Tejaswini Lonari : अभिनयापाठोपाठ अभिनेत्री झाली बिझनेस वुमन!

Krrish 4 : ह्रतिक रोशनने हाती घेतली दिग्दर्शनाची धुरा!
हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय सुपरहिरो ‘क्रिश’चे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच चाहते आहेत. कोई मिल गया या चित्रपटापासून सुरु झालेला प्रवास आता ‘क्रिश ४’ पर्यंत येऊन ठेपला आहे. ह्रितिक रोशन याची प्रमुख भूमिका असणाऱ्या या चित्रपटाचं दिग्दर्शन मात्र राकेश रोशन करणार नाही आहेत. अशातच आता ‘क्रिश ४’ चित्रपटाच्या दिग्दर्शनाबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे. (Rakesh Roshan)

राकेश रोशन यांनी काही महिन्यांपूर्वी ‘क्रिश ४’ (Krrish 4) चित्रपटाचं दिग्दर्शन करणार नाही असं जाहिर केलं होतं. त्यानंतर ‘क्रिश ४’ येणार की नाही अशी चर्चा रंगली होती. आता मात्र, क्रिश ४ लवकरच येणार असून चक्क ह्रितिक रोशन याने अभिनयासोबत दिग्दर्शनाची धुरा हातात घेतली आहे. पहिल्यांदाच तो दिग्दर्शक म्हणून समोर येणार असल्यामुळे चाहत्यांमध्ये अधिकच उत्सुकता निर्माण झाली आहे. २०२६ मध्ये क्’रिश ४’ च्या शूटला सुरुवात होईल. (Hrithik Roshan)
===========================
हे देखील वाचा: Krrish 4 : ह्रतिकच्या ‘क्रिश ४’ मधून राकेश रोशन यांनीच घेतली एक्झिट!
===========================
२००३ मध्ये प्रिती झिंटा आणि ह्रतिक रोशन यांची प्रमुख भूमिका असणारा’कोई मिल गया’ चित्रपट आला होता. याच चित्रपटाचा सीक्वेल ‘क्रिश’ २००६ साली आला. आणि त्यानंतर या चित्रपटाचे एकामागून एक भाग येत गेले. आता ‘क्रिश ४’ येणार हे निश्चित झाले असून चौथ्या भागात खलनायक कोण असणार हे पाहणे दखील तितकेच महत्वाचे आहे. (Krrish 4 movie coming soon)