
सूरज बरोबर सतत करवली म्हणून मिरवणारी Janhvi Killekar लग्नानंतर थेट हॉस्पिटलमध्ये दाखल !
Bigg Boss Marathi 5 चा विजेता सूरज चव्हाण (Suraj Chavan) 29 नोव्हेंबर रोजी मोठ्या थाटामाटात विवाहबंधनात अडकला. त्याच्या लग्नासाठी प्रचंड गर्दी ही झाली होती. अक्ख गाव सूरजच्या लग्नाला आलं होत.आणि सूरज आणि त्याची पत्नी संजना नवरा-नवरीच्या रूपात अत्यंत सुंदर दिसत होते. पण याच सोहळ्यात एक विशेष आकर्षण ठरली ती म्हणजे अभिनेत्री जान्हवी किल्लेकर (Javnhvi Killekar) जान्हवी किल्लेकर ही सूरज चव्हाणची बिग बॉसच्या घरापासून बनलेली बहिण आहे. ती सुरजच्या लग्नात मुख्य आकर्षण ठरली, आणि तिच्या उपस्थितीने लग्नाला एक वेगळाच रंग दिला. जान्हवीने सूरजच्या लग्नाच्या सर्व विधींमध्ये भाग ही घेतला . अगदी सुरज जिथे जाईल, तिथे जान्हवी त्याच्याबरोबर पहायला मिळाली.जान्हवीचा सुरजच्या लग्नाच्या वरातीत नाचण्याचा व्हिडिओ ही खुप व्हायरल झाला होता. (Actress Janhvi Killekar)

परंतु, आता जान्हवी बद्दल एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. लग्नानंतर अचानक जान्हवीला अस्वस्थ वाटू लागलं आणि ती आजारी पडली. इतकी गंभीर अवस्था झाली की तिला ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आले. जान्हवीने स्वतःच तिचे हॉस्पिटलमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले. फोटो पाहून तिच्या चाहत्यांना धक्काच बसला. तिने आपल्या पोस्टमध्ये “नजर इज रिअल” असं कॅप्शन दिलं, ज्यामुळे चाहत्यांनी तिच्या स्थितीला नशिबाचा परिणाम मानला.

शेअर केलेल्या पोस्ट वर तिचे चाहते कमेंट करत आहेत. चाहत्यांनी जान्हवीला लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली आहे. अनेकांनी तिला काळजी घेण्याचा सल्ला दिला असून, तिच्या लवकर होणाऱ्या सुसंस्थितीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर, लोकांनी हॉस्पिटल बेडवर असलेल्या जान्हवीच्या फोटोवर हार्ट इमोजी शेअर करत तिला प्रेम आणि मदतीचे संदेश पाठवले आहेत. (Actress Janhvi Killekar)
=============================
हे देखील वाचा: Prajakta Gaikwad Wedding: रिसेप्शनमधल्या ‘ग्रँड एन्ट्री’ ने अभिनेत्री झाली ट्रोल !
=============================
जान्हवी किल्लेकर बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात सहभागी झाली होती, आणि त्या शोमध्ये तिची भेट सूरज चव्हाणसोबत झाली. सुरज आणि जान्हवी यांच्यात एक भाऊ-बहिणीचे नाते निर्माण झाले आणि त्यानंतर ती त्याच्या प्रत्येक सोहळ्यात,लग्नाच्या प्रत्येक विधीत सूरज सोबत उभी राहिली. जान्हवीने तिच्या बहिणीसारख्या नात्याचा सदैव आदर केला त्यामुळे प्रेक्षकांनी ही तिच तोंडभरून कौतुक केल.