Karishma Kapoor : संजय कपूरची ३० हजार कोटींची प्रोपर्टी कुणाला

Jait Re Jait चित्रपट म्हणजे आदिवासी लोकांचं जगणं मांडणारा चित्रपट – पं. ह्रदयनाथ मंगेशकर!
मराठी चित्रपटसृष्टीतील अजरामर चित्रपट म्हणजे ‘जैत रे जैत’. डॉ. जब्बार पटेल यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट १९७७ मध्ये रिलीज झाला होता… नुकत्याच या चित्रपटाला ४८ वर्ष पुर्ण झाल्याच्या निमित्ताने संगीतमय कार्यक्रम आयोजित केला गेला होता.. यावेळी पद्मश्री पं. हृदयनाथ मंगेशकर आणि उषा मंगेशकर यांच्या अद्वितीय योगदानाचा गौरव करण्यात आला.
पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी त्यांच्या संगीत प्रवासाविषयी सांगताना म्हटलं की,“मी ही गाणी दाद मिळवण्यासाठी नव्हे, तर एका न ऐकलेल्या आवाजाला मान देण्यासाठी रचली होती. ‘जैत रे जैत’ हे माझं एकट्याचं नव्हे तर ते जंगलांचं आणि तिथल्या अशा विसरलेल्या लोकांचं जगणं मांडणारा चित्रपट आहे.”

तर, उषा मंगेशकर यांनी त्या काळातील निर्मितीच्या आठवणींना उजाळा दिला आणि एका धैर्यशील कलाकृतीच्या निर्मितीमागील संघर्ष उलगडला.आदिवासी कथांना पडद्यावर आणण्यामागील प्रयत्नांचे तपशील शेअर केले, तर डॉ. मोहन आगाशे यांनी नाग्या या त्यांच्या भुमिकेतील अनुभव सांगितले.
================================
हे देखील वाचा: Amrish Puri : हिंदीच्या ग्रेटेस्ट खलनायकाची सुरुवात मराठीपासून झाली होती!
=================================
दरम्यान, ‘जैत रे जैत’ चित्रपटात स्मिता पाटील, मोहन आगाशे, निळु फुले, सुलभा देशपांडे यांच्या प्रमुख भूमिका होत्या… जितकी या चित्रपटाची कथा प्रेक्षकांना भावली होती तितकीच चित्रपटातील प्रत्येक गाणी प्रेक्षकांच्या मनात कायमस्वरुपासाठी कोरली गेली आहेत…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi