IC 814 The Kandahar Hijack: नेटफ्लिक्सने घेतला मोठा निर्णय; सिरीजमधल्या अपहरणकर्त्यांची नावे बदलण्यात येणार
वेब सीरीज IC 814 द कंधार हायजॅक या वेब सीरिजबाबत सध्या गदारोळ सुरू आहे. दरम्यान, नेटफ्लिक्सची पत्रकार परिषद पार पडली. तर अपहरणकर्त्यांचे मूळ आणि कोड नेम दोन्ही शोच्या डिस्क्लेमरमध्ये अपडेट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अनुभव सिन्हा यांची वेब सीरिज IC 814 द कंधार हायजॅक २९ ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली. त्यानंतर सोशल मीडियावर चांगलाच गदारोळ माजला आहे.(IC 814 The Kandahar Hijack)
वेब सीरिजमध्ये दहशतवादी भोला आणि शंकर यांच्या नावावरून झालेल्या गदारोळानंतर केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने 2 सप्टेंबर रोजी समन्स जारी केले होते. नेटफ्लिक्स इंडियाच्या कंटेंट हेडला तो पाठवण्यात आला होता. मंगळवारी नेटफ्लिक्सच्या प्रमुख मोनिका शेरगिल मंत्रालयातील अधिकाऱ्यांसमोर हजर झाल्या. यानंतर नेटफ्लिक्सने पत्रकार परिषद घेतली, यावेळी होस्ट आरजे मंत्रा यांनी या प्रकरणाबाबत एक निवेदन वाचून दाखवले. हे विधान दोनवेळा इंग्रजीत वाचले गेले आहे.
नेटफ्लिक्स इंडियाने मंगळवारी (3 ऑगस्ट) सांगितले की, त्यांनी आपल्या ‘IC 814 द कंधार हायजॅक‘ या सीरिजचे प्रारंभिक डिस्क्लेमर अपडेट केले आहे. दहशतवाद्यांच्या कोड नेमवरून वाद निर्माण झाला आहे. नेटफ्लिक्स इंडियाच्या कंटेंट च्या उपाध्यक्ष मोनिका शेरगिल म्हणाल्या की, “1999 मध्ये इंडियन एअरलाइन्सच्या विमान 814 च्या अपहरणाशी संबंधित सीरीजचे डिस्क्लेमर बदलण्यात आले आहे.” नेटफ्लिक्सच्या कंटेंट हेडने असेही म्हटले आहे की, ‘सिरीजमधील कोड नेममध्ये प्रत्यक्ष घटनेदरम्यान वापरण्यात आलेली नावे दाखवण्यात आली आहेत. भारतात कथाकथनाची समृद्ध संस्कृती आहे आणि आम्ही या कथा आणि त्यांचे अस्सल प्रतिनिधित्व प्रदर्शित करण्यासाठी कटिबद्ध आहोत.”(IC 814 The Kandahar Hijack)
=================================
हे देखील वाचा: Stree 2 चा सरकटा सुनील कुमार दिसणार ‘बिग बॉस १८’ च्या घरात!
=================================
या सीरिजचेमुळे सोशल मीडियावर आणि इतरत्र वाद निर्माण झाला असून, एका विशिष्ट समुदायातील दहशतवाद्यांना संरक्षण दिल्याच्या आरोपावरून चित्रपट निर्मात्याने अपहरणकर्त्यांची नावे बदलून ‘शंकर’ आणि ‘भोला’ केल्याचा दावा अनेकांनी केला आहे. सोशल मीडियावर #BoycottNetflix, #BoycottBollywood आणि #IC814 सारखे हॅशटॅग ट्रेंड होत आहेत.