ऋतुजा बागवेला मिळाला मानाचा उस्ताद बिस्मिल्लाह खाँ युवा पुरस्कार
Ulajh Trailer:’शेर को खा जाएगी अब ये बकरी’ जान्हवी कपूरच्या ‘उलझ’चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित
जान्हवी कपूरचा बहुचर्चित चित्रपट ‘उलझ‘ चा ट्रेलर अखेर रिलीज झाला आहे. 2 मिनिटे 23 सेकंदाच्या या ट्रेलरमध्ये देशातील सर्वात युवा हाई डिप्टी कमिश्नरची गोष्ट दाखवण्यात आली असून जान्हवी कपूर या भूमिकेत दिसत आहे. मात्र, चित्रपटात या व्यक्तिरेखेवर घराणेशाहीचाही आरोप करण्यात आला आहे. आणि गुप्तहेर असून गुप्त माहिती लीक केल्याचा ही संशय आहे. अखेर जान्हवी या गोष्टींमध्ये इतकी अडकते की ती स्वत: त्याला सामोरे जाण्यासाठी पुढे येते. चित्रपटाची कथा नक्कीच भारी आणि वेगळी आहे. या चित्रपटात जान्हवी व्यतिरिक्त गुलशन देवय्या, रोशन मॅथ्यू, राजेश तैलंग, मेयांग चांग, आदिल हुसेन, राजेंद्र गुप्ता आणि जितेंद्र जोशी या कलाकारांचा समावेश आहे.(Ulajh Trailer)
ट्रेलरची सुरुवात जान्हवीच्या सुहाना भाटिया या व्यक्तिरेखेपासून होते, जी सेंट स्टीफन्स कॉलेज आणि हार्वर्ड युनिव्हर्सिटीची पदवीधर आहे आणि यासह ती देशातील सर्वात तरुण उपउच्चायुक्त आहे. तिचे सहकारी कर्मचारी सुहानाच्या पात्रतेवर प्रश्न चिन्ह उपस्थित करतात आणि घराणेशाहीकडे बोट दाखवतात. ते असे ही म्हणतात की ती या पदासाठी पात्र नाही. जान्हवी कपूरला या ट्रेलरमध्ये केवळ घराणेशाहीच नाही तर देशद्रोही असल्याच्या आरोपांनाही सामोरे जावे लागणार आहे. तिचा जीव कसा धोक्यात जातो आणि तिला आपल्या अस्मितेसाठी, अस्तित्वासाठीही कसे लढावे लागते, हे या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहे.
राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक सुधांशु सारिया दिग्दर्शित या चित्रपटात जान्हवी सर्वात तरुण उपउच्चायुक्त सुहाना भाटिया यांची भूमिका साकारत आहे. तिच्या निवडीवर प्रश्नचिन्ह निर्माण होते. सुहानाच्या नेमणुकीत घराणेशाहीचा मोठा हात असल्याचा काही जण आरोप ही करतात, कारण ती श्रीमंत कुटुंबातील असेत. आपल्या विभागात आपलं स्थान निर्माण करण्यासाठी ती खूप मेहनत घेत असते. (Ulajh Trailer)
=================================
हे देखील वाचा: जान्हवी कपूर झाली कपड्यांवरून ट्रोल; नेटकऱ्यांनी थेट केली उर्फी जावेदशी तुलना
=================================
रोशन मॅथ्यू, आदिल हुसेन, राजेश तैलंग, मेयांग चांग, राजेंद्र गुप्ता आणि जितेंद्र जोशी यांच्याही या चित्रपटात भूमिका आहेत. जान्हवी कपूरने इन्स्टाग्रामवर चित्रपटाचा ट्रेलर शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, “प्रत्येकाची एक कथा असते. प्रत्येक कथेचे रहस्य असते. प्रत्येक गुपितात एक सापळा असतो. हा ‘गुंतागुंत’ सोडवणं सोपं नाही. आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर २ ऑगस्ट रोजी हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.