
Vidya Balan नाही तर ‘या’ अभिनेत्री असत्या ‘परिणीता’मधील लोलिता!
हिंदी चित्रपटसृष्टीतील बऱ्याच आयकॉनिक चित्रपटांना रिलीज होऊन यंदा २०, २५ आणि अगदी ५० वर्ष देखील पुर्ण होत आहेत…. याच यादीत आणखी एका चित्रपटाचा समावेश झाला आहे तो म्हणजे ‘परिणीता’ (Parineeta)… २००५ मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटाला रिलीज होऊन २० वर्ष झाली आहेत… या चित्रपटात विद्या बालन, सैफ अली खान, दिला मिर्झा आणि संजय दत्त यांच्या प्रमुख भूमिका होत्या…

विद्याने झिरो फिगरचा ट्रेंड मोडीत काढत बॉलिवूडमध्ये कोणत्याही गॉडफादरशिवाय सिनेविश्वात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे… खरं तर विद्या बालनचा (Vidya Balan) ‘परिणीता’ हा बॉलिवूडचा डेब्यु चित्रपट… पहिल्याच चित्रपटात तिने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं… पण तुम्हाला माहित आहे का ‘परिणीता’ चित्रपटासाठी आधीवेगळ्याच अभिनेत्रीचा विचार करण्यात आला होता… परंतु, शेवटी विद्याच्या पदरात हा चित्रपट पडलाच… तो कसा जाणून घेऊयात…(Entertainment News)

‘परिणीता’ हा चित्रपट शरदचंद्र चट्टोपाध्याय यांच्या बंगाली कादंबरीवर आधारित होता. या चित्रपटात मुख्य भूमिका मिळवण्यासाठी विद्या बालन हिने ५० पेक्षा जास्त वेळा स्क्रीन टेस्ट दिली होती… आणि अथक परिश्रमाने तिला लोलिता ही भूमिका मिळाली… परंत, काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, आधी या चित्रपटासाठी ऐश्वर्या राय बच्चन (Aishwerya Rai-Bachchan) किंवा राणी मुखर्जी (Rani Mukherjee) अभिनेत्री असावी अशी दिग्दर्शकाची इच्छा होती… दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा यांनीही या दोन्ही अभिनेत्रींशी संपर्क साधला होता. मात्र, काहीच योग जुळून न आल्यामुळे शेवटी विद्या बालनची निवड करण्यात आली होती…(Bollywood)
================================
हे देखील वाचा : विद्या बालन : एकेकाळी बॅड लक समजली जाणारी हिरोईन !
=================================
परिणीता चित्रपटाच्या यशानंतर विद्या बालन हिने बऱ्याच चित्रपटंमध्ये बोल्ड, सोज्वळ अशा विविध पठडीतील भूमिका केल्या… ‘डर्टी पिक्चर’, ‘भूल भूलैय्या’, ‘हल्ला बोल’, ‘पा’, ‘इश्किया’, ‘कहानी’, ‘एक अलबेला’, ‘शेरनी’ असे अनेक सुपरहिट चित्रपट विद्या बालनने दिले आहेत…. चित्रपटसृष्टीतील २० वर्षांच्या यशस्वी कारकिर्दित विद्याला राष्ट्रीय पुरस्कारासह पद्मश्री पुरस्कार देऊनही सन्मानित करण्यात आले आहे…(Vidya Balan movies)