
Jackie Shroff सामान्य लोकांचा जग्गू दादा ते बॉलिवूडचा सुपरस्टार जॅकी श्रॉफ
बोले तो भिडू….बॉलिवूडचा जग्गू दादा अर्थात जॅकी श्रॉफ (Jackie Shroff) प्रेक्षकांचा आवडता अभिनेता आहे. आपल्या अभिनयाने, संवादांनी जॅकी श्रॉफ यांनी बॉलिवूडमध्ये स्वतःचे वेगळे प्रस्थ निर्माण केले. चित्रपटांची, अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना जॅकी यांनी मेहनतीच्या आणि जिद्दीच्या जोरावर सुपरस्टार हे बिरुद कमावले. आज सगळ्यांचा लाडका जग्गू दादा त्याचा ६८ वा वाढदिवस साजरा करत आहे. (Jackie Shroff)
जॅकी श्रॉफ या नावाला मोठे वलय प्राप्त आहे. जॅकी श्रॉफ हे नाव एक ब्रँड म्हणून बॉलिवूडमध्ये ओळखले जाते. जग्गू दादाचा सिनेमा म्हणजे प्रभावी अभिनय, दमदार संवाद, जबरदस्त ऍक्शन असणार हे प्रेक्षकांना आधीच माहित असायचे, त्यामुळे त्यांच्या सिनेमांना तुफान गर्दी असायची. बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता असलेल्या जॅकी श्रॉफ यांनी ८० आणि ९० च्या दशकात आपल्या चित्रपटांनी, अभिनयाने लोकांची मने जिंकली. आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊया त्यांच्या संघर्षाबद्दल आणि सिनेप्रवासाबद्दल. (Jackie Shroff Birthday)

जॅकी श्रॉफ यांचा जन्म १ फेब्रुवारी १९५७ रोजी गुजराती कुटुंबात मुंबईत झाला. जॅकी दादांचे पूर्ण नाव जय किशन श्रॉफ असे आहे. जॅकी श्रॉफ यांच्यानुसार त्याचे वडील रईस पर्ल ट्रेडर कुटूंबातून होते. पण त्यांचा भाऊ आणि एका दुस-या व्यक्तीने पार्टनरशिपमध्ये काही काम सुरु केले आणि खुप भांडण झाले. जॅकीच्या वडिलांवर काही आरोप लावून त्यांना घरातून बाहेर काढून टाकण्यात आले. त्यानंतर जॅकी यांचा कुटुंबाचा मोठा संघर्ष सुरु झाला. श्रॉफ कुटुंब मालाबार हिल येथील तीन बत्तीमध्ये एका खोलीमध्ये राहू लागले. तिथेच जॅकी यांचा जन्म झाला. (Entertainment Mix Masla)
आर्थिक समस्यांशी रोज झगडून जीवन जगणाऱ्या श्रॉफ कुटुंबाला एक मोठा धक्का बसला. जॅकी श्रॉफ यांच्या मोठ्या अचानक भावाचे निधन झाले. या घटनेबद्दल सांगताना जग्गू दादा यांनी एका मुलाखतीमध्ये म्हटले होते की, “माझा एक मोठा भाऊ होता, मात्र त्याचा वयाच्या १७व्या वर्षी मृत्यू झाला. त्यावेळी मी १० वर्षांचा होतो. माझा भाऊ आमच्या चाळीतील खरा जग्गू दादा होता. जेव्हा आमच्या परिसरातील लोकांना मदतीची गरज असायची तो मदतीसाठी नेहमी हजर असायचा. (Celebrity Interviews)
तो १७ वर्षांचा होता, तेव्हा त्याने समुद्रात बुडताना एक व्यक्ती पाहिली, त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी त्याने पाण्यात उडी मारली. खरंतर माझ्या भावाला पोहता येत नव्हते, मात्र मदतीसाठी त्याने धाडस केले, पण तो सुध्दा पाण्यात बुडाला. तेव्हा मी एक केबल वायर त्याच्याकडे फेकली, त्याने ती पकडली. पण काही सेकंदांतच त्याच्या हातून ती निसटली. मी तेव्हा खुप लहान होतो हे पाहून मी खुप घाबरलो होतो. मी त्याला बुडताना पाहत होतो. यानंतर मी ठरवले की, भावाप्रमाणेच आपल्या परिसरातील लोकांची मदत करायची आणि त्यांची रक्षा करायची त्यातूनच मी जग्गू दादा बनलो. माझा भाऊ भाऊ मिल वर्कर होता आणि मृत्यूच्या एक महिनापुर्वीच त्याला जॉब मिळाला होता.” (Ankahi Baatein)

या घटनेने श्रॉफ कुटुंबाला मोठा धक्का बसला. यातून बाहेर येण्यास त्यांना खूप काळ लागला. पुढे काही काळ गेल्यानंतर जॅकी यांनी घराला हातभार लावण्यासाठी लहान लहान कामं करण्यास सुरुवात केली. ते चित्रपटांच्या प्रदर्शनाची आणि निवडणुकींची वाट बघायचे. कारण या काळात त्यांना भींतीवर पोस्टर्स चिकटवायचे काम मिळायचे. याशिवाय ते एक्स्ट्रा इनकमसाठी १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी या दिवशी झेंडा वंदनासाठी आलेल्या लोकांना चने विकायचे. यातून जे पैसे मिळायचे त्यातून ते रविवारी चंदू हलवाईकडून जलेबी खरेदी करुन खायचे. पुढे अकरावीनंतर पैशाअभावी त्यांनी शिक्षण थांबवले. (Bollywood Masala)
जॅकी दादा यांना कुटुंबाला पैशाची मदत करायची होती. त्यासाठी ते काम शोधत होते. याकाळात ते मुंबईतल्या ताज हॉटेलमध्ये नोकरीसाठी गेले मात्र त्यांना शिक्षणाअभावी त्यांना तिथं नोकरी नाकारण्यात आली. मग त्यांनी एअर इंडियामध्ये नोकरी मिळवण्याचा प्रयत्न केला. तिथेही त्यांना नोकरीची संधी मिळाली नाही. पुढे त्यांना ‘ट्रेड विंग्स’ नावाच्या एका ट्रॅव्हल कंपनीत काम मिळाले. एके दिवशी ते बस स्टॉपवर थांबलेले असताना मॉडेलिंग एजन्सीमधील एका व्यक्तीने त्यांना पाहिलं आणि मॉडेल म्हणून कामाची ऑफर दिली. त्यांनी त्या माणसाला पैसे मिळणार का असे विचारले. हो उत्तर मिळाल्यावर जग्गू दादा यांनी मॉडेलिंग करायला सुरुवात केली.

मॉडेलिंगला सुरुवात करणाऱ्या जॅकी श्रॉफ यांची पहिली कमाई ७५०० रुपयांची होती. त्यांनी मॉडलिंगसाठी त्यांचा जॉब सोडला. मॉडेलिंग करत असताना त्यांची भेट देव आनंद यांचा मुलगा सुनील आनंद याच्याशी झाली. त्यांच्या मदतीने जॅकी देव आनंदला भेटले. जॅकीला भेटताच देव आनंद यांनी त्यांना चित्रपटाची ऑफर दिली. ‘स्वामी दादा’ या चित्रपटाद्वारे फिल्मी करिअरला सुरुवात केली होती. १९८३ मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटात जॅकी देव आनंद यांच्यासह झळकले होते. त्यानंतर सुभाष घई यांनी जॅकीला हिरो या चित्रपटात कास्ट केले. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. सुभाष घई यांच्या ‘हिरो’ सिनेमाने त्यांना मोठे स्टारडम मिळवून दिले. रातोरात ते प्रसिद्ध आणि लोकप्रिय झाले.

पुढे त्यांनी एका पाठोपाठ एक अनेक हिट सिनेमे दिले. असे असूनही ते बराच काळ चाळीतच राहिले. त्यानंतर ते दुसऱ्या मोठ्या घरी शिफ्ट झाले. मोठा संघर्ष करून आज जॅकी श्रॉफ बॉलिवूडमधील सुपरस्टार म्हणून ओळखले जातात. त्यांनी करिअरची सुरुवात करुन ४२ वर्षे पूर्ण झाली आहेत. याकाळात त्यांनी सुमारे २२० चित्रपटांमध्ये काम केले. यात त्यांच्या ‘कर्मा’, ‘खलनायक’, ‘राम-लखन’, ‘सौदागर’, ‘बॉर्डर’, ‘रंगीला’ या गाजलेल्या चित्रपटांचा समावेश आहे. जॅकी यांनी ‘बागी 3’, ‘भारत’, ‘क्रिमिनल जस्टिस’ ,’बागी 3′, ‘सूर्यवंशी’ आणि ‘राधे’ आदी अनेक चित्रपटांमध्ये मुख्य अभिनेत्यापासून ते खलनायकापर्यंत सर्वच प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत.
======
हे देखील वाचा : Ankush Chaudhari प्रतिकूल परिस्थितीवर मात करत अंकुश चौधरी बनला मराठी सिनेसृष्टीतील हँडसम अभिनेता
Preity Zinta उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच हुशार बिसनेसवूमन आहे ‘डिंपल गर्ल’ प्रीती झिंटा
======
जॅकी श्रॉफ यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर त्यांनी आयेशाशी लग्न केले आहे. त्यांना टायगर श्रॉफ आणि कृष्णा श्रॉफ हे दोन मुलं आहेत. जॅकी दादा यांची पत्नी आयेशा यांची प्रेम कहाणी खूपच रंजक आहे. आयेशा या फ्रेंच-बेंगाली कुटुंबातील आहेत. त्या १४ वर्षांच्या तर जॅकी १५ वर्षाचे असताना त्यांनी बस स्टॉपवर त्यांना पाहिले होते. एकदा रस्त्यावरून जाताना जॅकी यांची नजर एका शाळकरी मुलीवर पडली. जी तेव्हा केवळ १४ वर्षांची होती. दोघांची चांगली मैत्री झाली. मग दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. काही वर्षांनी आयेशा आणि जॅकी यांनी लग्न केले. आलिशान घरात राहणारी आयेशा मग जॅकी यांच्यासाठी चाळीत राहिली दोघांचा सुखाचा संसार झाला.