Pushpa 2 पुष्पा २ सिनेमात जोडले जाणार बोनस फुटेज, ‘रीलोडेड’ नावाने
Irrfan Khan बॉलिवूडसोबतच हॉलीवूडला देखील भुरळ घालणारा हरहुन्नरी अभिनेता – इरफान खान
हिंदी सिनेसृष्टीच्या आजवरच्या मोठ्या इतिहासात अनेक दिग्गज आणि प्रतिभासंपन्न अभिनेते, अभिनेत्री होऊन गेले. या दिग्गज कलाकारांच्या अभिनयाची आजही चर्चा होताना दिसते. आजच्या पिढीसाठी तर या मोठ्या कलाकारांचा अभिनय म्हणजे विद्यापीठच आहे. बॉलिवूड गाजवणारा असाच एक मोठा आणि महान कलाकार म्हणजे इरफान खान. (Bollywood News)
कॉमेडी, ऍक्शन, थ्रिलर, खलनायकी अशा सर्वच प्रकारच्या भूमिका इरफान खान यांनी अगदी लीलया पेलल्या. अतिशय प्रभावी अभिनेत्यांच्या यादीत सर्वात वरचे नाव इरफान खान (Irrfan Khan) यांचे कायम घेतले जाते. याच इरफान खान यांची आज ७ जानेवारी रोजी जयंती आहे. त्याच निमित्ताने जाणून घेऊया त्यांच्याबद्दल अधिक माहिती. (Irrfan Khan Birthday)
इरफान खान यांचा जन्म राजस्थानमधील टोंक येथील नवाब घराण्यात ७ जानेवारी १९६७ मध्ये झाला. इरफान यांचे पूर्ण नाव साहबजादे इरफान अली खान होते. त्यांचे संपूर्ण बालपण टोंकमध्येच गेले. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, इरफान खान यांना अभिनयात नाही तर क्रिकेटमध्ये करियर करायचे होते. (Irrfan Khan Story)
एवढेच नाही तर इरफान यांची सीके नायडू ट्रॉफी अंडर 23 टीममध्ये निवड झाली होती. या टुर्नामेंटमध्ये उत्तम कामगिरी करणा-याला फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार होती. मात्र कुटुंबाचा पाठिंबा नसल्याने इरफान क्रिकेटर होऊ शकले नाही. त्यांच्या वडिलांची इच्छा होती की इरफान यांनी त्यांचा टायरचा कौटुंबिक व्यवसाय बघावा. मात्र त्यात त्यांना रस नव्हता. (Entertainment mix masala)
इरफान हे भिंतींवरून उड्या मारून आत्याच्या घरी जात आणि तिथे टीव्ही बघत. त्यांनी अनेक सिनेमे पाहिले आणि याचदरम्यान त्यांना अभिनयात रुची निर्माण झाली. पुढे कोणी तरी त्यांना नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये (National School Of Drma) अभिनय शिकण्याचा सल्ला दिला. इरफान यांनी हा सल्ला एकला आणि या स्कुलमध्ये प्रवेश घेतला. येथूनच त्यांचा अभिनयाचा प्रवास सुरु झाला. (Bollywood Masala)
पुढे नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून पास झाल्यानंतर ते काम मिळवण्याच्या दृष्टीने मुंबईमध्ये आले. आणि त्यांचा संघर्ष सुरु झाला. इरफान यांनी कामासाठी अनेक निर्माते आणि दिग्दर्शकांकडे जाऊन काम मागितले. या काळात दोन वेळेच्या जेवणाची आणि राहण्याची गरज भागवण्यासाठी त्यांनी एका मित्राच्या मदतीने एसी मेकॅनिक म्हणून काम करायला सुरुवात केली.
दरम्यानच्या काळात इरफान यांनी दूरदर्शन, सेट इंडिया, स्टार प्लस या सुरुवातीच्या काळातील मनोरंजन वाहिन्यांमध्ये जे मिळेल ते काम करण्यास सुरुवात केली. ‘चंद्रकांता’, ‘चाणक्य’, ‘भारत एक खोज’, ‘श्रीकांत’, ‘बनेगी अपनी बात’सारख्या मालिकांमधून ते विविध भूमिकांमध्ये प्रेक्षकांना दिसत होते.
इलेक्ट्रिशियन असल्याने इरफान यांना एकदा राजेश खन्ना यांच्या घरी एसी ठिक करण्याचे काम मिळाले होते. पण राजेश खन्ना यांना भेटण्याची त्याची इच्छा पूर्ण झाली नाही. कारण योगायोगाने त्या दिवशी राजेश खन्ना घरी नव्हते. पण राजेश खन्ना यांचे स्टारडम बघून इरफान दंग झाले होते. (Irrfan Khan Work)
इरफान खान यांनी दिग्दर्शिका मीरा नायर यांच्या ‘सलाम बॉम्बे’ या चित्रपटातून त्याने मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. त्याची छोटीशी भूमिका असलेल्या या चित्रपटाला जागतिक स्तरावर अनेक पुरस्कार मिळाले. सोबतच या सिनेमाला ऑस्करसाठी नामांकन देखील मिळाले होते. दिग्दर्शक असिफ कपाडिया यांनी भारतात ‘द वॉरीअर’ या चित्रपटासाठी नायक म्हणून इरफान खानची निवड केली गेली. या चित्रपटाने आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळवली. (Ankahi Baatein)
इरफानसोबतच एनएसडीमध्ये असणारी दिग्दर्शक तिग्मांशू धुलिया यांनी इरफान खान यांना २००३मध्ये ‘हासिल’ या चित्रपटात नकारात्मक भूमिका ऑफर केली. या सिनेमातील त्यांच्या भूमिकेसाठी त्यांना पहिल्यांदा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. त्यानंतर तिग्मांशू धुलिया यांच्या ‘चरस’, ‘पानसिंग तोमर’, ‘बेगम सामरू’, ‘साहेब, बीबी और गँगस्टर रिटर्न’, ‘बुलेट राजा’ या चित्रपटात इरफान खान दिसले. (Irrfan Khan Movie)
तिगमांशू धुलिया यांच्या ‘पानसिंग तोमर’साठी इरफान खान यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले. मॅकबेथवर आधारित ‘मकबूल’मधील भूमिका साकारत त्यांनी त्यांच्यात असणारी अभिनयाची ताकद सगळ्यांनाच दाखवून दिली.
मकबूल या चित्रपटासाठी इरफान यांनी अनेक पुरस्कार जिंकले आणि इंडस्ट्रीतील सर्वात उल्लेखनीय अभिनेत्यांपैकी एक म्हणून प्रसिद्धीच्या झोतात आला. बॉलिवूडमध्ये काम करताना इरफान खान यांनी हॉलिवूड देखील गाजवले होते.
नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये इरफान खान यांची भेट सूतापा यांच्याशी झाली. त्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये आर्ट आणि अॅक्टिंग शिकत होत्या. मात्र त्यांना अभिनयात नाही तर स्टोरी आणि स्क्रिनप्लेमध्ये रस होता. दरम्यान इरफान आणि सुतापा यांच्यात मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. पुढे फेब्रुवारी 1995 मध्ये दोघांनी कोर्ट मॅरेज केले. इरफान यांनी सुतापाला म्हटले होते की, जर तिच्या कुटुंबीयांची इच्छा असेल तर मी हिंदु धर्म स्वीकारण्यास तयार आहे. परंतु याची गरज पडली नाही. सुतापाच्या घरच्यांनी त्यांना तसेच स्वीकारले.
फार कमी लोकांना माहीत आहे की, पठाण असूनही इरफान लहानपणापासून शाकाहारी आहे. यामुळे इरफानचे बाबा त्याला नेहमी पठाणच्या घरी ब्राह्मण जन्माला आला असे म्हणायचे. इरफान खान यांचे आयुष्य खूप संघर्षाचे गेले. बॉलिवूडमध्ये कोणत्याही पाठिंब्याशिवाय स्वतःचे स्थान निर्माण करताना त्यांनी अनेक चढ उतार पाहिले.
इरफान खान यांनी ‘मेट्रो’, ‘द नेमसेक’, ‘स्लम डॉग मिलेनिअर’, ‘मुंबई मेरी जान’, ‘न्यूयॉर्क’, ‘सात खून माफ’, ‘द लंच बॉक्स’, ‘हैदर’, ‘तलवार’, ‘पिकू’, ‘हिंदी मीडियम’, ‘करीब करीब सिंगल’ या सगळ्याच चित्रपटांसाठी इरफान खान यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले.
२०११ मध्ये त्यांना भारत सरकारच्या सर्वोच्च अशा ‘पद्मश्री’ पुरस्काराने गौरवण्यात आले होते. ‘ज्युरासिक वर्ल्ड’, ‘द अमेझिंग स्पायडरमॅन’, ‘लाईफ ऑफ पाय’, ‘लाईफ इन मेट्रो’, ‘सच अ लॉंग जर्नी’ सारख्या इंग्रजी चित्रपटांतूनही त्यांनी अभिनयाची चुणूक दाखवली. २९ एप्रिल २०२० साली या हरहुन्नरी अभिनेत्याने कर्करोगाशी सामना करताना हार पत्करली आणि त्यांचे दुर्दैवी निधन झाले.