Asambhav Movie : प्रेक्षकांना पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार रहस्यमय प्रेमाची

Amitabh Bachchan यांचं ‘जुम्मा चुम्मा दे दे ..’ गाणं सुदेश भोसले यांना कसं मिळालं?
सुरुवातीला उत्तम निवेदना सोबतच मिमिक्री करणारा आणि नंतर पार्श्वगायनाच्या क्षेत्रात जबरदस्त यश मिळवणारा कलाकार म्हणजे सुदेश भोसले. ‘मेलडी मेकर्स’ या ऑर्केस्ट्रा मध्ये आपले करिअर सुरू करणारे सुदेश भोसले यांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर प्रचंड मोठे यश मिळविले. मिमिक्री करताना सुदेश सचिन देव बर्मन यांचा हुबेहूब आवाज काढायचे. हा आवाज एकदा आशा भोसले यांनी ऐकला आणि त्या सुदेश यांना पंचमदांकडे घेऊन गेल्या. पंचम यांना देखील सचिनदा यांचा आवाज ऐकून आनंद झाला. त्यांनी ‘जलजला’ (१९८८) या चित्रपटात सुदेश भोसले यांना पहिल्यांदा गायनाची संधी दिली. (Entertainment tadaka)

या नंतर सुदेश भोसले यांनी त्या काळातील सर्व अभिनेत्यांसाठी पार्श्वगायन केले. अनिल कपूर, गोविंदा, जाकी श्रॉफ … पण त्यांची सर्वात जबरदस्त हिट जोडी जमली ती अमिताभ बच्चन यांच्यासोबत! खरं तर अमिताभ बच्चन हे स्वतः उत्तम गायक आहेत. सत्तरच्या दशकात दशकात ‘मिस्टर नटवरलाल’ या चित्रपटातील ‘मेरे पास आओ मेरे दोस्तो…’ या गाण्यापासून त्यांनी पार्श्वगायन सुरू केलं होतं. असं असताना देखील त्यांनी सुदेश भोसले यांचा प्लेबॅक घेतला हे अमिताभ बच्चन यांचे मोठेपण होते. या जोडीचे अनेक चित्रपट आहेत. (Retro news)

पहिल्यांदा सुदेश भोसले अमिताभ यांच्यासाठी गायले ‘अजूबा’मध्ये. १२ एप्रिल १९९१ रोजी प्रदर्शित झालेल्या ‘अजूबा’त सुदेश भोसले यांनी तीन गाणी गायली होती. या चित्रपटातील ‘या अली या या अली मेरा नाम ही अली रहता हूं कहां मस्जिद वाली गली ‘ हे पहिल्यांदा रेकॉर्ड झाले. अभिनेता शशी कपूर या चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक होते. त्यांना सुदेश भोसले यांचा आवाज खूप आवडला आणि त्यांनी अमिताभ यांच्यावर चित्रित या चित्रपटातील उरलेली दोन गाणी देखील सुदेश भोसले यांच्या कडून गाऊन घ्यायचे ठरवले. मोहम्मद अजीज सोबत ‘ रे ताज्जूब है तुने प्यार नही किया’ आणि मोहम्मद अजीज, अनुराधा पौडवाल सोबत ‘ओ मेरा जाने बहार आ गया’ हि गाणी चांगली लोकप्रिय ठरली. या चित्रपटाची संगीतकार होते लक्ष्मीकांत प्यारेलाल.(Bollwyood news)

याच वर्षी २३ जानेवारी १९९१ या जोडीचा ‘हम’ हा चित्रपट आला होता. खरंतर यातील सुपरहिट गाणे ‘जुम्मा चुम्मा दे दे …; या चित्रपटासाठी नव्हतेच. ‘अग्निपथ’ या चित्रपटासाठी खरंतर हे गाणं असणार होतं. पण तिथे जागा न मिळाल्याने ‘हम’ मध्ये घेण्यात आले. ‘हम’ या चित्रपटातील हे गाणे गाताना संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी सुदेश यांना सांगितले “ हे गाणे तुला अमिताभ बच्चन यांच्या आवाजात गायचे आहे!” अमिताभ बच्चन स्वतः रिहर्सल आणि रेकॉर्डिंगच्या वेळेला उपस्थित होते. (Bollywood tadaka)
========================
हे देखील वाचा: Kishore Kumar : कोणत्या गायिकेने किशोर कुमारला दिला होता अनमोल सल्ला?
========================
अमिताभ बच्चन त्यावेळी सुदेश भोसले यांना म्हणाले ,” हम दोनो की आवाजे कितनी मिलती है !” सुदेश यांच्यासाठी ही फार मोठी कॉम्प्लिमेंट होती. अमिताभ यांनी ग्रीन सिग्नल दिल्यावर रेकोर्डिंगचा दिवस ठरला. मेहबूब स्टुडिओत सकाळी नऊ पासून या गाण्याचे रेकॉर्डिंग सुरू झालं आणि रात्री दोन वाजेपर्यंत चालले. आपल्या आवाजावर काही परिणाम होऊ नाही म्हणून या काळात सुदेश भोसले यांनी काही खाल्ले देखील नाही. पण पंचवीस कप चहा मात्र नक्की घेतला! ‘जुम्मा चुम्मा दे दे…’ हे गाणं अमिताभ बच्चन यांचे आयकॉनिक सॉंग बनले. बऱ्याच जणांना हे गाणं अमिताभ बच्चन यांनीच गायलं आहे असं वाटतं. हे गाणं सुदेश भोसले यांनी गायलं आहे हे फार कमी लोकांना माहिती आहे. त्यामुळे अमिताभ यांच्या स्वराची लोकं तारीफ करतात. (Amitabh bachchan songs)

यानंतर मात्र अमिताभ बच्चन यांच्या बऱ्याच चित्रपटातील गाणी सुदेश भोसले यांनी गायली. ‘मेरी मखना’ (बागबान), ‘ना ना नारे नारे ना’ (मृत्युदाता) ‘सोना सोना दिल मेरा सोना’ (मेजर साब) ‘से शावा शावा’ (कभी खुशी कभी गम) ही गाणी प्रचंड गाजली. खरंतर अमिताभ बच्चन हे स्वतः चांगले पार्श्वगायक असताना त्यांनी सुदेश भोसले यांचा प्लेबॅक घेतला. अभिनेत्याच्या आवाजात प्लेबॅक देणं हा एक नवीन प्रकार होता तो सुदेश भोसले यांनी रूढ केला.डबिंग आर्टिस्ट म्हणून त्यांनी सुरुवातील अनेक चित्रपटासाठी काम केले. संजीवकुमार यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या पाच सिनेमाचे डबिंग सुदेश यांनी केले होते. (Sudesh Bhosle songs)