आयपीएल: बॉलिवूड सेलिब्रेटी आणि त्यांच्या आवडत्या आयपीएल टीम!
सध्या सगळीकडे आयपीएलचे वारे वाहतायत. भारतातल्या तमाम क्रिकेटप्रेमींसाठी आयपीएल म्हणजे जणू ‘जीव की प्राण’ आहे. इतकंच काय तर गेली २ वर्ष भारताच्या गुगल सर्च इंडेक्स मध्ये ‘आयपीएल’ टॉपला आहे. म्हणजेच गेली २ वर्ष भारतात सर्वात जास्त लोकांनी सर्च केलेला टॉपिक होता आयपीएल. सामान्य लोकांइतकीच आयपीएलची क्रेझ बॉलिवूड स्टार्सनाही आहे. म्हणूनच तर बॉलिवूडमधले कित्येक स्टार्स आयपीएल टीम्सचे मालक आहेत. (IPL Supporter Bollywood Stars)
अर्थात आपल्या टीमला सपोर्ट करायला हे टीमचे मालक सामन्यादरम्यान उपस्थित असतातच. पण या मालकांव्यतिरिक्त बॉलिवूडचे कित्येक ‘सितारे’ आपल्या आवडत्या टीमला ‘चिअर अप’ करायला थेट स्टेडिअममध्ये जाऊन बसतात. चला तर मग, जाणून घेऊया बॉलिवूड सेलिब्रेटी आणि त्यांच्या आवडत्या टीम्सबद्दल! (IPL Supporter Bollywood Stars)
१. मुंबई इंडियन्स
महाराष्ट्रातल्या बहुतांश लोकांची आवडती टीम म्हणजे मुंबई इंडियन्स. केवळ सर्वसामान्यांचीच नाही, तर क्रिकेट जगतातला बादशाह मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरही ‘मुंबई इंडियन्स’ टीमला सपोर्ट करतो. या टीमच्या मालक आहेत नीता अंबानी. तर, टीमचा कॅप्टन आहे सध्याचा भारतीय टीमचा कॅप्टन रोहित शर्मा.
बॉलिवूडचा सुपरस्टारअमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन, शाहिद कपूर, करीना कपूर, सैफ अली खान, सोनाक्षी सिन्हा, अमिषा पटेल, अनु मलिक असे अनेक बॉलिवूड स्टार्स मुंबई इंडियन्स संघाला सपोर्ट करतात. (IPL Supporter Bollywood Stars)
२. कोलकाता नाईट रायडर्स:
कोलकाता नाईट रायडर्स संघाचा मालक आहे, बॉलीवूडचा बादशहा शाहरुख खान. त्यामुळे तमाम शाहरुख प्रेमी कोलकाता नाईट रायडर्स टीमला स्पोर्ट करतात. या टीमचा कॅप्टन आहे श्रेयस अय्यर.
बॉलीवूडमधली शाहरुखची जीवश्च कंठश्च मैत्रीण जुही चावला देखील कोलकाता नाईट रायडर्स टीमला सपोर्ट करते. जुही चावलासोबतच अर्जुन रामपाल, प्रियांका चोप्रा, रितेश देशमुख आणि सुझान खान या टीमचे स्टार समर्थक आहेत.
४. पंजाब किंग्ज इलेव्हन:
पंजाब किंग्ज इलेव्हन टीमची मालकीण आहे आपल्या सर्वांची लाडकी लिरिल गर्ल प्रीती झिंटा, तर कॅप्टन आहे, आयपीएल मधला लोकप्रिय खेळाडू मयांक अगरवाल.
बॉलिवूडमधील इतर कलाकारांसोबतच प्रीतीचा मित्र सलमान खान, सनी लिओनी पंजाब किंग्ज इलेव्हन टीमचे स्टार समर्थक आहेत.
५. दिल्ली डेअरडेव्हिल्स:
दिल्ली डेअरडेव्हिल्स टीमचे मालक आहेत GMR ग्रुप आणि JSW ग्रुप, तर कॅप्टन आहे ऋषभ पंत. हा आता ही गोष्ट खरी आहे की या संघांचे मालक बॉलिवूडशी नाही तर, बिझनेस जगताशी संबंधित आहेत. परंतु, तरीही या टीमला बॉलिवूडचे कित्येक स्टार सपोर्ट करत असतात.
अक्षय कुमार, रणबीर कपूर, नर्गिस फाखरी यासारखे बॉलिवूडचे आघाडीचे कलाकार दिल्ली डेअरडेव्हिल्सला सपोर्ट करतात. (IPL Supporter Bollywood Stars)
६. सनरायझर्स हैदराबाद:
केवळ बॉलिवूडच नाही तर, अनेक टॉलीवूड सेलिब्रिटीही सनरायझर्स हैदराबाद टीमला सपोर्ट करतात. या टीमचे मालक आहेत, सन ग्रुपचे सर्वेसर्वा कलानिथी मारन, तर कॅप्टन आहे न्यूझीलंडचा क्रिकेटर केन विल्यमसन.
यामी गौतम, अल्लू शिरीष, राणा डग्गुबती यांच्यासोबत टेनिस स्टार सानिया मिर्झाही या टीमला सपोर्ट करते.
७. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर:
या टीमचा मालकी हक्क आहे युनायटेड स्पिरिट या कंपनीकडे, तर या टीमचा कॅप्टन आहे, माजी भारतीय कॅप्टन आणि बॉलिवूडचा जावई विराट कोहली.
आता अभिनेत्री अभिनेत्री अनुष्का शर्मा तर या टीमला स्पोर्ट करणारच. पण कतरिना कैफ आणि दीपिका पदुकोण या बॉलीवूडच्या अभिनेत्री रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाच्या ब्रँड ॲम्बेसेडर होत्या. मोठी स्टारकास्ट सपोर्ट करते या टीमला!
८. राजस्थान रॉयल्स:
राजस्थान रॉयल्स टीमची मालकीण आहे फिटनेस क्वीन शिल्पा शेट्टी, तर कॅप्टन आहे, भारतीय खेळाडू संजू सॅमसन.
शिल्पसोबत बॉलिवूडमधली तिची जवळती मंडळी या टीमला सपोर्ट करतात. (IPL Supporter Bollywood Stars)
९. चेन्नई सुपर किंग्ज
या टीमचे मालक आहेत चेन्नई सुपर किंग्ज क्रिकेट लिमिटेडस तर, कॅप्टन आहे रवींद्र जडेजा. आधी या टीमचा कॅप्टन होता सर्वच लाडका माही म्हणजेच एम एस धोनी.
या टीमला एकेकाळी दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतने पाठिंबा दिला होता. शिवाय, दक्षिणेतील विजय आणि नयनतारा चेन्नई सुपर किंग्जचे ब्रँड ॲम्बेसेडर होते.
तुम्ही कोणत्या टीमला सपोर्ट करता, हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.