
Chala Hava Yeu Dya 2: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रे’तील वनिता खरातची ‘चला हवा येऊ द्या’ मध्ये होणार एण्ट्री?
Zee Marathi वरील चला हवा येऊ द्या हा शो पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. मात्र या शोमध्ये आता बरेच बदल झाल्याचे पाहायला मिळतील. पूर्वी या शोचे सूत्रसंचालन लेखन आणि दिग्दर्शन डॉ. निलेश साबळे एक हाती सांभाळायचा. मात्र यावेळी तो या कार्यक्रमाचा भाग नसेल त्यामुळे अभिनेता अभिजीत खांडकेकर हा सूत्रसंचालन करताना दिसेल. तसेच या शोचे लेखन आणि दिग्दर्शन अभिनेता प्रियदर्शन जाधव करणार आहे. चला हवा येऊ द्या या शोमध्ये भाऊ कदमची कॉमेडी ही जास्त लोकप्रिय व्हायची. अजूनही सोशल मीडियावर भाऊ कदमचे काही स्कीट व्हायरल होत असतात. मात्र यावेळी निलेश सोबतच भाऊ कदम सुद्धा या शोचा भाग नसणार आहे. त्याऐवजी महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम गौरव मोरेची चला हवा येऊ द्या 2 मध्ये वर्णी लागली आहे. गेले काही दिवस गौरव या शोचे जोरदार प्रमोशन करताना दिसतोय.(Chala Hava Yeu Dya 2)

अभिनेता गौरव मोरे यांनी अनेक छोटी-मोठे काम केली होती पण महाराष्ट्राची हास्यजत्रा हा शो त्याच्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट ठरला. त्याला एक वेगळी ओळख मिळाली. त्यानंतर त्याला वेगवेगळ्या ऑफर्स येऊ लागल्या. पुढे वेगळ्या शोसाठी त्याने महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोला निरोप दिला. त्यानंतर आता तो चला हवा येऊ द्या मध्ये पाहायला मिळेल. अभिनेता गौरव मोरे झी मराठीवरील चला हवा येऊ द्या मध्ये गेल्यानंतर महाराष्ट्राची हास्यजत्रा मधल्या वनिता खरात हिची सुद्धा झी मराठीच्या शो मध्ये एन्ट्री होणार का असं गौरवला एका मुलाखतीत विचारलं. आणि यावर त्याने उत्तर ही दिल आहे. यावर तो म्हणाला की, ”असं काही नाहीये, मला फसवू नका… ती बिचारी तिकडे काम करते. पण ती चांगली अभिनेत्री आहे. तिच्यासारखी दूसरी अभिनेत्री नाही.

वनिताचं कौतुक करताना गौरव पुढे म्हणाला, वनिता या वयात सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने काम करते. ती स्टेजवर असताना कोणासोबतही काम करू शकते. मग तुम्ही कोणताही मोठा कलाकार आणा वनिता त्याला टफ देणारच. एवढी भारी काम करते वनिता. ती माझी फेवरेट आहे. त्या शोमध्ये मी स्केट करताना जेवढ्या एडिशन घ्यायचो ना ते वनी त्याला बरोबर करायचा की हा पुढे काय करणार आहे. मी आणि भोजने होतो तेव्हा आम्ही तिला डोळ्यांनीच खूनवायचो तेव्हा ती पुढचं वाक्य उचलायची. तिला ते सगळं करायचं एवढी ती हुशार आहे. अस म्हणत त्याने वनिताच कौतुक ही केलं आहे. (Chala Hava Yeu Dya 2)
===============================
हे देखील वाचा: अभिनेता Shubhankar Tawde ने घेतला मोठा निर्णय; म्हणाला ‘टीव्ही ऐवजी मी….’ !
================================
‘चला हवा येऊ द्या’ हा शो 26 जुलै रोजी सुरू झाला आहे. या शोमध्ये श्रेया बुगडे, भारत गणेशपुरे, कुशल बद्रिके, प्रियदर्शन जाधव यांसारख्या कलाकारांची कास्ट आहे.