राष्टीय पुरस्कार सोहळ्यात Vidhu Vinod Chopra यांनी लाल कृष्ण अडवाणींसोबत

‘रंगभूमीवर फुललेली प्रेमकहाणी, कशी झालेली Reema Lagoo आणि Vivek Lagoo यांची पहिली भेट?
भारतीय चित्रपट, नाट्य आणि मालिकाविश्वातील उत्कृष्ट अभिनेत्री म्हणजे नयन भडभडे अर्थात आपल्या सगळ्यांच्या लाडक्या रिमा लागू (Reema Lagoo)… आज त्यांच्या जन्मदिवस.. २१ जून १९५८ साली जन्मलेल्या रिमा यांचा प्रवास मुंबई-पुणे-मुंबई असा झाला… आई अभिनेत्री असल्यामुळे बालपणापासूनच अभिनयाचं बाळकडू रिमा यांना मिळालं होतं… बालकलाकार म्हणून अभिनयाची सुरुवात करणाऱ्या रिमा यांनी अगदी शेवटच्या श्वासापर्यंत काम केलं… रिमा यांची लग्नगाठही इंडस्ट्रीतल्याच कलाकाराशी दिवंगत विवेक लागू यांच्याशी बांधली… काही काळानंतर जरी त्यांचा घटस्फोट झाला असला तरी त्यांनी लागू हे सासरचं आडनाव आपल्या नावापुढे लावलं होतं… आज त्यांच्या जन्मदिनी रिमा आणि विवेक लागू यांची पहिली भेट कशी झाली होती याचा रंजक किस्सा जाणून घेऊयात…(Bollywood news)

१९७६ मध्ये रिमा लागू यांनी मुंबईच्या युनियन बँकेत काम करण्यास सुरुवात केली होती. बँकेत काम करत असताना, रिमा तेथील सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होत होत्या. यासोबतच त्या टीव्ही सीरिअल्स आणि चित्रपटांमध्येही नशीब आजमावत होत्या. याच काळात रिमा यांची भेट विवेक लागू यांशी झाली, दोघंही त्यावेळी एकाच बँकेत काम करायचे. त्यावेळी नाट्यसृष्टीत विवेक लागू फा मोठं नाव होतं…आणि रिमा यांनाही अभिनयाची आवड असल्यामुळे दोघांमध्ये जवळीक वाढली आणि एकमेकांच्या प्रेमात ते आकंठ बुडाले… (Entertainment)

कालांतराने दोघांनी १९७८ मध्ये लग्न केलं आणि त्यांना मृण्मयी ही एक गोंडस मुलगी झाली…काही वर्षांनंतर त्यांच्या नात्यात काही कारणांमुळे दुरावा आला आणि त्यांनी एकमेकांपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला… सामंज्यस्याने त्यांनी घटस्फोट घेतल्यानंतर विवेक यांनी मुलीची कस्टडी रिमा यांना दिली आणि वेगळे होऊनही त्यांच्यातील मैत्री कायम दोघांनी टिकवली… तसेच, दोघेही नाटकवेडे असल्यामुळे त्यांनी २०१४ मध्ये दुसरा सिलसिला या नाटकात एकत्र काम देखील केलं होतं.. रंगभूमीच्या प्रेमामुळे हे दोन कलाकार एकत्र आले होते…(Bollywood)
================================
हे देखील वाचा: एकेकाळी ऑस्करमध्ये… आता बॉलीवूडमधून गायब ! कुठे आहेत Ashutosh Gowarikar ?
=================================
दरम्यान, रिमा लागू यांनी ‘सिंहासन’, ‘अरे संसार संसार’, ‘आपलं घर’, ‘जिवलगा’, ‘बिनधास्त’, ‘मैंने प्यार किया’, ‘हम साथ साथ है’, ‘हम आपकें है कौन?’, ‘हत्यार’, ‘वास्तव’ अशा बऱ्याच हिंदी मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी विविधांगी भूमिका साकारल्या होत्या… याशिवाय, ‘दिल अभी भरा नही’, ‘छापा काटा’, ‘चल आटप लवकर’, ‘बुलंद’, ‘शांतेचं कार्टं चालू आहे’ अशा अनेक अजरामर नाटकांतही त्यांनी कामं केली होती…(Reema Lagoo movies)