Ranveer Singh : आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ चित्रपटाचा टीझर ‘या’

Jaan Hazir Hai : नवकेतन फिल्मची पंचवीशी यशाने साजरी
नवकेतन फिल्म एवढं जरी म्हटलं तरी चित्रपट रसिकांच्या (की व्यसनींच्या) किमान दोन पिढ्यांच्या डोळ्यासमोर ‘नौ दो ग्यारह’, ‘तेरे घर के सामने’, ‘गाईड’, ‘ज्वेल थीफ’, ‘तेरे मेरे सपने’ असे अनेक क्लासिक चित्रपट आले असतीलच. विषयांची विविधता, श्रवणीय गीत संगीत, प्रभावी दिग्दर्शन मांडणी ही या चित्रपटांची ताकद. आज नवकेतन फिल्म या चित्रपट निर्मिती संस्थेच्या स्थापनेचे पंचाहत्तरावे वर्ष सुरु आहे. (Bollywood masala)

या संस्थेच्या स्थापनेस पंचवीस वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त मनोहर नाथ दिग्दर्शित ‘जान हाजिर है’ या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली. हा चित्रपट मुंबईत २३ मे १९७५ रोजी प्रदर्शित झाला. त्याला पन्नास वर्ष पूर्ण झाली देखिल. मुंबईत मेन थिएटर जमुनामध्ये सकाळी साडेअकराचा खेळ म्हणजे मॅटीनी शोला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने चक्क साठ आठवड्यांचा मुक्काम केला. हिरक महोत्सवी आठवड्यापर्यंत मजल. याच नवकेतन फिल्म या निर्मिती संस्थेची स्थापना म्हणजे एखाद्या चित्रपटाच्या पटकथेतील हा प्रसंग जणू. (Entertainment news)

‘नीचा नगर’ ( १९४९) व्यावसायिकदृष्ट्या अपयशी ठरल्याने दिग्दर्शक चेतन आनंद निराश होणे स्वाभाविकच. तो काळ आपल्या चित्रपटाला रसिकांनी नाकारताच त्यातील कलाकार, निर्माता व दिग्दर्शक विलक्षण उदास होण्याचा होता. कारण चित्रपटात भावनिक गुंतवणूक असे. दुसरीकडे स्वातंत्र्यप्राप्तीचा आनंद होताच. नवीन उमेद, उत्साह होता.स्वप्ने होती. अशातच देव आनंदची अभिनेता म्हणून प्रभात फिल्मच्या ‘हम एक है’ पासून सुरुवात झाली होती. त्याला आणखी काही चित्रपट मिळत होते. आणि अशातच त्याने विजय आनंद व बहिणींनाही गुरदासपुरवरुन मुंबईत बोलावून घेतले. (Untold classic movies stories)
================================
हे देखील वाचा: Thug Life : कमल हासन सोबत झळकणार महेश मांजरेकर!
=================================
चेतन आनंदला पुन्हा उभारी देण्यासाठी काय करता येईल या विचारात असतानाच देव आनंदने ” आपली चित्रपट निर्मिती संस्था निर्माण करायचे ठरवले. काही ‘नव’ (नया) करायचे त्याच्या मनात आले आणि तेव्हाच चेतन आनंदची पत्नी उमा हिने मुलाला जन्म दिला. त्याचे नाव ‘केतन’. ….. आणि मग ‘नवकेतन फिल्म’ या चित्रपट निर्मिती संस्थेची स्थापना झाली. ती वैशिष्ट्यपूर्ण ठरली. (Unknown facts about Indian films)

कंदिल दिवा हे नवकेतनचे बोधचिन्ह. याचं कारण, पंजाबमधील गुरदासपुरच्या गावातील घरी बालपणात असलेला रस्ता आणि तेथे अंधुक प्रकाश देत असलेले दिवे. त्यातून जाताना हाती कंदिल ठरलेला. नवकेतनचे कार्यालय महालक्ष्मीच्या फेमस स्टुडिओत १४७ नंबरचे. आणि पहिला चित्रपट चेतन आनंद दिग्दर्शित ‘अफसर’. देव आनंद (Dev Anand) व सुरय्या यांच्या भूमिका. तोही रसिकांनी नाकारला. (Bollywood tadaka)
अशी अपयशी सुरुवात होऊन देखील ‘नवकेतन फिल्म’ ची वाटचाल यशस्वी आहे. तो काळ चित्रपट निर्मिती संस्थांचा होता. प्रभात फिल्म कंपनीतून वेगळे होत चित्रपती व्ही.शांताराम यांनी राजकमल कला मंदिर स्थापन केले. हिमांशू रॉय व देविका राणी यांचे बॉम्बे टॉकिज, मेहबूब खान यांचे मेहबूब प्रॉडक्शन्स, के. असिफ यांची के. असिफ फिल्म, राज कपूरची आर. के. फिल्म, गुरुदत्त यांची गुरुदत्त फिल्म, बी. आर. चोप्रा यांची बी.आर. फिल्म, सोहराब मोदी यांचे मिनर्व्हा मुव्हीटोन, बिमल रॉय यांचे बिमल रॉय प्रॉडक्शन्स, ए. आर. कारदार यांची कारदार फिल्म अशी अनेक चित्रपट निर्मिती संस्थेंची नावे घ्यायलाच हवीत. यातील काहींनी आपले मुंबईत भव्य दिमाखदार स्टुडिओही उभारले. नवकेतन फिल्मला आपले अस्तित्व निर्माण करुन ते टिकवण्यात मोठीच स्पर्धा होती, नवकेतन फिल्मचा गुरुदत्त दिग्दर्शित बाजी यशस्वी ठरला आणि सकारात्मक वाटचाल सुरु झाली. (Bollywood and stidios)

‘हमसफर’, ‘टॅक्सी ड्रायव्हर’, ‘ऑंधिया’, ‘मकान नंबर ४४’, ‘फंटूश’ यानंतर विजय आनंदने ‘नौ दो ग्यारह’पासून चित्रपट दिग्दर्शनात पाऊल टाकले आणि नवकेतन फिल्मचा स्वतःचा प्रेक्षकवर्ग निर्माण झाला. चित्रपटाच्या जगात यश म्हणजे बरेच काही असतेच असते हा अलिखित नियम फळणे आवश्यक असते. नवकेतन फिल्मने आता चित्रपट निर्मितीत सातत्य ठेवले. राज खोसला दिग्दर्शित ‘काला पानी’, विजय आनंद दिग्दर्शित ‘कालाबाजार’, ‘ तेरे घर के सामने’, अमरजीत दिग्दर्शित ‘हम दोनो’असे करत करत आर. के. नारायण यांच्या ‘गाईड’ कादंबरीवर आधारीत त्याच नावाचा चित्रपट आला. (Entertainment trending news)
चेतन आनंदकडे असलेले दिग्दर्शन विजय आनंदकडे आले आणि एकाच वेळेस हिंदी व इंग्लिशमध्ये पडद्यावर आलेल्या या चित्रपटाने नवकेतन फिल्म, विजय आनंद, देव आनंद, वहिदा रेहमान आणि मुंबईतील या चित्रपटाचे मुख्य चित्रपटगृह मराठा मंदिर या सगळ्यांनाचा प्रतिष्ठा प्राप्त झाली. एक दर्जेदार कलाकृती बरेच काही देत असते. म्हणूनच दर्जा महत्वाचा. काळाच्या खूपच पुढे असे या चित्रपटाचे धाडसी कथानक हे उल्लेखनीय. नवकेतन अतिशय उंचीवर होते. (Bollywood masala)
================================
हे देखील वाचा: Mehboob Khan : ‘मदर इंडिया’ क्लासिक चित्रपटाचे जनक!
=================================
दरम्यान चेतन आनंदनेही आपली हिमालय फिल्म अशी चित्रपट निर्मिती संस्था स्थापन करुन आपली स्वतंत्र वाटचाल सुरु केली होतीच. अशातच देव आनंदही दिग्दर्शनाचा विचार करत होता. आपल्या पहिल्या चित्रपटाचे ‘अंहिसा’ हे नावही त्याने चित्रपट निर्मिती संस्थेत नोंदवले (देव आनंदच्या व्यक्तीमत्वाला ते शोभले असते का हो?) ते बदलून ‘प्रेम पुजारी’ केले. पडद्यावर प्रणय करताना पहावे तर ते देव आनंदला. त्यामुळे हे नाव उत्तम. (Prem Pujari)
दक्षिण मध्य मुंबईतील शालिमार या नवीन चित्रपटगृहाचे प्रेम पुजारीने (१९७०) उदघाटन, तेथेच प्रीमियर आणि हे सर्व बाळासाहेब ठाकरे यांच्या शुभ हस्ते. देव आनंदचा उत्साह दुप्पट झाला नसता तरच नवल होते. पण नवकेतन फिल्मचे काय? जणू एक नवीन वा वेगळाच प्रवास सुरु झाला. ( पटकथाच भरकटली?) विजय आनंदने नासिर हुसेन यांच्या बॅनरचा तिसरी मंझिल स्वीकारताना नवकेतनबाहेर एक प्रकारे पाऊल टाकले होतेच. त्यात देव आनंदच्या जागी शम्मी कपूर आला तेच योग्य हे देव आनंदभक्तही मान्य करतील. चित्रपट वितरक गुलशन रॉय यांनी ‘त्रिमूर्ती’ फिल्म अशी चित्रपट निर्मिती संस्था स्थापन करताच विजय आनंदने त्यासाठी ‘जॉनी मेरा नाम’ दिग्दर्शित केला. नवकेतनचा ‘तेरे मेरे सपने’ मात्र फसला. देव आनंदने हरे राम हरे कृष्णमध्ये दिग्दर्शन चमक दाखवली. विजय आनंदचा मॅकनाॅज गोल्डवर आधारित ‘छुपा रुस्तम’ अगदीच भुसभुशीत असणे हा त्याच्या चाहत्यांना धक्काच. ‘गाईड’, ‘जॉनी मेरा नाम’, ‘तेरे मेरे सपने’नंतर ‘छुपा रुस्तम’साठीही मेन थिएटर मराठा मंदिर हा योग साधला तर खरा ( त्या काळात चित्रपट निर्मिती संस्था अथवा दिग्दर्शक आणि मेन थिएटर हेही एक खास समीकरण).

आता देव आनंद नवकेतनसाठी तर विजय आनंद अन्य निर्मात्यांसाठी चित्रपट दिग्दर्शित करु लागले आणि आता नवकेतन फिल्मचे जुने चित्रपट पहावेत ते रिपीट रन, मॅटीनी शो आणि गल्ली चित्रपटात असे झाले. त्यांना सतत हाऊसफुल्ल गर्दी. त्या प्रत्येकातील गीत संगीत आजही लोकप्रिय. अनेक गाण्यात विजय आनंद टच. (Bollywood news)
================================
हे देखील वाचा: Dev anand : देव आनंद पाकिस्तानी क्रिकेटपटूला घेऊन हा चित्रपट बनवणार होता!
=================================
अशाच या कौतुकास्पद वाटचालीत नवकेतन फिल्मला पंचवीस वर्ष झाल्यानिमित्त १९७५ साली विजय आनंदने मनोहर नाथ रंगू दिग्दर्शित ‘जान हाजीर है’ या चित्रपटाची निर्मिती करताना देवबंधुंचा भाचा शेखर कपूर, प्रेमनाथचा मुलगा प्रेम किशन आणि नताशा या नवीन चेहर्यांना संधी दिली. जय पार्टे यांच्या संगीतातील गाणी लोकप्रिय झाली. यू ट्यूबवर ‘जान हाजिर है’ आहे. त्याचे विशेष म्हणजे, चित्रपट सुरु होताच केतनव फिल्म ( नवकेतन फिल्म) असे वाचायला मिळते. या चित्रपटासाठी आपल्याच चित्रपट निर्मिती संस्थेच्या नावात बदल करण्यात आला. (खरं तर खार पाली हिलवर केतनव डबिंग थिएटर होते. (Celebrity news)
विजय आनंदचे कार्यालयही तेथेच होते आणि ऐंशीच्या दशकात तेथेच विजय आनंदच्या अविस्मरणीय अशा मुलाखतीचा योग मला आला. ) जान हाजिर हैचा निर्माता म्हणून गोल्डी असे म्हटलयं आणि कंसात विजय आनंद म्हटलयं. चित्रपटाची कथा स्वरुपकुमारची आहे. स्वरुपकुमार छुपा रुस्तम, ब्लॅक मेल वगैरे चित्रपटासाठी विजय आनंदचा सहाय्यक दिग्दर्शक होता. ‘जान हाजिर है’ ची पटकथा विजय आनंदची आहे. छायाचित्रणकार चमन के. बाजू यांचे आहे. (Bollywood chitchat)

चित्रपटात तीन नवीन कलाकारांसोबत उर्मिला भट्ट, इफ्तेखार, मुराद, त्रिलोक कपूर, मोहन शेरी, रंजन, जानकीदास, कोमिला विर्क यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटातील तरुण गीत संगीत बहारदार. ओ मेरी छम्मक छल्लो ( पार्श्वगायक अमितकुमार व उषा तिमोथी), सावन आया बादल आये मेरे पिया नाही आये ( दिलराज कौर), भांडे फूट न जाऐ ( अमितकुमार व मनहर), हम ना रहेंगे तुम ना रहोगे ( अमितकुमार, मनहर व दिलराज कौर), यह शहरी मोर देखो, दिलों का चोर देखो ( दिलराज कौर व अमितकुमार) (Indian cinema history)
ही गाणी लोकप्रिय झाली. सावन आया… गाण्यामुळे दिलराज कौर पार्श्वगायिका म्हणून नावारुपास आली. संगीतकार जय पार्टे यांनी काही मोजक्याच चित्रपटांना संगीत दिले. चित्रपट संगीत शौकीनांना जय पार्टे चांगल्या प्रकारे माहित आहेत. नवीन चेहऱ्यांना नवीन पार्श्वगायक हे या गीत संगीताचे वैशिष्ट्य. हे नियोजन नक्कीच गोल्डीचे असणार. त्या काळातील दिग्दर्शकांची चित्रपटातील गाण्यासंदर्भातील कल्पकता कायमच कौतुकास्पद आणि म्हणूनच रसिकांच्या किमान तीन चार पिढ्या ओलांडूनही जुन्या चित्रपटातील गाणी सर्वकालीन सुपरहिट. (Dev Anand movies)
==============
हे देखील वाचा : Sholay :’शोले’ची ५० वर्ष पुर्ण; प्रेक्षकांसाठी खास रि-रिलीज होणार चित्रपट
==============
देव आनंदला थांबणे मंजूर नव्हते हा कौतुकाचा भाग. पण ते नवकेतन फिल्मच्या पथ्यावर पडले का? जाना ना दिल से दूर नावाच्या चित्रपटासाठी विजय आनंदच्या दिग्दर्शनात देव आनंद असा.बर्याच वर्षांनी योग आला. उत्साहात मुहूर्त झाला. ( यू ट्यूबवर तो आहे) चित्रपट पूर्णही झाला. केतनव डबिंग थिएटरमधील ट्रायल संपल्यानंतर बाहेर पडताच नेहमीप्रमाणेच देव आनंद आम्हा समिक्षकांचे चेहरे वाचत होता. पहिल्यांदाच तो काहीसा निराश वाटला. (Mix masala)

नवकेतनची सुरुवात, ‘तेरे मेरे सपने’पर्यंचा चढता प्रवास आणि मग उतार हे सगळेच घडत असतानाच या बॅनरच्या अनेक क्लासिक चित्रपटांचे अस्तित्व, आकर्षण आणि महत्व कायम आहे हे महत्वाचे. ’जान हाजिर है’ हा त्यातील एक महत्वपूर्ण टप्पा. १९७५ हे वर्ष चित्रपटसृष्टीसाठी बरेच काही घडवणारे. मे १९७५ मध्ये मुंबईत प्रदर्शित झालेल्या महत्वपूर्ण चित्रपटात ‘पांडू हवालदार’ व ‘चोरी मेरा काम’ (२ मे), ‘धर्मात्मा’, ‘चंदनाची चोळी अंग अंग जाळी’ व ‘तूच माझी सावित्री’ (९ मे), ‘खेल खेल मे’ आणि ‘तुफान और बिजली’ (१६ मे), ‘जान हाजिर है’ (२३ मे) आणि ‘जय संतोषी मां’, ‘कैद, लफंगे’ ( ३० मे) अशी ती वाटचाल आहे. त्यात ‘जान हाजिर है’ चे यशही उल्लेखनीय. (Jaan Hazir hair movie)