मिलिंद गवळी यांनी त्यांच्या पोस्टमधून दिला ‘सवतीचे कुंकू’ चित्रपटाच्या आठवणींना
गुरुदत्त-वहिदा च्या पहिल्या भेटीची इंटरेस्टिंग स्टोरी!
गुरूदत्त यांनी ‘आरपार’ (१९५४) पासून स्वत:च्या प्रॉडक्शन हाऊसच्या निर्मीतीला सुरूवात केली. ‘आरपार’ची नायिका होती ‘श्यामा’. १९५५ साली मि.अॅन्ड मिसेस ५५ या सिनेमात त्याची नायिका होती मधुबाला. याच्या पुढच्याच वर्षी आलेल्या ’सी आय डी’ ची नायिका होती शकीला. पण यात तो स्वत: नायक नव्हता तर देव आनंद होता. (Gurudatta-Vahida)
याच ‘सी आय डी’ त आणखी एक नायिका रूपेरी पडद्यावर आली ती होती वहिदा रहमान. गुरूच्या पहिल्या चार सिनेमाच्या या चार वेगवेगळ्या नायिका होत्या. वहिदाचा हिंदीतील प्रवेश कसा झाला त्याचा मनोरंजक किस्सा आहे. गुरू सिनेमासाठी कायम नव्या विषयाच्या शोधात असायचा. त्याच्या हैद्राबादच्या डिस्ट्रीब्यूटर्सनी त्याला हैद्राबादला बोलावले. कारण तिथे तुफान गर्दीत चालू असलेला ‘मिसी अम्मा’ हा सिनेमा त्याने पहावा व जमलंच तर त्याचा रीकेक हिंदीत करावा असा त्यांचा आग्रह होता. गुरू आणि अब्रार अल्वी हैद्राबादला गेले व त्यांनी ‘मिसी अम्मा’ हा सिनेमा बघितला पण त्यांना काही तो काही तितकासा आवडला नाही (या ‘मिसी अम्मा’चा हिंदीत रीमेक मिस मेरी या नावाने एल व्ही प्रसाद यांनी १९५७ साली केला होता!) तिथेच हैद्राबादेत आणखी एक सिनेमा तुफान गर्दी खेचत होता त्याचे नाव होते ’रोजुल मुराई’ या सिनेमातील एक गाणे व नृत्य एवढे लोकप्रिय झाले होते की या गाण्याचे केवळ एक रीळ काढून दुसर्या सिनेमाच्या शेवटाला जोडून दाखवले जाई व तो पडेल सिनेमा देखील गर्दी खेचू लागे. (Gurudatta-Vahida)
हा सिनेमा बघितल्यावर गुरूदत्तला सिनेमा पेक्षा त्यातील नृत्यांगनाच जास्त आवडली. गुरू लगेच तिला जाऊन भेटला व तिच्याशी रीतसर करार करून मुंबईत घेवून आला. त्यावेळी त्यांचा सी आय डी हा सिनेमा फ्लोअरवर होता. राज खोसला सिनेमाचे दिग्दर्शन करीत होता.सिनेमाची नायिका ठरली होती शूटींग पण बर्यापैकी झालं होतं. मग गुरूने या सिनेमात तिला छोटीशी भूमिका देवून तिच्यावर शमशादने गायलेलं ’कहीं पे निगाहें कहीं पे निशाना’ हे गाणं चित्रीत केलं ! ही नायिका म्हणजे वहिदा रहमान.
ती मुंबईत आली तेव्हा खूपच बारीक होती. युनिट मधील सर्व लोक गुरूच्या या निवडीवर हसत होते पण गुरूचा तिच्यावर विश्वास होता. त्याच्या महत्वकांक्षी ’प्यासा’ या सिनेमात वहिदाला गुलाबूची भूमिका मिळाली.हळूहळू वहिदा गुरूच्या आयुष्यात येत होती. ‘सोलहवा साल’ या राज खोसलाच्या सिनेमात ती देवची नायिका बनली.पण या सिनेमाच्या वेळी तिचे आणि राज खोसलाचे भांडण झाले व वहिदाने पुन्हा त्याच्या सोबत कधीही काम न करण्याची शपथ घेतली. ( ही शपथ तब्बल २६ वर्षानंतर तिने ’सनी’ च्या वेळी १९८४ साली मोडली.) या भांडणाने मात्र राज खोसलाच्या मनातील एक इच्छा मात्र अधुरी राहिली. त्याला वहिदाला त्याच गाण्यावर नाचवायचे होते ज्या गाण्याने तिने तेलगू ’रोजुल मराई’त हंगामा केला होता.व ज्या गाण्यावर फिदा होवून गुरू ने तिला मुंबईत आणले होते. (Gurudatta-Vahida)
’बंबई का बाबू’ साठी राजने देव- वहिदा अशीच निवड केली होती. त्या काळातील स्क्रीन या चित्रपट विषयक साप्ताहिकात ‘बंबई का बाबू’ या चित्रपटाची मोठी जाहिरात आली होती त्यात देवानंदची नायिका वहिदा रहमान दाखवली होती पण दोघातील भांडणाने आता वहिदा ने हा सिनेमा सोडला. आता त्या भूमिकेत सुचित्रा सेन आली.राजच्या डोक्यातून मात्र त्या तेलगू गाण्याची ट्यून काही जाता जात नव्हती.त्याने ’बंबई का बाबू’ त या ट्यून वर आधारीत गाणे बनवले.सुचित्राचा अभिनय चांगला असला तरी तिला नाचाचे अंग नव्हतेच.वहिदाला डोळ्यापुढे ठेवून बनवलेल्या या गाण्याचे बोल होते ’देखने मे भोला है दिल का सलोना,बंबई से आया है बाबू चिनन्ना….’
============
हे देखील वाचा : मुमताजची बॉलिवूडमधील इन्स्पायरिंग जर्नी…
============
जाता जाता थोडसं ‘बंबई का बाबू’ या चित्रपटाबद्दल. ख्यातनाम साहित्यिक ओ हेन्री यांच्या ‘डबल डायस डीसीवर’ या कलाकृतीवर या सिनेमाचे कथानक बेतले होते. बहिण भावाच्या नात्याचा एक वेगळा अँगल (जो समाजाला कधीच पटत नाही) या सिनेमात दाखवला होता. या चित्रपटातील गाणी मजरूर सुलतानपूरी यांनी लिहिली होती तर संगीत सचिन देव बर्मन यांचे होते. यातील ‘दिवाना मस्ताना हुआ’,’ दिल साथी ना कोई मंजिल’, चल री सजनी अब क्या सोचे’ हि गाणे खूप गाजली. आशा भोसले यांचे वर उल्लेख केलेले गाणे ‘देखने मे भोला है दिल का सलोना’ रेडिओवर प्रचंड गाजले.गाणी गाजली पण सिनेमाचे कथानक समाजाला मान्य होणारे नसल्याने सिनेमा सुपर फ्लॉप झाला. (Gurudatta-Vahida)
याच कथानकावर १९७४ साली अमिताभ बच्चन आणि सायरा बानू यांचा ‘जमीर’ हा चित्रपट आला होता ; तो देखील अपयशी ठरला.