Dashavatar चित्रपटाने हिंदी-साऊथलाही दिली टक्कर; २१ दिवसांत कमावले ‘इतके’ कोटी!

Jatadhara : हिंदीत जम बसेना, Sonakshi Sinha ने तेलुगू फिल्म इंडस्ट्रीकडे वळवली पावलं!
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) हिचे गेल्या काही काळापासून एकामागून एक फ्लॉप चित्रपटच येत आहेत… लग्नानंतर तिचा नुकताच ‘निकिता रॉय’ या सस्पेन्स थ्रिलर चित्रपट आला होता; परंतप ‘सैय्यारा’ 9Saiyaara) चित्रपटामुळे तिचा हा चित्रपट आपटला.. इतकंच नाही तर अजय देवगणच्या ‘सन ऑफ सरदार’ चित्रपटातूनही तिचा पत्ता कट झाला होता.. आता बरेच फ्लॉप चित्रपट दिल्यानंतर सोनाक्षी तिच्या आगामी नव्या कोऱ्या चित्रपटातून रौद्रावतारात प्रेक्षकांसमोर येणार आहे…. विशेष म्हणजे ‘जटाधरा’ (Jatadhara) चित्रपटाच्या निमित्ताने सोनाक्षी सिन्हा तेलुगू फिल्म इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करणार आहे…. नुकत्याच तिच्या ‘जटाधरा’ चित्रपटाची झलक समोर आली असून यात सोनाक्षी साऊथ अभिनेता सुधीर बाबू सोबत दिसणार आहे…(Telugu film news)

सोनाक्षी सिन्हा हिची प्रमुख भूमिका असणाऱ्या ‘जटाधरा’ चित्रपटाची कथा पौराणिक असून यात स्वार्थीपणा आणि बलिदान यामधील संघर्ष मांडण्यात आला आहे… टीझरमध्ये सोनाक्षी सिन्हा एका शक्तिशाली आणि क्रूर देवीच्या रूपात दिसत असून तिच्या चेहऱ्यावरचा राग, डोळ्यांतील अंगार आणि भेदक आवाज प्रेक्षकांना आवडला आहे… तर, दुसरीकडे सुधीर बाबू शांत, पण दृढनिश्चयी योद्ध्याच्या रूपात दिसत आहे. (Bollywood news)
================================
हे देखील वाचा : Jolly LLb 3 : डबल जॉली, डबल ट्रबल; कधी येणार चित्रपटाचा टीझर?
=================================
‘जटाधरा’ चित्रपटात प्रेक्षकांना भारतीय पौराणिकतेची छटा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम पाहायला मिळणार आहे… ‘जटाधरा’चे दिग्दर्शन वेंकट कल्याण आणि अभिषेक जयसवाल यांनी केले असून, निर्मिती Zee Studios आणि प्रेरणा अरोरा यांनी केली आहे. त्यामुळे बॅक टु बॅक फ्लॉप चित्रपट गेल्यानंतर आता सोनाक्षी सिन्हा आणि तिच्या चाहत्यांना ‘जटाधरा’ चित्रपटाकडून फार अपेक्षा आहेत…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi