यश चोप्रा यांनी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींना केले दिग्दर्शित !
![चित्रपटगृहात ‘इश्क विश्क रिबाउंड’ नाही पसरवू शकला आपली जादू; जाणून घ्या आतापर्यंत किती केली कमाई](https://kalakrutimedia.com/wp-content/uploads/2024/06/MV5BODNiOWQxMGUtYzViZi00Yzg1LWEyNzgtZGM5ZmMxMTcxZTU2XkEyXkFqcGdeQXVyNjkwOTg4MTA@._V1_FMjpg_UX1000_-1-850x560.jpg)
चित्रपटगृहात ‘इश्क विश्क रिबाउंड’ नाही पसरवू शकला आपली जादू; जाणून घ्या आतापर्यंत किती केली कमाई
वर्षातील मोस्ट अवेटेड चित्रपटांच्या यादीत समाविष्ट झालेला ‘इश्क विश्क रिबाऊंड‘ हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. अभिनेता शाहिद कपूर आणि अमृता राव यांचा ‘इश्क विश्क’ हा चित्रपटाचा सीक्वेल आहे. या चित्रपटात हृतिक रोशनची बहीण पश्मिना रोशन झळकली आहे. इश्क विश्क रिबाऊंड हा सिनेमा शुक्रवारी रिलीज झाला असून त्याच्या पहिल्या दिवसाच्या कमाईचा अहवालही समोर आला आहे. चला तर मग जाणून घेऊया या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली आहे. मॉर्डन प्रेमकथेवर आधारित ‘इश्क विश्क रिबाऊंड’ या चित्रपटाने मोठ्या पडद्यावर धडक दिली आहे. समीक्षक आणि प्रेक्षकांकडून या चित्रपटाला विशेष प्रतिसाद मिळाला नाही आणि यामुळे पहिल्याच दिवशी हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांसाठी आतूर झालेले पाहायला मिळाला. दिसला. त्यामुळे अशा तऱ्हेने बॉक्स ऑफिसवर ‘इश्क विश्क रिबाऊंड’ची सुरुवातही अत्यंत संथ गतीने झाली. तर चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईचे प्राथमिक आकडे आता समोर आले आहेत.(Ishq Vishk Rebound Box Office Collection)
![Ishq Vishk Rebound Box Office Collection](https://kalakrutimedia.com/wp-content/uploads/2024/06/Ramesh-Taurani-announces-Ishq-Vishq-Rebound-Rohit-Saraf-Pashmina-Roshan-Jibraan-Khan-Naila-Grewal-in-leads-540x405-2.jpg)
निपुण अविनाश धर्माधिकारी दिग्दर्शित ‘इश्क विश्क रिबाऊंड‘ या चित्रपटाला जितकी क्रेझ मिळत होती तितकी क्रेझ प्रदर्शनानंतर चित्रपटाच्या कमाईवर दिसून आलेली नाही. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाची कमाई आधी धडाकेबाज होताना दिसत होती. समोर आलेल्या रिपोर्टनुसार, शुक्रवारी प्रदर्शित झालेला ‘इश्क विश्क रिबाऊंड‘ पहिल्या दिवशी 1 कोटींपेक्षा कमी कलेक्शन करू शकला. प्राथमिक अंदाजानुसार ‘इश्क विश्क रिबाऊंड’ने भारतीय बॉक्स ऑफिसवर जवळपास केवळ ८५ लाख रुपयांची कमाई केली.
![Ishq Vishk Rebound Box Office Collection](https://kalakrutimedia.com/wp-content/uploads/2024/06/MV5BODNiOWQxMGUtYzViZi00Yzg1LWEyNzgtZGM5ZmMxMTcxZTU2XkEyXkFqcGdeQXVyNjkwOTg4MTA@._V1_FMjpg_UX1000_-1.jpg)
‘इश्क विश्क रिबाऊंड‘ हा शाहिद कपूर आणि अमृता सिंग अभिनीत २००३ मध्ये आलेल्या सुपरहिट चित्रपट ‘इश्क विश्क’चा सिक्वेल आहे. रमेश तौरानी निर्मित हा चित्रपट 20 कोटींच्या बजेटमध्ये बनवण्यात आला आहे. मात्र, या चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली नाहीत. बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची कथा आणि स्टारकास्ट पाहिली तर ही कथा अशा बेस्ट फ्रेंड्सभोवती फिरते जे एकमेकांच्या प्रेमात पडले आहेत आणि आता त्यांच्या नात्यातील अडचणींशी झगडत आहेत.(Ishq Vishk Rebound Box Office Collection)
=============================
=============================
स्टारकास्टवर नजर टाकली तर पश्मिना रोशन, रोहित सराफ, नायला ग्रेवाल आणि जिब्रान खान रोमँटिक भूमिकेत आहेत. पहिल्या दिवशी चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरील कामगिरी अत्यंत निराशाजनक असली तरी वीकेंडला हा चित्रपट वेग घेईल, अशी निर्मात्यांना आशा आहे. वीकेंडला हा सिनेमा कसा परफॉर्मन्स देतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला मुंज्या आणि चंदू चॅम्पियनकडूनही चांगलीच टक्कर मिळत असल्याने चित्रपटाच्या कमाईवर परिणाम झाला आहे हे नक्की.