‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
देव आनंद यांनी हरवलेले मास्टर स्क्रिप्ट कसे शोधले?
सत्तरच्या दशकाच्या प्रारंभी देव आनंद (Dev Anand) आपल्या ‘हरे रामा हरे कृष्णा’ या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी
काठमांडू येथे गेले होते. हिप्पी संस्कृतीवर आधारित हा त्यांचा चित्रपट होता. या सिनेमाचे जेव्हा शूटिंग
काठमांडू येथे चालू होते त्यावेळेला एक देखणा तरुण रोज चित्रपटाचे शूटिंग पाहायला येत असे. देव
आनंद (Dev Anand) यांना देखील त्या व्यक्तीबद्दल खूप अप्रूप वाटू लागले. त्यांनी चौकशी केली असता त्यावेळी
लक्षात आले की तो देखणा युवक म्हणजे नेपाळच्या राजपुत्र ज्ञानेंद्र आहेत. त्या काळी नेपाळ मध्ये
राजेशाही होती. साक्षात राजपुत्र आपल्या चित्रपटाची शूटिंग पाहायला येतो आहे हे कळाल्यानंतर देव
आनंद (Dev Anand) स्वतः त्यांच्याकडे गेले आणि आदरपूर्वक त्यांना सेटवर एक खुर्ची देऊन तिथे बसून शूटिंग
पाहायला सांगितले. परंतु राजपुत्राने नम्र नकार देत “मी तिथे आल्याने तुम्हाला डिस्टर्ब होईल. मी
लांबूनच शूटिंग पाहतो” असे सांगितले. देवआनंद (Dev Anand) यांना त्या रॉयल फॅमिलीतील राजपुत्रांचा नम्रपणा खूप
आवडला. नंतर दोघांमध्ये चांगली मैत्री देखील झाली.
एकदा पुढील शूटिंग लोकेशन पाहण्यासाठी देव आनंद (Dev Anand) हेलिकॉप्टरने जाणार होते. त्यांना लगेच
संध्याकाळी परत यायचे होते. त्या प्रमाणे ते शूटिंग लोकेशन्स पाहून परत सेट वर आले. आल्यानंतर
त्यांनी आपल्या सहायकाला ‘हरे राम हरे कृष्ण’ या चित्रपटाचे मास्टर स्क्रिप्ट मागितले. पण
मास्टरस्क्रिप्ट कुणाला सापडेना. देवानंद वैतागले आणि आपल्या सहाय्यकांवर चिडले.
मास्टर स्क्रिप्ट गेले कुठे? ते सावकाश पणे सर्व घटना आठवू लागले. परंतु त्यांच्या असे लक्षात आले की
मास्टरस्क्रिप्ट तर ते स्वतः घेऊन गेले होते आणि हेलिकॉप्टरने जात असताना त्यांच्यासोबत ही
स्क्रिप्ट होती. याचा अर्थ ही मास्टरस्क्रिप्ट त्या पहाडी एरियात कुठेतरी हरवली आहे. आता मात्र देव
आनंद (Dev Anand) च्या तोंडचे पाणी पळाले. कारण त्या मास्टरस्क्रिप्ट मध्ये देव आनंद ने सर्व बारीक-सारीक
डिटेल्स लिहिले होते. काही महत्त्वाच्या नोंदी देखील त्यामध्ये मांडल्या होत्या. हे सर्व नसताना
चित्रपटाची शूटिंग पूर्ण करणे निव्वळ अशक्य होते. लाखो रुपयांचं नुकसान यामुळे होणार होते. काय
करायचे?
त्यामुळे ताबडतोब त्यांनी पुन्हा त्या लोकेशनला जाण्याचा निर्णय घेतला. पण पुन्हा प्रश्न निर्माण
झाला. एक तर दुपार होऊन गेली होती. युनिसेफचे हेलिकॉप्टर जे देवआनंद (Dev Anand) वापरत होता त्याचा
पायलेट निघून गेला होता. त्यावेळेला नेपाळमध्ये आणखी एक अमेरिकन मिशनचे हेलिकॉप्टर होते
परंतु त्यामध्ये काहीतरी तांत्रिक बिघाड झाला होता. आता जायचे कसे? तेव्हा देव आनंदने(Dev Anand) आपला
मित्र राजपुत्र ज्ञानेंद्र यांना फोन लावला. नेपाळच्या रॉयल फॅमिलीकडे स्वतःचे एक हेलिकॉप्टर होते. देव
आनंदने (Dev Anand) आपली सर्व अडचण राजपुत्राला सांगितली. राजपुत्राने ताबडतोब आपले हेलिकॉप्टर रेडी करून
त्यांच्याकडे पाठवले. देवआनंद लगेच हेलिकॉप्टर मधून त्या लोकेशनवर गेले. राजपुत्र ज्ञानेंद्र यांनी
काही लष्करी जवान देखील त्यांच्या पाठोपाठ तिकडे पाठवले.
मग सुरू झाले सर्च ऑपरेशन. देवआनंद (Dev Anand) डोळ्यात तेल घालून खाली पाहत होते. खरंतर गवताच्या गंजीतून सुई शोधणे इतकं ते अवघड काम होतं. पण देव आनंदचं (Dev Anand) नशीब भारी! त्याला एका झाडाच्या फांदीमध्ये ते स्क्रिप्ट अडकलेले दिसले!
आता काढायचे कसे? कारण थोडी जरी हवाचा धक्का लागला असता तर ती स्क्रिप्ट खोल दरीत
कोसळूली असती! राजपुत्राने पाठवलेले लष्कराचे जवान देखील तिथे पोहोचले होते. त्या सर्वांच्या
मेहनतीने ते स्क्रिप्ट हळुवारपणे मिळवण्यात यश आलं! आणि देवानंद ते स्क्रिप्ट मिळतात त्याच्या
डोळ्यात पाणी आलं आणि त्यामध्ये आपल्या छातीशी घट्ट धरून ठेवत लाख मोलाचा ठेवा पुन्हा
त्याच्या हाती आला होता!
========
हे देखील वाचा : अमिताभ बच्चन यांचा ‘हा’ अंडररेटेड पण ग्रेट सिनेमा
========
अशा पद्धतीने पुन्हा दुसऱ्या दिवशीपासून व्यवस्थित ‘हरे रामा हरे कृष्णा’ या चित्रपटाचे शूटिंग सुरू
झालं आणि हा चित्रपट पूर्ण झाला सुपर हिट झाला. हा चित्रपट सुपरहिट होण्यासाठी नेपाळच्या रॉयल
फॅमिलीतील राजपुत्र ज्ञानेंद्र यांची मोलाची मदत ठरली. देव आनंदने (Dev Anand) चित्रपटाच्या सुरुवातीच्या
क्रेडिट्समध्येच या रॉयल फॅमिली चे सर्वात आधी आभार मानले आहेत. जाता जाता: थोडंसं राजपुत्र
ज्ञानेंद्र यांच्या बद्दल. १ जून २००१ या दिवशी नेपाळमध्ये रॉयल फॅमिली मध्ये मोठे हत्याकांड घडले
होते. (या घटनेवर देखील देव ला सिनेमा करायचा होता.) त्यानंतर राजाचा उत्तराधिकारी म्हणून
राजपुत्र ज्ञानेंद्र यांची नेपाळचे राजे म्हणून नेमणूक झाली नेपाळ किंग्डमचे ते शेवटचे राजे ठरले. आज
राजपुत्र ज्ञानेंद्र ७५ वर्षाच्या असून नेपाळमध्ये अजूनही सामाजिक सेवेमध्ये कार्यरत आहे.
‘प्रेम पुजारी’ हा देव आनंद (Dev Anand) यांनी दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट. पण त्याला फारसी यश मिळाले
नव्हते.
‘हरे रामा हरे कृष्णा’ मात्र जगभर सुपरहिट सिनेमा ठरला. या सिनेमातील ‘दम मारो दम’ या
गाण्याने कहर लोकप्रियता हासील केली. त्यावर्षीचे बिनाकाचे ते टॉपचे गाणे होते. या गाण्यासाठी
आशा भोसले यांना फिल्मफेअर चा पुरस्कार मिळाला. तसेच या चित्रपटाची नायिका झीनत अमान
हिला देखील सर्वोत्कृष्ट सहायक नायिकेचा फिल्मफेअर चा पुरस्कार मिळाला.
नेपाळच्या राजपुत्राने केलेल्या मदतीने हा चित्रपट बनू शकला असे देवानंदने (Dev Anand) त्याच्या ऑटोबायोग्रफी
मध्ये नमूद केले आहे.