
“फक्त एकच कारण नाही, त्याचे अनेक पैलू आहेत”; Arijit Singh ने सांगितलं निवृत्ती घेण्याचं खरं कारण!
बॉलिवूडचा लोकप्रिय गायक अरिजीत सिंग याने पार्श्वगायनातून निवृत्ती घेतल्याची पोस्ट २७ जानेवारी २०२६ रोजी त्याच्या सोशल मिडियावरुन केली होती. त्याच्या या निर्णयामुळे चाहत्यांना धक्का बसला असून त्याने वयाच्या ३८व्या वर्षी करिअरच्या शिखरावर असताना असा तडकाफडकी निर्णय का घेतला? याचं आता उत्तर स्वत: अरिजीतनेच दिलं आहे. (Arijit Singh)
नुकतंच, अरिजीतने सलमान खानच्या ‘बॅटल ऑफ गलवान’ (Battle Of Galwan) या चित्रपटासाठी ‘मातृभूमी’ हे गाणं गायलं होतं. या व्यतिरिक्त ‘बॉर्डर २’ (Border 2) मध्ये ‘घर कब आओगे’ या अजरामर गाण्यालाही त्याने आवाज दिला होता. तसेच, आगामी बऱ्याच प्रोजेक्टची ऑफर असूनही त्याने असा का निर्णय घेतला याचं कारण सांगताना अरिजीतने सोशल मिडियावर एका कमेंटचं उत्तर देताना कारण स्पष्च केलं आहे.(Bollywood)

अरिजीतने ट्विटमध्ये प्रश्नाचे उत्तर देताना लिहिलं आहे की, हा निर्णय घाईघाईने घेण्यात आलेला नाही. कोणत्याही केवळ एका घटनेमुळे तो झाला नाही. त्याने लिहिलंय की, “फक्त एकच कारण नाही, त्याचे अनेक पैलू आहेत आणि मी बराच काळ याचा विचार करत होतो. शेवटी, मी धाडस एकवटले आणि तो निर्णय घेतला.” (Entertainment News)
================================
================================
पुढे त्याने असं देखील लिहिलं आहे की, “याचे कारण खूप सोपे आहे, आणि ते म्हणजे माझी आवड लवकर कमी होते, म्हणूनच मी अनेकदा माझ्या गाण्यांचे सूर बदलतो आणि ते लाईव्ह सादर करतो. तर, सत्य हे आहे की मी थकलो आहे. पुढे जाण्यासाठी मला वेगवेगळ्या प्रकारचे संगीत वापरून पाहावे लागेल. आणखी एक कारण म्हणजे मी अशा नवीन गायकांना ऐकण्यास उत्सुक आहे जे मला खरोखर प्रेरणा देऊ शकतात.” त्यामुळे आता अरिजीत त्याच्या चाहत्यांसाठी काही नवं सरप्राईज घेऊन येणार का हे पाहण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत.
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi