Bahubali To KGF; साऊथच्या हिट चित्रपटांना ‘या’ मराठी कलाकांनी दिला

Inspector Zende : मराठमोळ्या पोलिसाचं कर्तृत्व मोठ्या पडद्यावर मांडणाऱ्या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज
मराठी मालिका, चित्रपटांमधून लिखाण, अभिनय करत थेट हिंदीत आपला जम बसवणाऱ्या चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandlekar) यांनी आता थेट नेटफ्लिक्स हे जगातील सर्वात मोठं ओटीटी प्लॅटफॉर्म गाठलं आहे… चिन्मय मांडलेकर लिखित आणि दिग्दर्शित ‘इन्सपेक्टर झेंडे’ (Inspector Zende Movie) हा चित्रपट रिलीज होणार अशून नुकताच या चित्रपटाचा दमदार ट्रेलर रिलीज झाला आहे… (Bollywood News)

‘इन्सपेक्टर झेंडे’ या चित्रपटाची कथा सत्य घटनेवर आधारित आहे… ७०-८०च्या दशकातील चार्ल्स शोभराज या कुख्यात चोर आणि सिरीयल किलरला एका मराठमोळ्या पोलिसाने जेरबंद केलं होतं… ते म्हणजे मधुकर झेंडे… आणि त्यांचीच कथा या क्राईम ड्रामा चित्रपटातून दाखवली जाणार आहे… चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये कशाप्रकारे पोलिस चार्ल्सला शोधण्यासाठी सापळा रचतात याचं जरासं विनोदी अंगाने सादरीकरण करत मुळ कथा मांडण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाने केलेला पाहायला मिळतो… (Bollywood crime drama movies)

विशेष म्हणजे ‘इन्सपेक्टर झेंडे’ या चित्रपटातील प्रमुख भूमिकाअ मनोज बाजपेयी (Manoj Bajapayee) यांनी साकारली असून चार्ल्स शोभराजची भूमिका जिम सर्भ (Jim Sarbh) याने केली आहे… तसेच, या चित्रपटात ओंकार राऊत, भाऊ कदम, गिरीजा ओक, सचिन खेडेकर (Sachin Khedekar), हरीश दुधाडे अशी बरीच मराठी कलाकार मंडळी दिसत आहेत… त्यामुळे मराठमोळ्या पोलिसाची कथा आणि त्यातच मराठी दिग्दर्शकाचा हा चित्रपट इन्सपेक्टर झेंडे प्रेक्षकांना नेटफ्लिक्सवर ५ सपटेंबर २०२५ पासून राहता येणार आहे…(Netflix)
================================
हे देखील वाचा : Akshay Kumar तब्बल १७ वर्षांनंतर ‘या’ अभिनेत्यासोबत चित्रपटात एकत्र झळकणार!
=================================
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi