‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
देशातील पहिल्या महिला आयपीएस किरण बेदी यांच्या बायोपिकची झाली घोषणा; ‘या’ दिवशी येणार सिनेमा
देशाच्या पहिल्या आयपीएस किरण बेदी यांना गुन्हेगार ही घाबरत होते. त्यांच्या बॅचमधील ८० पुरुष पोलिस अधिकाऱ्यांपैकी त्या एकमेव महिला आयपीएस अधिकारी असल्याचे सांगितले जाते. किरण बेदी यांनी मुलींना पुढे येऊन स्वत:ची लढाई लढण्याची प्रेरणा दिली.एकदा त्यांच्या बहिणीला कोणीतरी छेडले असता किरण बेदी यांनी बाजारातच त्या आरोपीला मारहाण केली होती. इतकंच नाही तर हुंडाप्रथेविरोधात ही त्यांनी आवाज उठवला आहे. किरण बेदीचं नाव तुम्ही ऐकलं असेल पण त्यांची पूर्ण गोष्ट फार कमी लोकांना माहित आहे. आता त्यांची हीच कथा चित्रपट म्हणून पडद्यावर येत आहे. त्याच नाव असणार आहे ‘बेदी‘. 11 जून रोजी निर्मात्यांनी बायोपिकचा अनाउंसमेंट व्हिडिओ शेअर केला आहे जो खूप व्हायरल ही होत आहे. ‘बेदी‘ या चित्रपटाचे दिग्दर्शन कुशल चावला करणार आहे. (Kiran Bedi Biopic)
सिनेमातील इतर कालाकारांच्या नावाचा खुलासा अद्याप झालेला नाही. पण हा चित्रपट पुढील वर्षी म्हणजेच २०२५ मध्ये प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. किरण बेदी हे देशातील एक मोठं नाव आहे. कदाचित तुम्हाला ही माहित नसेल की त्या आयपीएस असून एक टेनिसपटू देखील होत्या. १९७२ मध्ये त्या आयपीएस झाल्या.ते ही देशातील पहिल्या महिला आयपीएस. 35 वर्षे देशसेवा केल्यानंतर 2007 मध्ये त्या निवृत्त झाल्या. त्यावेळी त्या ब्युरो ऑफ पोलिस रिसर्च अँड डेव्हलपमेंटच्या महासंचालक होत्या.
किरण बेदी यांनी दिल्ली, गोवा, चंदीगड आणि मिझोराममध्ये आयपीएस अधिकारी म्हणून काम केलेले आहे. 9 जून 1949 रोजी अमृतसरमध्ये जन्मलेल्या किरण बेदी यांनी ड्रग्जविरोधात ही मोहीम राबवली आहे. तिहार कारागृहाला आदर्श कारागृह बनविण्यात त्यांनी योगदान दिले आहे. तसेच त्यांनी कारागृहातील कैद्यांच्या धूम्रपानावर बंदी घातली होती आणि त्यांच्यासाठी विपश्यना ध्यानाचे वर्ग ही घेतले आहेत. याशिवाय किरण बेदी यांनी इतरही अनेक सामाजिक कामे केलेली आहेत.(Kiran Bedi Biopic)
=====================================
हे देखील वाचा: Kalki 2898 AD चा जबरदस्त ट्रेलर रिलीज; दीपिकाच्या बेबी बंपची ही दिसली झलक
=====================================
किरण बेदी यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर, किरण बेदी आपल्यापेक्षा 9 वर्षांनी मोठ्या असलेल्या ब्रिज बेदी यांची पहीली भेट टेनिस कोर्ट झाली होती . १९७२ मध्ये या दोघांनी लग्न केले. आणि तीन वर्षांनंतर त्यांच्या घरी मुलीचा जन्म झाला. आता बेदी या सिनेमाद्वारे किरण बेदी यांच्या आयुष्याती गोष्ट पाहण्याती उत्सुकता अनेकांना लागून राहीली आहे यात शंका नाही.