Perfect Family Series Trailer: सोशल मिडिया सेन्सेशन गिरिजा ओक च्या

Isha Keskar चा ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ मालिकेला रामराम? मालिकेच्या नव्या प्रोमोमुळे चर्चांना उधाण
Star Pravah वरील लोकप्रिय मालिका “लक्ष्मीच्या पावलांनी”(Laxmichya Pavlani) मध्ये 21 नोव्हेंबरपासून एक मोठा बदल घडणार आहे. राहुल आणि रोहिणीचा पर्दाफाश करण्यासाठी निघालेल्या कलाचा अपघात होतो, आणि त्या अपघातात तिला वाचवण्यासाठी सुकन्या या नव्या पात्राची एंट्री होईल. कलाच्या अपघातानंतर सुकन्याच्या भूमिकेतील अभिनेत्री नक्षत्रा मेढेकर झळकणार आहेत, आणि तिच्या एन्ट्रीनंतर काही मोठ्या चर्चांनाही उधाण आले आहे. सुकन्या कोण आहे? तिचं चांदेकर कुटुंबाशी काय कनेक्शन आहे? आणि ती कलाचा जीव का वाचवते? या सर्व प्रश्नांची उत्तरं आगामी भागात उलगडतील. सुकन्या हे एक गूढ पात्र आहे, जे कथानकात महत्त्वाची भूमिका निभावणार आहे. त्या भूमिकेतील नक्षत्रा मेढेकर यांच्या अभिनयाने ही मालिका आणखी आकर्षक होईल, हे नक्की.(Actress Isha Keskar)

मालिकेतील प्रमुख पात्र कला (ईशा केसकर) आणि अद्वैत यांचं लग्नाचा घाट घातलेला असतानाच कलाच्या अपघातामुळे कथानकात एक नवीन वळण येणार आहे. सुकन्याची एन्ट्री कलाला जीवदान देण्याच्या मिशनवर आहे, त्यामुळे ही कथा पुढे काय वळण घेणार, हेच सर्वांचं लक्ष लागले आहे. पण सुकन्याच्या एन्ट्रीच्या घोषणेने एक नवा वाद उभा केला आहे. काही चाहत्यांनी असा अंदाज व्यक्त केला आहे की, ईशा केसकर (कला) मालिका सोडणार आहे, आणि नक्षत्रा मेढेकर त्याच्या जागी नायिका म्हणून येत आहेत. या चर्चांमुळे प्रेक्षकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे, कारण ईशा केसकरने त्यांच्या अभिनयाने कलर मराठीवरील “लक्ष्मीच्या पावलांनी” या मालिकेला एक वेगळं स्थान दिलं आहे.

मालिकेच्या सशक्त पात्रांमधून एक वळण घेत, निर्माता आणि कलाकार एक नवीन पाऊल टाकत आहेत. या नवीन वळणामुळे कथेला आणखी गती मिळेल का, हे पाहणं मनोरंजक ठरेल. तसेच, पल्लवी पटवर्धन (सरोज चांदेकर) यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्यांनी सांगितले की, “आमच्या लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेत एक नवीन अध्याय सुरू होतोय, आणि तुम्ही प्रोमोमध्ये पाहिलं असेल तर एक नवीन चेहरा कुटुंबात सामील होतोय.”(Actress Isha Keskar)
=================================
=================================
नुकताच सुकन्याच्या एन्ट्रीचा प्रोमो समोर आला आहे, ज्यात असे दाखवले गेले आहे की, सुकन्याला हृदयाचा त्रास आहे, तरीही ती कलाच्या अपघातानंतर तिचा जीव वाचवते. सुकन्या आणि कला यांच्यात एक भावनिक जडणघडण सुरू होत आहे, ज्यामुळे कथेला एक नवीन दिशा मिळेल. अद्याप अधिकृतपणे काहीही स्पष्ट झालं नाही, पण काही बीटीएस व्हिडिओ आणि प्रोमोसच्या मदतीने चाहत्यांनी असा अंदाज बांधला आहे की, कला (ईशा केसकर) तिच्या मृत्यूपूर्वी सुकन्यासाठी हृदयदान करेल, आणि सुकन्या अद्वैतच्या आयुष्यात नवा अध्याय सुरू करेल. सध्या, “लक्ष्मीच्या पावलांनी” मालिकेने नवा वळण घेतला आहे. आता सुकन्याची एन्ट्री आणि त्यावर होणाऱ्या चर्चा दर्शवितात की ही मालिका आगामी भागांमध्ये नवा टर्न घेणार आहे. ईशा केसकरच्या एक्झिटची चर्चा असली तरी, आगामी कथेतील नवे पात्र आणि घटनाक्रम कुटुंबातील नात्यांना एका वेगळ्या स्तरावर घेऊन जातील, हे नक्की.