Prajakta Mali : “तिने कशालाच हद्दपार…”, प्राजक्तानं केलं आलिया भट्टचं

Chhaava : ‘छत्रपती संभाजी महाराज एक गारूड’ आयपीएस विश्वास नांगरे पाटील यांनी केले ‘छावा’चे कौतुक
छत्रपती संभाजी महाराजांच्या (Chatrapati Sambhaji Maharaj) पराक्रमावर आधारित असलेल्या छावा (Chhaava) सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच धुमाकूळ घातली आहे. लक्ष्मण उतेकर (Laxman Utekar) दिग्दर्शित असलेल्या या सिनेमात विकी कौशलचा जिवंत अभिनय पाहून प्रेक्षक स्तब्ध होत आहे. मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती असलेल्या संभाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आणि त्यांचे स्वराज्याचे स्वप्न सत्यात उतरवले होते. संपूर्ण जगाला अभिमान वाटावा असे छत्रपती संभाजी महाराज या ‘छावा’ चित्रपटाच्या निमित्ताने जगाला माहित होत आहेत. (Chhaava)
छावा सिनेमाचे कौतुक करताना केवळ प्रेक्षकच नाही तर सेलिब्रिटी देखील सर्वात पुढे दिसत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमाने तर प्रत्येक जणं छावावर स्तुतिसुमन उधळत आहे. अशातच आयपीएस विश्वास नांगरे पाटील (Vishwas Nangre Patil) यांनी देखील छावा सिनेमा पहिला आणि त्याचे कौतुक करताना एक सुंदर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून त्यांनी अतिशय सुंदर शब्दात भावना व्यक्त केल्या आहेत. (Bollywood Tadka)
आयपीएस विश्वास नांगरे पाटील यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले, “छावा………
ज़िंदा रहे….. काळजाला चिरत जातात या काव्यपंक्ती, ज्यावेळी छत्रपती संभाजी महाराजांच्या डोळ्यांत धगधगत्या सळ्या खुपसल्या जातात, त्यांची जीभ खेचून काढली जाते.
सळसळतात धमन्या, ज्यावेळी त्यांच्या जखमांवर मीठ चोळले जाते!
‘मन के जीते जीत, मन के हारे हार, हार गये जो बिनलढे, उनपर हैं धिक्कार!’
केवढी उमेद केवढी प्रेरणा देणारे हे शब्द! स्वतःला मैदानात भिडायची, लढायची आणि शेवटच्या श्वासापर्यंत झुंझायची ऊर्जा देतात.
‘हाथी घोडे, तोफ तलवारे
फौज तो ‘तेरी सारी हैं
पर जंजिरोंमे जकडा हुआ मेरा राजा
अब भी सब पे भारी हैं!
A post shared by Vishwas Nangre Patil (@vishwasnangrepatil)
छत्रपती संभाजी महाराज हे एक गारूड आहे, मराठी माणसाच्या स्वभिमानाचे, स्फुल्लिंगाचे प्रतीक आहे, स्वराज्याच्या स्वप्नाचे जिवंत, मूर्तिमंत द्योतक आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे प्रौढ, प्रताप, पुरंदर स्वरूप आहे. असा पराक्रमी, शूर आणि चतुरस्त्र भूप होणे नाही. प्रभु शंभूराजे, शतशः नमन तुम्हाला! काय घ्यावं आम्ही मावळ्यांनी तुमच्या धगधगत्या आयुष्यातून?
आम्ही घ्यावा निर्भयपणा,
आम्ही सोडावी लाचारी आणि गुलामगिरी,
विचारांची आणि कृतींची
आम्ही सोडावं स्वार्थी आणि घुसमटलेलं जगणं,
घ्यावी कणभर तरी आपल्याकडून जिद्द,
करारी बाणा आणि महाराष्ट्र धर्म!
समतेचा, नीतिमत्तेचा शिकावा धडा!
राहावा मनोमनी चिंतावा क्षणोक्षणी,
शेर शिवराज आणि त्यांचा छावा!
जगदंब जगदंब! “
=============================
==============================
दरम्यान छावा सिनेमाबद्दल सांगायचे झाले तर रश्मिका मंदाना महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत आहे, तर0 अभिनेता अक्षय खन्नाने औरंगजेबाची भूमिका साकारली आहे. ‘छावा’ सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, १३० कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या सिनेमाने ३०० कोटींचा टप्पा पार केला आहे. सिनेमात मराठी दमदार कलाकारांची फौज देखील सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.