Sachin Pilgoankar : ‘ही’ आहे ‘७० रुपये वारले’ संवादामागची गोष्ट

‘सध्याच्या काळात मूलं जन्माला घालूच नये’ प्रसिद्ध अभिनेत्रीच धक्कादायक वक्तव्य !
बॉलिवूड अभिनेत्री शिबा चड्ढा यांनी ‘मिर्झापूर’, ‘बंदिश बँडिट्स’ यांसारख्या लोकप्रिय वेब सिरीज आणि ‘बधाई हो’, ‘डॉक्टर जी’ यांसारख्या चित्रपटांमधील दमदार भूमिकांमुळे खास ओळख निर्माण केली आहे. नुकत्याच दिलेल्या एका पॉडकास्ट मुलाखतीत शिबा यांनी सध्याच्या काळात मूल नकोच, असं धक्कादायक वक्तव्य केलं आहे.(actress sheeba chaddha)

सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या या मुलाखतीत त्या म्हणाल्या की, “आजच्या काळात बाळाला जन्म देणं फारच कठीण आहे. विशेषतः सिंगल आईसाठी तर ही एक मोठी जबाबदारी आहे. काहीही झालं तरी त्या क्षणी बाळासाठी हजर राहावंच लागतं. मी प्रत्येक सिंगल आईचं दुःख समजू शकते. पूर्वी संपूर्ण गाव एकत्र येऊन बाळाची काळजी घ्यायचं, पण आज कुटुंबं छोटी होत गेली आणि अडचणी वाढल्या आहेत. माझ्या मुलीला सांभाळण्यासाठी मी अनेक चांगल्या ऑफर्स नाकारल्या आहेत.”

त्या पुढे असं ही म्हणाल्या, “माझ्या मते, सध्याच्या परिस्थितीत मूल जन्माला घालणं योग्य नाही. आजच्या काळात बाळाला एकट्यानं सांभाळणं फार अवघड झालं आहे. अनेकदा आई-बाबा दोघांचाही पगार खर्च भागवण्यासाठी अपुरा पडतो. आपण मूल का जन्माला घालतो याचा लोकांनी गंभीरपणे विचार करायला हवा. फक्त समाज काय म्हणेल किंवा आई-बाप व्हायचंच आहे या हेतूने मूल जन्माला घालणं चुकीचं आहे. महागाई, बदलती जीवनशैली, कौटुंबिक तणाव आणि एकटेपणा यामुळे आज पालकांनी जबाबदारीने निर्णय घ्यायला हवा.”(actress sheeba chaddha)
==============================
==============================
दरम्यान, शिबा चड्ढा लवकरच ‘रामायण’ या बहुचर्चित चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या चित्रपटात त्या ‘मंथरा’ची भूमिका साकारत असून, त्यांच्यासोबत रणबीर कपूर, यश, साई पल्लवी, रवी दुबे, सनी देओल, काजल अग्रवाल, अरुण गोविल, रकूल प्रीत मेहता, विवेक ओबेरॉय, शोभना आणि कुणाल कपूर हे कलाकारही झळकणार आहेत.