‘माझं एका राजकीय नेत्यासोबत लग्न झालंय आणि…’ अखेर Sonalee Kulkarni

Kamali Serial: जान्हवीची आई परत येतेय; झी मराठीवरील ‘कमळी’ या मालिकेत साकारणार महत्त्वपूर्ण भूमिका !
Kamali Serial: झी मराठीवर ‘होणार सून मी ह्या घरची’ मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी जान्हवीची आई तुम्हाला आठवतेय का? त्याच अभिनेत्री आशा शेलार आता पुन्हा छोट्या पडद्यावर कमबॅक करत आहेत . तेजश्री प्रधानने सकारलेली जान्हवी आणि आशा शेलार यांनी सकारलेली शशिकला ही या मालिकेची जमेची बाजू ठरलेली. ही मालिका बंद झाली असली तरी तिचा प्रभाव आजही मराठी प्रेक्षकांमध्ये टिकून आहे.(Kamali Zee Marathi Serial)

आता आशा शेलार ‘कमळी‘ या आगामी मालिकेत एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. झी मराठीवरील ही नवीन मालिका ३० जूनपासून रात्री ९ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, मालिकेचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला आहे. या मालिकेत आशा शेलारसोबत विजया बाबर (Vijaya babar) , निखिल दामले (निखिल दामले)आणि इला भाटे (Ila Bhate) यांच्यासारखे अनुभवी कलाकार देखील आहेत.

‘होणार सून मी ह्या घरची’ मालिकेत खलनायिकेच्या भूमिकेत आशा शेलारने प्रेक्षकांच्या मनात वेगळी छाप पाडली होती. त्यानंतर ‘खुलता कळी खुलेना’, ‘छत्रीवाली’, ‘सुखांच्या सरींनी हे मन बावरे’, ‘पिंकीचा विजय असो’ यांसारख्या मालिकांमधून त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.आता नवीन मालिकेतील त्यांची भूमिका काय असेल, हे अजून स्पष्ट झालेलं नसले तरी, प्रोमोवरून ती एक सशक्त आणि महत्वाची भूमिका असल्याचे स्पष्ट दिसून येते. (Kamali Marathi Serial)
============================
============================
आशा शेलार यांचा खास अंदाज आणि तिची अभिनयशैली प्रेक्षकांना पुन्हा एकदा बांधून ठेवेल, अशी अपेक्षा आहे. ‘कमळी’ ही मालिका कौटुंबिक पातळीवर भावनिक आणि सामाजिक विषय हाताळणारी असेल, असा अंदाज आहे. यामध्ये आशा शेलार यांचा सहभाग प्रेक्षकांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे.