‘झी मराठी’च्या लोकप्रिय मालिकेतून ‘या’ अभिनेत्याची एक्झिट; ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता

‘आई’ नंतर मधुराणी साकारणार सावित्रीबाई फुले तर डॉ.अमोल कोल्हे दिसणार जोतिबा फुलेंच्या भूमिकेत !
“मी सावित्रीबाई जोतीराव फुले” या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांना या क्रांतिकारी दाम्पत्याची संघर्षमय गोष्ट पाहता येईल. या मालिकेच्या माध्यमातून सावित्रीबाई आणि जोतीबांच्या विचारांची, त्यांचं समाजाप्रती असलेलं योगदान आणि त्या काळातील त्यांच्या कठीण परिस्थितीच्या संघर्षाची माहिती मिळणार आहे. सर्वात खास म्हणजे या मालिकेत मधुराणी गोखले या अभिनेत्रीने सावित्रीबाई फुले यांची भूमिका साकारली आहे, आणि डॉ. अमोल कोल्हे महात्मा जोतीबा फुले यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. अमोल कोल्हे हे या मालिकेचे निर्माते देखील आहेत, आणि त्यांनी आपल्या भूमिका तसेच निर्माता म्हणून काम करण्याचा अनुभव फार महत्त्वपूर्ण मानला आहे.(Me Savitribai Jyotirao Phule Marathi Serial)

या मालिकेविषयी बोलताना मधुराणी गोखले म्हणाल्या की , “सावित्रीबाई फुले यांचा व्यक्तिमत्व साकारणे हे एक मोठं आव्हान आहे. आज आपण जे freely शिकतो, काम करतो आणि स्वतंत्रपणे जगतो, ते साधायला १५० वर्षांपूर्वी सावित्रीबाई फुले यांनी खूप संघर्ष केला. त्या संघर्षाची कथा साकारण्याचा संधी मिळणं हे माझं भाग्य आहे.”

तर डॉ. अमोल कोल्हे यांनी याबद्दल सांगितले की, “महात्मा जोतीराव फुले यांचा विचार आणि त्यांच्या संघर्षाची महती लोकांपर्यंत पोहोचवणं हे खूप मोठं कार्य आहे. ‘राजा शिवछत्रपती’ या मालिकेतून स्टार प्रवाहसोबत माझा विशेष संबंध आहे, आणि आता निर्मात्या म्हणून मी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित मालिकेचा भाग होऊन खूप गर्व करत आहे.”
============================
हे देखील वाचा: Lapandav मालिकेतल्या सखी-कान्हाचं हटके प्री-वेडिंग फोटोशूट पाहिलतं का?
============================
ही मालिका 5 जानेवारी 2025 रोजी स्टार प्रवाह वाहिनीवर प्रसारित होईल. “मी सावित्रीबाई जोतीराव फुले” या मालिकेची निर्मिती जगदंब क्रिएशन्स यांनी केली असून, या मालिकेत प्रेक्षकांना एक नवा, ऐतिहासिक दृष्टिकोन मिळणार आहे. क्रांतिकारक सावित्रीबाई फुले यांचे जीवन, संघर्ष आणि त्यांच्या विचारांची महती आजच्या पिढीला कळवण्यासाठी ही मालिका महत्त्वपूर्ण ठरेल.