Ramayana : “काही गोष्टी शब्दांत मांडण्यापलिकडे असतात”;आलिया झाली भावूक!

Life In A Metro : अनुराग बासू यांना ‘या’ कलाकाराने दिली होती चित्रपटाची कल्पना!
‘लाईफ इन अ मेट्रो’ (Life In A Metro) हा अनुराग बासू यांचा चित्रपट कुणी पाहिला नसेल असा प्रेक्षक सापडणं जरा कठिणच… १८ वर्षांपुर्वी आलेल्या ‘लाईफ इन अ मेट्रो’ चित्रपटाचा सीक्वेल ‘मेट्रो…इन दिनों’ (Metro In Dino) लवकरच आपल्या भेटीला येणार आहे… खरं तर १८ वर्षांनी सीक्वेल का बनवावासा वाटला असा प्रश्न सगळ्यांना पडला आहेच… याचं उत्तर आता दिग्दर्शक अनुराग यांनीच दिलं आहे…(Bollywood Movies)

अनुराग बासू यांनी आजवर एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिले आहेत… मात्र,’लाइफ इन अ मेट्रो’ चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे… आता अनुराग बसू ‘मेट्रो…इन दिनो’ घेऊन आले असून हा चित्रपट अनुराग बसू यांच्या हायपरलिंक सिनेमांमधील शेवटचं प्रोजेक्ट असणार आहे असं सांगण्यात आलं आहे… दरम्यान, अनुराग बासू यांनी सीक्वेल का आणला याचं कारण सांगताना म्हटलं की,”हा चित्रपट माझ्या जिव्हाळ्याचे कलाकार इरफान खान आणि के.के. यांना श्रद्धांजली म्हणून आहे. महत्वाची बाब म्हणजे,’मेट्रो…इन दिनो’ बनवण्याची कल्पना स्वतः इरफान खान (Irfan Khan) यांचीच होती”.

अनुराग पुढे म्हणाले की, ‘जग्गा जासूस’नंतर मी आणि इरफान एकदा गप्पा मारत होतो, तेव्हा त्यांनी मला ‘मेट्रो 2′ करायला सांगितलं. हे त्यांनी पहिल्या चित्रपटाच्या लगेच नंतर नाही, काही वर्षांनी सुचवलं होतं. 2017 मध्ये इरफान यांनी या चित्रपटासाठी होकारही दिला होता, पण दुर्दैवाने त्यांचे निधन झाले.’
पुढे अनुराग असं देखील म्हणाले की, ‘पहिला मेट्रो बनवताना मला भीती वाटत होती की प्रेक्षकांना तो आवडेल की नाही. पण नंतर त्याचं काम करणं आवडू लागलं. ‘लाइफ इन अ मेट्रो’नंतर ‘लुडो’सारखा चित्रपट केला. आता ‘मेट्रो…इन दिनो’ हा कदाचित हायपरलिंक सिनेमांचा माझा शेवटचा चित्रपट ठरेल, पण हे पूर्णपणे नाकारत नाही.’दरम्यान, मेट्रो…इन दिनो चित्रपटात सारा अली खान, आदित्य रॉय कपूर, फातिमा शेख, कोंकना सेन शर्मा, पंकज त्रिपाठी, नीना गु्प्ता, अनुपम खेर, अली फजल अशी कलाकारांची फौज आहे… अनुराग कश्यप यांचा हा चित्रपट ४ जुलै रोजी रिलीज होणार आहे…(Metro In Dino Cast)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi