कान्समध्ये उपस्थिती दाखवत मराठी चित्रपटसृष्टीचं प्रतिनिधित्व केलं. इतकंच नव्हे तर मराठीतील ४ चित्रपटांचं स्क्रिनिंगही कान्समध्ये संपन्न झालं. अशात हिंदीतील एका चित्रपटाच्या स्क्रिनिंगनंतर उपस्थित प्रेक्षकांनी चक्क ९ मिनीटांचं स्टॅंडिंग ओवेशन दिलं. कोणता आहे हा चित्रपट जाणून घ्या…(Bollywood global news)

दिग्दर्शक नीरज घेयवान यांचा हिंदीतील चित्रपट ‘होमबाउंड’ (Homebound) यंदाच्या कान्स चित्रपट महोत्सवात २१ मे रोजी प्रदर्शित करण्यात झाला. या चित्रपटात जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) आणि ईशान खट्टर प्रमुख भूमिकेत असून करण जोहरच्या (Karan Johar) धर्मा प्रॉडक्शन्सने चित्रपटाची निर्मिती केली आहे. कान्समधील होमबाउंड’ चित्रपटाचा प्रीमियर एक अविस्मरणीय क्षण ठरला आहे. (Entertainment news)
==================
हे देखील वाचा : Ajay Devgan : ‘अजय ते विजय साळगांवकर’;बॉलिवूडमध्ये 9 मराठी पात्र साकारणारा देवगण!
==================
आनंद आणि अभिमानाची बाब म्हणजे कान्समध्ये होमबाउंड’ या भारतीय चित्रपटाने टॉम क्रुझच्या (Tom Cruise) चित्रपटालाही मागे टाकलं आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर तब्बल ९ मिनिटे प्रेक्षक उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात चित्रपटाचं कौतुक करत होते. त्यामुळे ‘होमबाउंड’ला जागतिक स्तरावरील प्रेक्षकांची मिळालेली प्रतिक्रिया फार महत्वाची ठरली आहे.(Bollywood movies)

धर्मा प्रॉडक्शन्सने (Dharma Production) कान्समधील प्रेक्षकांच्या प्रतिसादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यात संपूर्ण थिएटर टाळ्यांनी दुमदुमलेले दिसत असून प्रेक्षकांच्या प्रेमामुळे चित्रपटाचे दिग्दर्शक नीरज घेयवान आणि अभिनेता ईशान खट्टर अत्यंत भावूक झाले होते. ‘होमबाउंड’ला मिळालेल्या आंतरराष्ट्रीय प्रतिसादामुळे प्रेक्षक आता हा चित्रपट भारतीय थिएटरमध्ये पाहण्यासाठी उत्सुकता वाढली आहे.(Cannes film festival)