मिलिंद गवळी यांनी त्यांच्या पोस्टमधून दिला ‘सवतीचे कुंकू’ चित्रपटाच्या आठवणींना
मेहमूदने कसा घेतला आपल्या अपमानाचा परफेक्ट बदला ?
साठ आणि सत्तरच्या दशकातील हास्य विनोदी अभिनेता मेहमूद ने रुपेरी पडल्यावर आपल्या विविध रंगी भूमिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. एकेकाळी मेहमूदची एवढी दहशत होती की, भले भले मोठे अभिनेते देखील त्याच्यासोबत काम करायला घाबरत होते कारण मेहमूद असला की, चित्रपटाचे सगळे क्रेडिट त्यालाच मिळायचे ! या मेहमूदवर लेखक हनीफ झवेरी यांनी एक पुस्तक लिहिलेले आहे Mehmood : A man of many moods या पुस्तकात त्यांनी खूप ‘अननोन स्टोरीज’ सांगितलेल्या आहेत. (Mehmood)
त्यातीलच एक खास आठवण मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. मीनाकुमारची बहिण मधु हिच्यासोबत मेहमूदने लग्न केले होते. लग्नाच्या वेळी मेहमूद अक्षरशः बेकार होता. तो काहीच काम होत नव्हता. सिनेमात छोट्या मोठ्या भूमिका करत होता.अनेक कलावंतांच्या गाडीवर तो ड्रायव्हर होता. कुठलेच काम तो सिरीअस ली करत नव्हता. त्यामुळे मीनाकुमारीला आपल्या धाकट्या बहिणीची मधुची खूप काळजी होती. त्यामुळेच ती स्वत: अनेक निर्मात्यांकडे मेहमूद चे नाव सुचवत असे. एकदा बी आर चोप्रा यांच्याकडे तिने ‘एक ही रास्ता’ या चित्रपटासाठी मेहमूद चे नाव सुचवले. मेहमूद सेटवर पोहोचला तेव्हा त्याला असे कळाले की मीनाकुमाराने आपल्या नावाची शिफारस केली आहे. तो खूप स्वाभिमानी होता त्याने ताबडतोब ते काम सोडले ! (Mehmood)
त्याकाळी पन्नासच्या दशकात मीनाकुमारीचे पती कमाल अमरोही यांचे मोठे नाव होते. ते स्वत: निर्माता दिग्दर्शक होते. त्यांच्या एखाद्या चित्रपटात मेहमूद ने काम करावे असे मीनाकुमारीला वाटे. म्हणून तिने बहिणीकडून मेहमूदला कमाल अमरोही यांना भेटायला सांगितले. मेहमूद त्या पद्धतीने कमाल अमरोही यांना भेटायला त्यांच्या घरी गेला. तेव्हा कमाल साहेबांनी मेहमूदचा खूप अपमान केला. ते म्हणाले,” तू मुमताज अली यांचा मुलगा आहे याचा अर्थ असा नाही तू त्यांच्यासारखा अभिनेता आहेस.
तुझ्यात अभिनयाची काहीच क्षमता नाही. त्यामुळे तू काही अभिनेता बनू शकत नाहीस. तेव्हा दुसरी कडे कुठेतरी चार पैसे कमवायला शिक आणि तुझे आणि तुझ्या बायकोचे पोट भर ! “ असं म्हणून त्यांनी काही नोटा मेहमूदकडे दिल्या. मेहमूदला त्यांचा प्रचंड राग आला होता त्याने मनोमन ठरवले की, या घरात पुन्हा पाऊल ठेवायचे नाही. त्या नोटा कमाल साहेबांकडे देऊन तो रागारागात तिथून निघून गेला. कमाल साहेबांचे शब्द त्याचे काळीज पोखरणारे होते. त्याने जिद्दीने ठरवले अभिनेता होवून दाखवायचेच ! काळ कुणासाठी थांबत नाही. पुढे वर्ष दोन वर्षातच मेहमूदचा रुपेरी पडद्यावर प्रवेश झाला आणि बघता बघता तो आघाडीचा विनोद वीर झाला. साठच्या दशकात तर तो मोठा स्टार बनला. (Mehmood)
इकडे मात्र कमाल अमरोही यांच्या यशाचा आलेख मात्र दिवसेंदिवस खाली उतरत होता. कमाल अमरोही आणि त्यांची पत्नी मीनाकुमारी यांच्यात देखील बेबनाव सुरु झाला. कमाल साहेबांना मीनाकुमारीने इतर पुरुषांसोबत बोललेले अजिबात आवडत नव्हते. त्या काळात मीनाकुमारी आणि गुलजार यांच्यात बऱ्यापैकी मैत्री झाली होती. कमाल साहेबांना तेच खुपत होतं. त्यांनी मीनाकुमारीवर लक्ष ठेवण्यासाठी त्यांच्या एका सहाय्यकाला सांगितले होते.
१९६४ साली संगीतकार सलील चौधरी यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘पिंजरे के पंछी’ च्या सेटवर एकदा गुलजार मीनाला भेटायला गेले. पण तिथे कमाल साहेबांचा सहाय्यक बाकर यांनी त्यांचा खूप अपमान केला. त्यांनी गुलजार ला अडवले. त्या ठिकाणी मीनाकुमारी व बाकर यांच्यात खूप तू तू मै मै झाले आणि बाकर ने तिला मागे ढकलले. तो तिला खूप अपमान वाटला. ती जोर जोरात रडू लागली. सेटवर मेहमूद देखील होता. त्याने मीनाकुमारी आपल्या कार मध्ये घातले आणि आपल्या घरी घेऊन गेला आणि तिथून कमाल अमरोही यांना फोन करून सांगितले,,” तुमची पत्नी आत्ता माझ्या घरी आहे. आता तुम्ही स्वतः येऊन तिला घेऊन जा.” संध्याकाळी कमाल आहेब मेहमूदच्या बंगल्यावर आले. आणि मीनाकुमारी ज्या रूम मध्ये होते त्या दाराशी जाऊन तिला घरी येण्याची विनंती करू लागले. मीनाने दार आतून लावून घेतले होते. अर्धा तास कमाल तिच्या विनवण्या करत होत्या. पण मीनाकुमारी काही ऐकायला तयार नव्हती. शेवट शेवटी ते भयंकर चिडले आणि जोरजोरात दार बडवू लागले , ढकलू लागले. आरडा ओरडा करू लागले. (Mehmood)
=========
हे देखील वाचा : प्राण ने स्वत:ला मिळालेला फिल्मफेअर पुरस्कार नाकारला…
=========
आता मेहमूद (Mehmood) च्या सहनशक्तीचा अंत झाला. त्याने कमाल साहेबांना सांगितले ,” हे एका शरीफ माणसाचे घर आहे. इथे तुमच्यासारख्या लोकांची गुंडा गर्दी चालणार नाही. आमच्या मोहल्ल्या मध्ये शरीफ लोक राहतात. थोडी जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवा. तुमची पत्नी तुमच्यावर येऊ शकत नाही तर तुम्ही जबरदस्ती का करता?” असे म्हणून मेहमूद ने हाताला धरून त्याना घराबाहेर काढले. दहा वर्षापूर्वी अपमानित करून मेहमूद ला कमाल साहेबांनी महमूद ला त्यांच्या घराबाहेर काढले होते एका दृष्टीने त्याचा बदला आता घेतला होता. एक वर्तुळ अशा रीतीने पूर्ण झाले होते!