ऋतुजा बागवेला मिळाला मानाचा उस्ताद बिस्मिल्लाह खाँ युवा पुरस्कार
”मी सकाळी ८.३० ला जेवतो” म्हणत जेवणाच्या ताटासह शेअर केलेली संकर्षण कऱ्हाडेची पोस्ट चर्चेत!
मराठी अभिनय क्षेत्रात काही कलाकार असे आहेत जे मुख्य भूमिका साकारत नाहीत पण तरीही त्यांच्या भूमिकेला प्रेक्षकांच भरभरून प्रेम मिळत. याच नटांच्या यादीत अभिनेता संकर्षण कऱ्हाडे याचा ही समावेश होतो. महाराष्ट्राचा सुपरस्टार या कार्यक्रमातून सर्वांसमोर पहिल्यांदा आपला अभिनय दाखवलेला संकर्षण फार कमी वेळात प्रेक्षकांच्या मनात पोहोचला. संकर्षण ने आतापर्यंत अनेक मराठी मालिकांमध्ये काम केले आहे पण त्याला खरी ओळख मिळाली ती ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेतून. या मालिकेत त्याने श्रेयस च्या मित्राची भूमिका साकारली होती. समीर अस त्याच्या भूमिकेच नाव होते आणि मालिकेतील मुख्य भूमिकांप्रमाणे त्याच्या भूमिकेवरही प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केल. संकर्षण अभिनयाबरोबर सुंदर कविता सुद्धा करतो आणि तो त्या सोशल मीडियावर ही अनेकदा शेअर करत असतो आणि काही वेळातच त्याच्या कविता प्रचंड व्हायरल होतात.(Actor Sankarshan Karhade).
संकर्षण सोशल मीडियावर प्रचंड एक्टिव्ह असतो. तो त्याच्या कमाबद्दल तसेच खाजगी आयुष्यातील अनेक छोट्या मोठ्या गोष्टी सोशल मिडीयाच्या माध्यमातून चाहत्यांबरोबर शेअर करत असतो. आता संकर्षण ने सोशल मिडीयावर केलेली अशीच एक पोस्ट व्हायरल झाली आहे. संकर्षणने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन जेवणाच्या ताटाचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्याने तो दररोज सकाळी ८:३० वाजता जेवत असल्याचा खुलासा केला आहे. ”सुप्रभात .. मी तुम्हाला आज एक गंमत सांगतो..मी वयाच्या ७ व्या वर्षी पासून आजपर्यंत रोज सकाळी ८ः३० वा. जेवतो.. पोट्टभर, माझे बाबा बॅंकेत होते.. आता रिटायर्ड झाले. ते बरोब्बर ८.४० ला घरातून निघायचे.. कधी त्यांची वेळ चूकली नाही.. आणि ८.३० ला पान वाढायची माझ्या आईची वेळ कधी चूकली नाही. आजही शूट असेल, नसेल सकाळी लवकर जायचं असेल नसेल.. मला सकाळी ८.३० झाले कि पोटभर भूक लागते.. आणि मी पोटभर जेवतोच..आज आईने साधं वरण भात.. हिरव्या टोमॅटोची भरलेली भाजी.. वांग्याचे भरीत.. वाढलं.. अहो काय सांगु कसं वाटलं.. मनसोक्तं हानलं बघा ..माझ्या आईच्या हातचं काहीही अप्रतिमच लागतं.. सहज शेअर करावं वाटलं” असे कॅप्शन देतसंकर्षण ने जेवणाच्या ताटाचा फोटो शेअर केला आहे.
संकर्षण ने केलेल्या या पोस्ट नंतर त्याचे अनेक चाहते त्यावर कमेंट करत आहेत. संकर्षण ने आतापर्यंत माझिया प्रियाला प्रीत कळेना, आभास हा, मला सासू हवी, खुलता कळी खुलेना, देवाशप्पथ, माझी तुझी रेशीमगाठ अशा अनेक मराठी नाटकांमध्ये काम केले आहे. सध्या तो आम्ही सारे खवय्ये या कार्यक्रमाच सूत्रसंचालन ही करतो. त्याचबरोबर तो नाटकातही काम करतो.(Actor Sankarshan Karhade)
==================
==================
त्याच्या ‘तू म्हणशील तसं’ या नाटकाला प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला. या नाटकाच्या ३००व्या प्रायच्या वेळीचा अनुभव ही त्याने सोशल मिडीयावर शेअर केला होता. आता ‘तू म्हणशील तसं’ या नाटकाबरोबरच त्यांने लिहिलेलं आणि चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ‘नियम व अटी लागू’ या नाटकाला ही उत्तम प्रतिसाद मिळत आहे.