Taath Kana Movie Trailer: जिद्द आणि संघर्षाची उत्कंठावर्धक कथा दाखवणाऱ्या

Charlie Chaplin यांना ‘हा’ मराठी चित्रपट आवडला होता!
मराठी चित्रपटांचे फॅन्स जगभरात आहेत यात शंकाच नाही… पण तुम्हाला माहित आहे का कॉमेडीचा बादशाह चार्ली चॅप्लिन यांना एक मराठी चित्रपट आवडला होता… जगाला खळखळून हसवणारा अभिनय क्षेत्रातला ध्रुव तारा असलेल्या चार्ली चॅप्लिन यांना एक मराठी चित्रपट इतका आवडला होता की, त्यांना या चित्रपटाच्या दिग्दर्शकाची प्रशंसा करण्याचा मोह आवरला नाही. आणि ते दिग्दर्शक होते, द ग्रेट… व्ही शांताराम! मुळात व्ही.शांताराम यांनीच सामाजिक विषयांवर चित्रपट बनवण्याची चळवळ भारतात सुरु केली होती. याच दरम्यान १९३९ साली त्यांनी एक मेलोड्रामा चित्रपट बनवला होता तो म्हणजे ‘माणूस’!

‘माणूस’ या चित्रपटाचं कथानक असं होतं की, एका प्रामाणिक पोलिसाचं वेश्येवर प्रेम होतं आणि तिचं पुनर्वसन करण्यासाठी तो अपार प्रयत्न करतो. पण समाजाकडून होणारा नकार आणि त्या दोघांचा संघर्ष या विषयावर हा चित्रपट होता. शांताराम बापूंचे चित्रपट फक्त राष्ट्रीयच नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही गाजायचे. ‘माणूस’ चित्रपटसुद्धा चांगलाच गाजला आणि थेट चार्ली चॅप्लिनपर्यंत पोहोचला आणि हा चित्रपट त्यांना खूप आवडला. यानंतर त्यांनी व्ही शांताराम यांची आणि त्यांच्या व्हिजनची खूप प्रशंसा केली होती.
आता चार्ली चॅप्लिनसारख्या माणसाकडून वाहवा मिळाली, म्हणजे भाग्यच… महत्त्वाचं म्हणजे त्यानंतर त्यांचं भाग्य उजळलं आणि शांताराम यांनी अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले. ज्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर बरेच पुरस्कार मिळाले. माणूस या चित्रपटात शाहू मोडक आणि शांता हुबळीकर यांची प्रमुख भूमिका होती.

‘माणूस’ चित्रपटाशिवाय शांताराम बापूंचे ‘अमर भूपाळी’, ‘दो आँखे बारा हात’ हे चित्रपटही जागतिक स्तरावर गाजले होते… शांताराम बापू उत्कृष्ट दिग्दर्शक तर होतेच पण त्यांच्यात एक अभिनेता देखील दडला होता… त्यांनी ‘सावकरी पश’, ‘सिंहगड’,’दो आँखे बारा हात’, ‘स्त्री’, ‘सिंहगड’, ‘माया बाजार’ अशा काही चित्रपटांमध्ये त्यांनी विविध भूमिका साकारल्या होत्या…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi