‘फिल्टर पाडा ते थेट पवईचा टॉवर’, Gaurav More च्या स्वप्नातील घर अस्तित्वात

अखेर ‘त्या’ चर्चा खऱ्या ठरल्या! कतरिना आणि विकीने बेबी बंपसह पहिला फोटो केला शेअर !
बॉलिवूडमध्ये गेल्या काही महिन्यांपासून अभिनेत्री कतरिना कैफ (Actress Katrina Kaif) गर्भवती असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला असून, कतरिना आणि विक्की कौशल यांनी ही आनंदाची बातमी अधिकृतपणे जाहीर केली आहे. दोघांनी एक गोड फोटो शेअर करत त्यांच्या आयुष्यात लवकरच एक नवीन पाहुणा येणार असल्याचं सांगितलं आहे. कतरिनाने तिचा बेबी बंप दाखवणारा पहिला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. फोटोमध्ये विक्की कौशल (Actor Vicky Kaushal) तिच्या बेबी बंपकडे प्रेमाने पाहताना दिसत आहे.(Katrina Kaif Announce Pregnancy)

या खास क्षणाला शेअर करत त्यांनी लिहिलं आहे, “आमचं मन आनंद आणि कृतज्ञतेनं भरलं आहे. आयुष्यातील सर्वोत्तम अध्याय सुरू करायला आम्ही सज्ज आहोत.” ९ डिसेंबर २०२१ रोजी राजस्थानमध्ये पार पडलेल्या त्यांच्या लग्नाला चार वर्षं पूर्ण होत आली आहेत. लग्नावेळी त्यांनी जसं सगळं अगदी खासगी ठेवलं, तसंच कतरिनाची प्रेग्नंसीही खूप काळ गुप्त ठेवण्यात आली होती.

कतरिनाने अनेक महिने कोणत्याही कार्यक्रमात किंवा प्रमोशनल इव्हेंट्समध्ये सहभाग घेतला नव्हता. त्यामुळे तिच्या प्रेग्नंसीबाबत संशय अधिकच वाढला होता. अलीकडेच ‘छावा‘ सिनेमाच्या प्रीमियरला कतरिना आणि विक्की एकत्र दिसले होते. त्यानंतरच तिच्या बेबी बंपबाबत चर्चा सुरू झाल्या होत्या. अखेर आज त्यांनी हे गोड सत्य सर्वांसमोर आणलं आहे.(Katrina Kaif Announce Pregnancy)
============================
============================
मीडिया रिपोर्ट्सनुसार, कतरिनाची डिलिव्हरी येत्या १५ ते ३० ऑक्टोबर दरम्यान होण्याची शक्यता आहे. मात्र काही चाहत्यांनी अशी प्रतिक्रिया दिली आहे की, त्यांनी ही गुड न्यूज थेट बाळ जन्मल्यानंतरच द्यायला हवी होती. तरीही, विक्की आणि कतरिनाच्या या खास क्षणावर सर्वत्र शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यांच्या प्रेमाच्या या नव्या प्रवासासाठी प्रेक्षक, चाहते आणि सेलिब्रिटी मंडळींचं भरभरून प्रेम आणि पाठिंबा मिळतोय.