
Hum : एका सिनेमासाठी रेकॉर्ड केलेले गाणे वापरले दुसऱ्या सिनेमाला !
हिंदी सिनेमातील गाजलेल्या गाण्यांच्या जन्म कथा खूप इंटरेस्टिंग असतात. नव्वदच्या दशकाच्या प्रारंभी एक गाणं खूप गाजत होतं ‘जुम्मा चुम्मा दे दे…’ हे गाणं अमिताभ बच्चन यांच्या ‘हम’ (Hum) या १९९१ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटातील होतं. मुकुल आनंद दिग्दर्शित या चित्रपटात हे गाणं Amitabh Bacchan आणि किमी काटकर यांच्यावर चित्रित झालं होतं. पण तुम्हाला माहिती आहे का? (Hum)
हे गाणं या चित्रपटासाठी सुरुवातीला रेकॉर्ड केलंच नव्हतं हे गाणं दुसऱ्याच एका चित्रपटासाठी ध्वनीमुद्रित केलं होतं. परंतु तो चित्रपटच न बनल्याने हे गाणे बाजूला पडले गेले. नंतर हे गाणे एका वेगळ्याच सिनेमात वापरायचे ठरले. पण तो प्रयोग देखील असफल झाला. तसा या गाण्याचा प्रवास हा आणखी मनोरंजक आहे. ‘शोले’ फेम रमेश सिप्पी यांनी १९८८ साली अमिताभ बच्चन आणि श्रीदेवी यांना घेऊन एक चित्रपट बनवायचे ठरवले. या चित्रपटाचे नाव होते ‘राम की सीता शाम की गीता’.

या चित्रपटांमध्ये अमिताभ बच्चन आणि Sridevi या दोघांचे डबल रोल होते. ‘राम और शाम’ आणि ‘सीता और गीता’ या दोन सिनेमाचं इन्स्पिरेशन घेऊन त्यांनी हा चित्रपट काढायचे ठरवले. या चित्रपटाचा खूप मोठा शाही मुहूर्तदेखील झाला होता. या सिनेमाला संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल देणार होते. ’इन्किलाब’ यां १९८४ सालच्या चित्रपटानंतर अमिताभ श्रीदेवी बऱ्याच कालावधीनंतर पुन्हा एकत्र येत होते. त्यामुळे सर्व जण कमालीचे उत्सुक होते. अमिताभ बच्चन यांना समोर ठेवून त्यांनी या सिनेमासाठी एक गाणे देखील रेकॉर्ड केले. हे गाणे होते ‘जुम्मा चुम्मा दे दे…’ सुदेश भोसले आणि कविता कृष्णमूर्ती यांच्या स्वरात हे गाणे रेकॉर्ड झाले. Sudesh Bhosale यांनी थेट अमिताभ बच्चन स्वतः गात आहे या शैलीतच हे गाणे गायले. परंतु हा सिनेमा काही कारणामुळे बंद पडला आणि हे गाणं बाजूला पडलं. (Hum)

दिग्दर्शक Mukul Anand यांनी हे गाणं ऐकलं होतं. त्यांना हे गाणं खूप आवडलं होतं. त्यांनी विनंती करून रमेश सिप्पी यांच्याकडून या गाण्याचे हक्क विकत घेतले आणि आपल्या सिनेमांमध्ये वापरायचे ठरवले. तेव्हा मुकुल आनंद ‘अग्निपथ’ हा चित्रपट निर्माण करत होते. या सिनेमांमध्ये त्यांनी हे गाणं वापरायचे ठरवलं. चित्रपटात हे गाणं अमिताभ बच्चन आणि अर्चना पुरणसिंग यांच्यावर चित्रित होणार होतं. परंतु पुन्हा एक अडचण आहे. या सिनेमातील अमिताभ बच्चन यांचे कॅरेक्टर अतिशय वेगळे होते. (आठवा विजय दिनानाथ चौहान!) त्यामुळे हे छेड छाडीचे गाणे या चित्रपटात वापरणे त्यांना योग्य वाटले नाही. म्हणून त्यांनी ‘अग्निपथ’ (१९९०) या चित्रपटात हे गाणे वापरायचे टाळले.
============
हे देखील वाचा : Chandra Barot: ‘या’ गाण्याच्या मेकिंगची भन्नाट कथा!
============
यानंतर मुकुल आनंद यांचा पुढचा चित्रपट होता ‘हम’ (Hum) या चित्रपटात मात्र त्यांनी हे गाणे वापरले. किमी काटकर आणि अमिताभ बच्चन यांच्यावर चित्रित हे गाणे म्हणजे अमिताभ बच्चनचे आयकॉनिक सॉंग झाले आहे. किमी काटकरची आठवण तर केवळ या गाण्यापुरतीच राहिलेली आहे. या गाण्याच्या बाबतचे आणखी एक दुसरी आठवण म्हणजे Laxmikant–Pyarelal यांनी या गाण्याची चाल एका आफ्रिकन गाण्यावरून घेतली आहे.
याच आफ्रिकन गाण्यावर बप्पी लहरी यांनी ‘थानेदार’ या चित्रपटातील ‘तम्मा तम्मा लोगे’ हे गाणं बनवलं होतं. ही दोन्ही गाणी ज्या विदेशी अल्बममधून घेतले होते तो आफ्रीकन संगीताचा अल्बम १९८७ साली आला होता ’अक्वाबा बीच’. मोरी कांटे याने गायलेल्या ’तमा तमा’ या गाण्याची सही सही नक्कल या दोन्ही गाण्यात होती. ’जुम्मा चुम्मा’ लिहिलं होतं आनंद बक्षी यांनी व एल पी चे त्याला संगीत होते. तर ’तम्मा तम्मा’ लिहिलं होतं इंदीवर यांनी आणि स्वरबध्द केलं होतं स्वत: बप्पी लाहिरीने! (Hum)
धनंजय कुलकर्णी : बात पुरानी बडी सुहानी