
Krrish 4 : टाईम ट्रॅव्हल ते ह्रतिक रोशनचा ट्रिपल रोल!
बॉलिवूडमधील लोकप्रिय सुपरहिरो ‘क्रिश’ लवकरच एका वेगळ्या अंदाजात आपल्याला भेटायला येणार आहे. ‘कोई मिल गया’ (Koi Mil Gaya) चित्रपटापासून सुरु झालेली ‘क्रिश’ चित्रपटाची फ्रॅंचायझी आता ‘क्रिश ४’ पर्यंत येऊन ठेपली आहे. अनेक कारणांसाठी खरं तर ह्रतिक रोशनचा ‘क्रिश ४’ (Krrish 4) चित्रपट महत्वाचा आहे. यातील प्रमुख कारण म्हणजे या चित्रपटातून ह्रतिक दिग्दर्शनाचा प्रवास सुरु करणार आहे; शिवाय चौथ्या भागात तो ट्रिपल रोलमध्ये दिसणार आहे. या व्यतिरिक्त ‘क्रिश ४’ मध्ये काय काय पाहायला मिळणार जाणून घेऊयात…(Entertainment)

‘क्रिश ४’ (Krrish 4) हा चित्रपट टाईम ट्रॅव्हल दाखवणार असून आधुनिक टॅक्नॉलॉजी या चित्रपटात भरपूर दिसणार आहे. तसेच, चित्रपटाची स्टोरी लाईन Infinity War And Endgame पासून प्रेरित होणार असल्यामुळे चाहत्यांना ‘क्रिश ४’ कडून बऱ्याच अपेक्षा आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ह्रतिक रोशन (Hrithik Roshan) या चित्रपटात त्याचा तिहेरी भूमिका असणार आहे. आता चित्रपटाची कथा टाईम ट्रॅव्हलवर आधारित असल्यामुळे ‘कोई मिल गया’ मधील जादू देखील यात दिसेल अशी शक्यता नाकारता येत नाही. (Bollywood movie update)

तसेच, ‘क्रिश ४’ मध्ये ‘कोई मिल गया’ नंतर प्रिती झिंटा (Preity Zinta) पुन्हा ‘क्रिश’ फ्रँचायझीमध्ये कमबॅक करणार आहे. शिवाय टाईम ट्रॅव्हल असल्यामुळे विवेक ओबरॉय आणि प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) यांचीही एन्ट्री होण्याची शक्यता आहे. टॅक्नॉलॉजीने ओतप्रोत भरलेल्या ‘क्रिश ४’ (Krrish 4) मध्ये अत्याधुनिक VFX आणि तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. मात्र, चित्रपटाच्या कथेचा मुळ जो इमोशन्सवर आधारलेला आहे तो जपण्याचा पुरेपुर प्रयत्न केला जाणार आहे. (Krrish 4 movie update)
===============================
हे देखील वाचा: Krrish 4 : ह्रतिकच्या ‘क्रिश ४’ मधून राकेश रोशन यांनीच घेतली एक्झिट!
===============================
दरम्यान, २००३ मध्ये ‘कोई मिल गया’ (Koi Mil Gaya) पासून राकेश रोशन(Rakesh Roshan) यांनी दिग्दर्शनाची धुरा सांभाळली होती. परंतु, ‘क्रिश ४’ (Krrish 4) मध्ये त्यांनी दिग्दर्शनाला नकार देत ह्रतिकने तो विडा उचलला. आता उत्तम अभिनय, नृत्यासोबत ह्रतिकच्या दिग्दर्शनाची कला पाहण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत.( Hrithik Roshan)