Big Budget Films : आगामी बॉलिवूडच्या बिग बजेट चित्रपटांची यादी!

महाराष्ट्राची सुगरण जोडी स्पर्धेत भाग घेऊन अरुंधती स्वीकारणार नवं आव्हान!
स्टार प्रवाहची लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते‘ मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्रावर प्रेक्षक भरभरुन प्रेम करत आहेत. सध्या मालिकेत वेगवेगळे वळण ही पहायला मिळत आहेत. आणि त्यामुळे आता मालिकेत पुढे पुढे काय होणार ही उत्सुकता ही प्रेक्षकांना लागून राहिलेली असते. सध्या आई कुठे काय करते या मालिकेत एक वेगळाच ट्रैक सुरु आहे.या मालिकेत महाराष्ट्राची सुगरण जोडी ही स्पर्धा रंगत आहे. आणि प्रेक्षकांच्या आवडत्या अरुंधतीने या स्पर्धेत भाग घेत नवं आव्हान स्वीकारलं आहे. आणि अरुंधतीला या स्पर्धेत साथ देणार आहे मिहीर शर्मा. अरुंधती आणि मिहीरला तोडीस तोड उत्तर देण्यासाठी अनिरुद्ध आणि संजनाने देखिल कंबर कसली आहे. त्यामुळे स्पर्धा चुरशीची होणार हे मात्र नक्की. (Aai Kuthe Kay karte)

अरुंधतीची स्वयंपाकाची आवड सर्वांनाच माहित आहे. या स्पर्धेत उतरण्याचं कारण फक्त स्वयंपाकाची आवड इतकंच नाही. तर अरुंधतीला आपलं घर म्हणजेच समृद्धी निवास वाचवायचं आहे. अनिरुद्ध-संजनाने घरावर हक्क दाखवलाय. समृद्धी निवास पुन्हा मिळवण्यासाठी अरुंधतीला पैश्यांची गरज आहे आणि म्हणूनच ती महाराष्ट्राची सुगरण स्पर्धेत भाग घेणार आहे. अरुंधतीला साथ देणारा मिहीर शर्मा उत्तम शेफ आहे. त्यामुळे ही जोडी या स्पर्धेत आपली छाप पाडण्यासाठी सज्ज आहेत. मात्र अरुंधती जिंकू नये यासाठी अनिरुद्ध आणि संजना देखिल या स्पर्धेत उतरले आहेत. त्यामुळे आई कुठे काय करते मालिकेतली ही स्पर्धा उत्कंठावर्धक होणार यात शंका नाही.(Aai Kuthe Kay Karte)
==============================
==============================
मालिकेत पहिल्यांदा अश्याप्रकारची स्पर्धा होत असल्यामुळे सर्वांनाच उत्सुकता आहे. मालिकेची संपूर्ण टीम हा सीन करताना खूप धमाल करत आहेत. तेव्हा ही उत्कंठावर्धक चुरस अनुभवायची असेल तर तुमची आवडती आई कुठे काय करते ही मालिका दुपारी २.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर पाहाता येईल.