जोधा अकबरच्या १४ वर्षानंतर हृतिक रोशनने केले ‘हे’ वक्तव्य
बॉलीवूडमध्ये उत्तम नृत्य कौशल्य आणि अभिनयासाठी प्रसिद्ध असलेल्या हृतिक रोशनने त्याच्या पदार्पणातील चित्रपटापासूनच प्रत्येकाच्या हृदयावर खोलवर आपला ठसा उमटवला आहे. त्याच्या प्रत्येक चित्रपटातून, त्याने काहीतरी वेगळे सादर केले आहे जे त्याच्या चाहत्यांच्या आणि प्रेक्षकांच्या पसंतीस पडले आहे. आपल्या नृत्य कौशल्याने सर्वांना चकित करणाऱ्या हृतिक रोशनने आपल्या अभिनयाचा पराक्रम दाखवत आपले अष्टपैलूत्व सिद्ध केले आहे
२००८ मध्ये प्रदर्शित झालेला ‘जोधा अकबर’ हा त्याचा असाच एक चित्रपट होता. आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित, या ऐतिहासिक नाट्याने आज १४ वर्षे पूर्ण केली आहेत. हृतिक रोशनचा हा चित्रपट आजही त्याच्या चाहत्यांना तितकाच आवडतो जेवढे प्रेम त्याला १४ वर्षांपूर्वी मिळाले होते. या चित्रपटासाठी हृतिकने विशेष तयारी केली होती. चित्रपटात हृतिकने साकारलेल्या अकबरच्या भूमिकेसाठी त्याचे आजही कौतुक केले जाते.
चित्रपटाला १४ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल हृतिकने जोधा अकबरविषयी म्हटले की, “संगनेरमध्ये जोधा अकबरसाठी शूटिंग करणे हा एक सुंदर अनुभव होता जो मी कधीही विसरू शकणार नाही. तिथे शूटिंग करताना आम्ही इतर जगापासून वेगळे झालो असलो तरी घरापासून दूर घरीच असल्यासारखे वाटले. मी भाग्यवान आहे की मला त्या शहराच्या संस्कृतीचा आणि कलात्मक सौंदर्याचा आनंद घेण्याची संधी मिळाली. स्थानिक लोकांना भेटण्याची संधी मिळाली जे मोठ्या संख्येने सेटवर येत असत. भेटत असत आणि अत्यंत प्रेमाने स्वागत करत असत. मला या पीरियड ड्रामासाठी माझ्या उर्दूवर काम करावे लागले आणि ऍक्शन सीक्वेन्ससाठी तलवारबाजीची कला शिकून घ्यावी लागली. एक अभिनेता म्हणून जोधा अकबर हा माझ्यासाठी अतिशय समृद्ध करणारा अनुभव होता.”
====
हे देखील वाचा: ‘क्रिश’करिता प्रियांकाऐवजी या अभिनेत्रीला विचारण्यात आलं होतं मुख्य भूमिकेसाठी….
====
नुकताच, हृतिकच्या वाढदिवशी, त्याच्या बहुप्रतिक्षित ‘विक्रम वेधा’ चित्रपटातील फर्स्ट लूक सादर करण्यात आला तसेच तो लवकरच दीपिका पदुकोणसोबत ‘फायटर’मध्ये दिसणार आहे.