महाराणी येसूबाईंच्या भूमिकेतले अमृता खानविलकरचे फोटो व्हायरल
‘ह्या गोष्टीला नावच नाही’ चित्रपटाचा भावस्पर्शी ट्रेलर प्रदर्शित…
मराठी सिनेमा हा नेहमीच त्याच्या संहितेसाठी ओळखला जातो. उत्तम संहितेमुळे अनेक सिनेमे आजवर लक्षवेधी ठरले आहेत. उत्तम संहिता असलेला संदीप सावंत दिग्दर्शित आणि पॅनोरमा स्टुडिओज प्रस्तुत ‘ह्या गोष्टीला नावच नाही’ हा मराठी चित्रपट येत्या ८ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे . आयुष्याच्या प्रत्येक वळणावर माणसाचं मन प्रेम, आपुलकी, स्नेह अशा अनंत भावनांच्या हिंदोळ्यावर झोके घेत असतं. कधी कधी आयुष्य अशा वळणावर उभं करत की, आपल्यामागे ठामपणे उभ्या राहणाऱ्या आधाराची गरज भासते. नात्यांची सुरेख सांगड घालत प्रेमाचा, विश्वासाचा,जगण्याचा अर्थ उलगडून दाखविणारा ‘ह्या गोष्टीला नावच नाही’ या चित्रपटाचा भावस्पर्शी ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. जयदीप कोडोलीकर,प्रथमेश अत्रे, चैतन्य जवळगेकर, अनुराधा धामणे,अवधूत पोतदार, सीमा मकोटे, प्रतीक्षा खासनीस आदि कलाकार या चित्रपटात आहेत. (Hya Goshtila Naavach Nahi Marathi Movie Trailer)
डॉ. सतीशकुमार आदगोंडा पाटील यांच्या ‘मृत्यूस्पर्श‘ या कादंबरीवर हा चित्रपट आधारित आहे. अनेक लोक आपल्या आयुष्यातील अपूर्णता स्वीकारून आनंदाने जगत असतात. अगदी छोट्या, साध्या, नैसर्गिक गोष्टींमधे, अनुभवांमध्ये ही आनंदाच्या अनेक छटा लपलेल्या असतात. त्यांचा शोध घेणं, त्यातली गंमत अनुभवणं यातच आपल्या जगण्याचा सारा अर्थ सामावलेला असतो. हे सांगण्याचा प्रयत्न ‘ह्या गोष्टीला नावच नाही’ या चित्रपटातून करण्यात आला आहे.
पॅनोरमा स्टुडिओज सादरकर्ते असलेल्या ‘ह्या गोष्टीला नावच नाही’ चित्रपटाचे कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, डॉ. सतीशकुमार आदगोंडा पाटील, डॉ. अंजली सतीशकुमार पाटील निर्माते आहेत. मुरलीधर छतवानी, रविंद्र औटी सहनिर्माते आहेत. सहाय्यक निर्माते रजत गोस्वामी आहेत. पायोस मेडिलिंक्स प्रायव्हेट लिमिटेड, जयसिंगपूर निर्मित ‘ह्या गोष्टीला नावच नाही’ चित्रपटाची पटकथा-संवाद-दिग्दर्शन संदीप सावंत यांचे आहे. छायाचित्रण प्रियशंकर घोष तर संकलन दिनेश पुजारी यांनी केले आहे. साऊंड डिझाइन सुहास किशोर राणे यांचे आहे.(Hya Goshtila Naavach Nahi Marathi Movie Trailer)
=============================
हे देखील वाचा: व्लॅागर… खून… रहस्य? ‘लाईक आणि सबस्क्राईब’चा उत्कंठावर्धक ट्रेलर प्रदर्शित
=============================
पार्श्वसंगीत विवेक पाटील, आकाश जाधव यांचे आहे. वेशभूषा कुलदीप चव्हाण, सेजल पाटील, राजश्री चारी यांची आहे. रि-रेकॉर्डिंगमिक्सर अनुप देव CAS यांचे आहे. व्यावसायिक सल्लागार देवयानी गांधी आहेत. चित्रपटाच्या वितरणाची जबाबदारी पॅनोरमा स्टुडिओजने सांभाळली आहे. संगीत वितरणाची जबाबदारी पॅनोरमा म्युझिकने सांभाळली आहे. ८ नोव्हेंबरला ‘ह्या गोष्टीला नावच नाही’ सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.