Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Krantijyoti Vidyalaya Marathi Madhyam ने दिलं मराठी शाळांच्या शिक्षक-विद्यार्थ्यांना नवं

Ranapati Shivray Swari Agra Trailer: छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा सांगणाऱ्या

Bigg Boss Marathi 6: ‘तो माझा हात कधीच सोडत नाही…’ राधा

Bigg Boss Marathi 6: सागरच्या सल्ल्यामुळे घरात मतभेदांचा भडका; सदस्यांमध्ये वैचारिक संघर्ष!

Sanam Teri Kasam सिनेमातील एका गाण्याच्या मेकिंगचा भन्नाट किस्सा!

डायलॉगशिवाय गांधी विचार मांडणारा Gandhi Talks; सिद्धार्थ जाधव झळकणार विजय

एक स्त्री म्हणून माफी…”, राकेश बापट प्रकरणावर Neha Shitole हिची

हमाली करणाऱ्या Roshan Bhajankarने कष्टाचे दिवस काढले; नशीबाने थेट उघडलं

“शिवरायांवर जर का आम्ही चित्रपट करत असू तर…”; Digpal Lanjekar

Rubaab Marathi Movie Trailer: प्रेम, संघर्ष आणि स्वाभिमान असलेल्या डॅशिंग

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Indian Cinema : शुटींगसाठी लागली २३ वर्ष; वर्ल्ड रेकॉर्ड आणि बरंच काही….

 Indian Cinema : शुटींगसाठी लागली २३ वर्ष; वर्ल्ड रेकॉर्ड आणि बरंच काही….
कलाकृती विशेष

Indian Cinema : शुटींगसाठी लागली २३ वर्ष; वर्ल्ड रेकॉर्ड आणि बरंच काही….

by रसिका शिंदे-पॉल 08/03/2025

भारतीय चित्रपटसृष्टीचा इतिहास फार जुना आहे. या चित्रपटसृष्टीत दरवर्षी अनेक चित्रपट येतात आणि प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करतात. ठराविक चित्रपटांना प्रेक्षक फारच उत्सफुर्त प्रतिसाद देतात तर काही चित्रपटांना केराची टोपलीही दाखवतात. मात्र, हिंदी असो किंवा अन्य कुठल्याही भाषेतील चित्रपटसृष्टी असो बऱ्याच कलाकृतींनी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये भारताची मान उंचावली आहे. जाणून घेऊयात असे कोणते चित्रपट आहेत ज्यांची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे. (Guinness book of world record)

यादें

१९६४ साली प्रदर्शित झालेल्या ‘यादें’ (Yaadein) या चित्रपटात केवळ एकच अभिनेते होते ते म्हणजे सुनील दत्त. जगातील हा एकमेव चित्रपट आहे ज्यात केवळ एकच अभिनेता असून चित्रपटाची कथा त्याच्याभोवती फिरते. आणि याच कारणामुळे Sunil Dutt अभिनित, निर्मित आणि दिग्दर्शित यादें या चित्रपटाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली आले. या चित्रपटाची आणखी एक विशेष बाब म्हणजे चित्रपटात नर्गिस यांनी सुनील दत्त यांच्या पत्नीची भूमिका केली असूनही चित्रपटात त्यांचं अस्तित्व केवळ आवाजातून दाखवलं आहे. (Indian Cinema History)

कहो ना प्यार है

ह्रतिक रोशन याचा डेब्यू चित्रपट असणाऱ्या ‘कहो ना प्यार है’ (Kaho Na Pyaar Hai) या चित्रपटाची नोंदही गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे. २००० साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने ७८.९३ कोटींचं लाईफटाईम कलेक्शन केलं आहे. केवळ इतकंच नव्हे तर हिंदी चित्रपटसृष्टीत आजवर ९२ पुरस्कार जिंकणारा हा एकमेव चित्रपट ठरल्यामुळे या चित्रपटाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद केली गेली आहे. (Entertainment Masala)

===========

हे देखील वाचा : Chhaava : चित्रपटातील एका गाण्यात दिसले प्रभू श्रीराम आणि मारुतीराय

===========

इंद्रसभा

१९३२ साली प्रदर्शित झालेल्या ‘इंद्रसभा’ (Indrasabha) या संगीत-नृत्य चित्रपटात तब्बल ७२ गाणी होती. आत्तापर्यंत इतकी गाणी असणारा एकही चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीत तयार झाला नाही. आणि याच कारणामुळे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने या चित्रपटाची दखल घेतली होती.(Untold Stories)

लव एन्ड गॉड

एखाद्या चित्रपटाच्या शुटींगसाठी किमान काही महिने किंवा जास्तीत १-२ वर्ष लागू शकतात; बरोबर ना? पण ‘लव एन्ड गॉड’ (Love & god) हा चित्रपट शूट होण्यासाठी तब्बल २३ वर्ष लागली होती. याच कारणामुळे ‘लव एन्ड गॉड’ चित्रपटाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे. १९६३ साली या चित्रपटाच्या शुटींगला सुरुवात झाली होती. पण त्यानंतर चित्रपटातील प्रमुख अभिनेते गुरुदत्त यांचं निधन झालं, त्यानंतर १९७० मध्ये संजीव कुमार यांच्यासोबत शूट सुरु झालं आणि तेव्हा दिग्दर्शक आसिफ यांची तब्येत बिघडली आणि त्यात त्यांचं निधन झालं. अशा अनेक अडचणींचा सामना करत अखेर आसिफ यांच्या पत्नीने उरलेलं शुटींग पुर्ण करत १९८६ साली चित्रपट प्रदर्शित केला. (Trending News)

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Bollywood bollywood update hritik roshan Indian Cinema Indian film industry kaho na pyaar hai Sunil Dutt World records yaadein
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.